अहिराणीती कविता माय
माय
माय माय करू माय
कोठे दिसेना ती माय…
माग झामलाम्हा दमे
मन्ही नजेरना पाय………1
डोया आसूम्हाच बुडे
माय दिसेना डोयाले
तुन्ही याद रडावस
तुन्हा पोटना गोयाले……….2
झाके बायतोडं माल्हे
लागू देये न्हई वारा
रोज भिंजाडेत व्हट
गोड आमृतन्या धारा……….3
मन्हं दुःखणं..खुपणं
दोन्ही हाते तू सर्कडे
कसी उतारे कुईक
बोटे मोडी तू कर्कडे……….4
जसा तयहाते फोड
आसं माल्हे तू समावं…
दोन्ही डोया पहाराले
तरी तुल्हे मी गमावं………5
माय माय मन्ही माय
माय चुल्हाव्हर तावा…
रोज शेके तू हयाती
घास आतडीले दावा……….6
करे आरती गजर
आख्खं धनगोत रडे…
मन्हा बापना तो आसू
खाले कानेझापे पडे……….7
नऊ मण लाकडेस्नी
पालखीम्हा गई बसी…
आते आसूस्मा रे रोज
जास पपनीबी धसी………..8
सारी सर्कडाना दिन
तुल्हे झामलं मी गच्ची…
न्हई सापडनी माय
पुर्रा व्हयनु मी खच्ची………..9
तुन्हा कपायना रुप्प्या
सांगे तुन्हा तो निरोप…
पोटे पिकसू मी तुन्हा
मन्ही ठेवजो तू थोप……….10
राख फुंदी फुंदी बोलें
सांगे आंतरनी भाषा…
फिर छप्पन पंढोऱ्या
धुंड नागेपाये कास्या……….11
राख कोरी कोरी आते
जरी पातायम्हा जासी…
न्हई दिसावं डोयाले
सर्गे गई तुन्ही काशी……….12
कवी… प्रकाश जी पाटील.
पिंगळवाडेकर