सरतं वरीस
सरता वरसले
करु दे मजा
घोट घोट पी
तुना आज राजा……
तु खाय घर
गरम गरम भज्या
हाटेलमा चिकन
दाबयी राजा…..
नवा वरीस मा
व्हसु माळकरी
मुखात ऱ्हायी मना
राम कृष्ण हरी…..
वरीस मांगे
वरीस सरनं
दरसाल तुम्हनं
खोट बोलन…..
ऐकी ऐकी
बठनात कान
वय नं ठेवा
तुम्ही जरासं भान…..
दर साल
करतस बहाना
निम्मी रातले
गल्यात धिंगाणा…..
तुम्हन ईवान
उडवा यंदा घरात
खाऊत पाव भाजी
पार्टी करु जोरात….
विवेक पाटील
मालेगाव (नाशिक)