बळीराजानी कहानी अहिराणी कवीता
बळीराजानी कहानी
“””””””””””””””””””””””””””””””
काय सांगू दादा तुल्हे, मन्ही करुण कहानी,
कधी लुटे माल्हे नेता, कधी आभायनं पानी.
उन बाये मन्हा जीव, वाहेत घामन्या धारा,
नही लागे मन्हा जीवले, समाधानना वारा.
जसा खेतम्हा राबे बैल, तसा वढस मी घानी,
काय सांगू दादा तुल्हे, मन्ही करुण कहानी.
दिनरात राबिसन मी, बहू पीक पिकाडस,
हाऊ घातकी बेपारी, निच्चा भाव दखाडस.
कधलोंग चालीन देखा, तेन्ही हाई मनमानी,
काय सांगू दादा तुल्हे, मन्ही करुण कहानी.
सदा घाटाना व्यवहार, नही हातम्हा छदाम,
ना कपडा देखा नवा, नही काजू ना बदाम.
दर आखाजी-दिवाई, पोरं फिरेत दीनवानी,
काय सांगू दादा तुल्हे, मन्ही करुण कहानी.
नदारीम्हा जगस तरी, तेन्हा मने नही खोट,
स्वतः भुक्या राही भरस, सम्दा जगनं पोट.
बळीराजानागत नही, कोन्ही जगमा दानी,
काय सांगू दादा तुल्हे, मन्ही करुण कहानी.
© प्रा.बी.एन.चौधरी.
(९४२३४९२५९३)