सोनं द्यारे सोनं ल्ह्यारे
सोनं द्यारे! सोनं ल्ह्यारे!!
राग तम सम्दा सोडा
गोट आयका रे दादा
सोनं द्यारे सोनं ल्ह्यारे
तुम्ही दसराले औंदा
नका करु गर्व-ताठा
राजा रामनी शिकाडं
दुर्गादेवी चंडिकानी
म्हैषासुरले नमाडं
शमी झाडना आसरे
शस्त्रे दपाडात सम्दा
आजनाच दिन व्हता
पांडवस्ना साठे उम्दा
कौत्स्य शिष्यनी कहानी
नवाजेल शेना भारी
वरतंतु महामुनी
बहू व्हतात विच्यारी
गुरू मांगे दक्षिनाम्हा
चौदा कोटि स्वर्नमुद्रा
आपटास्ना पानरुपे
सोनं पड्नं बदाबदा
करा त्याग वाईटना
प्रेमभाव व्हाडे लावा
भाऊ-दादा ईसरारे
वैरभाव हेवा-दावा
माय-बाप सगासाई
नका ईसरु त्यासले
मानपानथीन वाटा
प्रेमसोनं सम्दासले
साडेतीन मुहूर्तना
हाऊ सन शे दसरा
वज्जी भारी परंपरा
नका कधीच ईसरा
ग्यान सांगे शिवाआप्पा
त्यान्हा नेक शे ईरादा
घरेघर जाईसनी
सोनं वाटज्यात औंदा
शिवाजी साळुंके, ‘किरन’,
च्याईसगाव, जा. जयगाव.
