अहिराणी कथा पीत्तर पाटा

अहिराणी कथा पीत्तर पाटा

मंडई देवराम बाप्पा आणि गिरजा बोय स्वर्गा मधुन पितृपक्षात आपल्या घरी जाण्या साठी उतावळे झाले खरी … पण देवराम बाप्पाला या प्रथे बद्दल काय सांगायचं ते स्वर्गा मधुनच अहिराणी संवादां द्वारे काय सांगतात त

ऐका … …………..

पीत्तर पाटा . . . . . . .

देवराम बाप्पा नी गीरजा बोय थेट स्वर्गा म्हाईन हेटा ढुकी राहमंतात . . पीतरेसना दिन व्हतात . . आगारीना दिन शेत . . . बये वर लोंग त्यासले हेटना सैपाकना वास भिडी गया . त्यासन्या नाक न्या घान्या अजुनबी तेज व्हत्यात . खालना . चुल्हामा घास टाकाई राह्यांथात . . तूपना .. भलता मस्त वास वर भिडी राह्यंता तोव तोव गीरजा बोय वाट दखी राहयंती पीतरेसनं बलावनं कवय ई कान जान ? तवसामा तिनी तपकीर काढी आनी लागनी दात घासाले . काय म्हंतस . ? धल्ली मरनी तवय तिना दात शाबूत व्हतात . तव्हढामा ते देवराम बाप्पा ढगेस म्हाईन फिरी फारी तिना जोडे ई लागना . त्याले बी तो घम घमाट पीतरेसना चुल्हामा घास टाकाना वरलोंग ई गयथा .. बाकी ना धल्ला धल्ली त्यासना पीतरे सनं बलावना परमाने हेठे पिसोड्या लीसन जाई राहयथांत काई ई ग्यात . देवराम बाप्पा नी दख . धल्ली दातच घशी राहयंती ” काय वं येडी ना मायेक कवय बी तपकीर लावस का ? बये भलती आदत गंधी शे गड्या तुनी . याना करता बाईना जातले कोठे लई जावू नई .. ” काय बोलनात .. ? तुमी आन माले . . ? वं माय वं .. इबाक तोंड करा बरं ! .. वं देवबानी माले वर बलाई लिनं .. नई ते तुमना मांगे कसाले येतू मी . ? वं मना नातरेसना तोंडे दखाना राही ग्यात i ” ” वं मी काय म्हनस गीरजा .. आते दसमीना आपले पीतरे इ राह्मनात तवय अनायासे जाई राहयनूत तवय . नातरेसले बी दखी लेजो . वं तुना सुक्यानी नी तुना लाडकी सुननी पितरेसनी बठ्ठी तयारी करी ठेल से म्हंत .. बये आवू ना पानेसन्या भज्या कधिसना खायेल शेत . . अन कढी .. कढी बी वरपानी राहेल शे . . . ” तव्हढामा ते गीरजा बोय बोलनीच ” वं तुमना करता गरम गरम ढिंडरा काढी दिवू ना मी ईसरी ग्यात का ? पन हाई मोठानी बायको करी तवय खरी माय …. ” वं येडांगी नको आठेन लाता झटकू .. बये आठे उनू तसा आठे एक बी बिडीनं थोटूक व्हढा ले भेटनी नई .. । … वं तुमना मोठा आंडोर तुमना करता बिडीना बंडल लयना.. दसमीना पीत्तरले टाकी चुल्हामा आगारीना टाईमले . . तवलोंग धीर धरा . i ” आनी काय वं तु कवय दखं हाई ? ” ” वं तो वान्याना दुकान वर गयथा पीतरेसना सार सामान लेवाले . . त्यानी खीरना करता साखर आनी ‘ तूप आनं . कुल्लाया ‘ पापडेस ना तया करता तेल आनं .. आलन कालन ना भाजी करता मना सून नी आख्ख्या भाज्या निवडी आन्यात माय .. तुमले सांगू तिनी भेंड्या आन्यात . . चवया . गवारन्या शेंगा आन्यात गिलका .. दोडका बठ्ठ्या बठ्ठ्या भाज्या लई ऊनी माय ती पोर .. ” आनी तु देखं हाई .. बये काय हुश्शार वं गीरजा तु . बये इतला लांबथीन नजर पुरी गई तुनी . ? ” या ढगेस म्हाईन तुले बरं दखाईनं ? . बये मनतं डोकं फिरस गड्या बयना पायाना मारू इसनी पायासनी .. मनं तोंड जास गड्या मंग कथं कथं . . . वं त्या सुक्या नी तुना मोठा डंगरानी त्या ढोरे तो खयामा लई ग्या आनी त्या तठे बांधात तो गोठा रिकामा कया आनी त्या गोठामा आपल्या दोनीसना खाटा टाक्यात . लाजा वाटतीस का त्यासले . ? वं त्यासनी निरानाम चव सोडी दिनी वं …. ” तवसामा ते गीरजा बोयनी पोरेसनी बाजू लीनीच ” वं मी काय म्हनस … ” वं तू काही पालिसी मारू नको .. बये त्या गोठामा बैलेसना शेनना नी मुतायलना इसड् फटक वास ये . . किरकोडा .. काय नी डास काय .. बये तवय कितला तरास झाया व्हता आपले ? इसरी गयी का ? ” …. ” हा .. वं माय.. ” तव्हढामा तो तिना वर डाफरनाच तिले एंगाडिसन बोलना ” हावं माय ‘ हावं माय .. काय करस : .. वं त्या आपले वाढाना कटाया बी करेत . . . घरमा चुल्हा जोडे चांगलं वांगलं करी लेत नी कोपरामा बसीसन खाई लेत . . वं आमन्या काय नाकन्या घान्या मरी गयथ्यात काय ? बठ्ठ कये आमले . . दुजाभाव करेत . . आनी आते काय आगारीना घास टाकी राह्यनात .. मायन्यान भो भलता संताप दाटी येस .. ती याद येस ते .. बये त्यासना करता काय नई कये वं ..? आख्खा वावरेसनं मीच दखु ना .. घरे दारे लिनात यासना करता ? बये काय नई कये वं ? तु दखे ना चांगली ? कावं देखेना ? .. मंग बरं ! आनी आते आगारीना आपला घास टाकी राह्मनात ? दख तुले बजाडी देस .. ” ” काय ? ” मी त्या पीतरेसना दिन कावया व्हसू .. नी तू कावयीन व्हय .. धाबावर साटा वाटे त्या आपले नीवद दाखाडाले इथीन .. तुले सांगी देस .. त्या कितला बी बलावो . . आनी त्या बलावथीनच .. जावानं नई .. काय सांगस ? जावानं नई त्या ताटले शिवानं नई .. आज्याबात त्यासना वाढी आनेल ताट ले दखानं बी नई .. बये काय काय तरास देल से यासनी आपले जीवत पनी . ? . धाबाना वरंडी वरच बशी राहयजो तू … बये . . . वं तू कितला दा त्या डंगरापा पानी मांग व्हतं वं .. मांग व्हतं का नई . मंग बरं . ! त्या काय डाचं करेत . . . म्हने ‘ हाई चादडी ऊगी मूगी बसत नई .. घडी घडी पानी मांगस .. कावं तुले बोलना व्हता ना हाऊ मोठा डंगरा .. बये मालते याद पडाव नई बये . . ” ” आते काय करतस मंग ..! धड पेवाले पानीना गल्लास फेकी मारेत नईत या … जाऊ दे मंग मनं तोंड जास मंग कथं कथं . . म्हनीसन म्हनस धाबावर त्यासना अन्नाले शिवानच नई .. गम्मतच दखानी शे माले या वरीसले . बये तो डंगरा ते डंगरा .. ती व्हवू बी तश्शीच ना वं . ! बये ती याद ऊनी का मना नुसता आत्मा कलकलस ना ..! आपन म्हंतस जाऊ द्या पोरेसनी जात शे . . ” अरे आगारी चुल्हामा घास टाकानी शे . . . तो घास ते अन्न का बरं वाया घालतस या ? अरे येडास होन गरीब दुब्याले तो ताट वाढी द्या रे .. त्या तरी तुमले चांगला आशिर्वाद भेटी .. तेच अन्न आमले पहुंची असं समजा .. नई ते मंग आरे येडास होन गायले टाका .. ती ते एक नंबरी गोट शे . . नई ते एखादा जीतरापले टाका .. आपला वाड वडिलेसनी चाल लाई देल से .. हाई गोट खरी शे . . . पन आते हाईच चालू दिशात का ? गिरजा एक गोट इचारस तुले . . माले सांग यासनी समजा चुल्हा मा आपला करता घास टाका त्यामा खीर ‘ पोयी ‘ भात कुल्लाई . भज्या .. बठ्ठ टाकथीन .. खरं सांग आपला लगून हाई खरच पहुची का ? तूच सांग आपले पहुंची का .. ? ‘ हाई बठ्ठी येडी समजूत शे . . त्याले काय अंधश्रध्दा का काय म्हंतस ना ? हाई ह्या चुकाय राह्यनात .. वं तु काई बोलशी ? ” .. ” काय बोलू माय ? ” तुमनं आते चालू शे म्हंत .. I ” दख गीरजा .. तुले सांगस आते . . यासले म्हना जीवत पन मा तुम्ही सेवा कई नी आमनी आनी आते हाई काय आगारीना नाटके करतस ? मंडई मनं बठ्ठासले हाईच सांगनं शे . . जीवत पने आपला माय बापेसनी सेवा करा .. त्यासना दवा पानीनं दखा .. त्यासले तरास देवू नका .. हाईच मोठ्ठी त्यासना करता ” आगारी शे . कसाना हाऊ पीत्तर घालतस ? भाऊस होन गरीबले जेवू घाला त्याना पेक्षा .. ते तरी पुन्य भेटी .. तुमीन पीतरे घालतस आते आम्ही स्वर्गा मा शेत आमले कोठे तुमना घास पहुंची हो ? हाई येडी समजूत शे तुमनी … आमना लोंग पहुचत नई . आमी येतस वरथीन जेवाले हाई तुमनी चुकीनी समजूत शे . . आते कोन तुमले सांगी गड्यासहोन ? आते सर्व पीतरीनी आमावस्या ई .. त्या दिन तुमले असं वाटस आपला आख्खा वाडवडिल इथीन जेवाले . . बये कितला पदार्थ रांधतस हो तुमीन . बये ताटमा जागा शिल्लक नई ऱ्हास तठे .. पन एक गोट मातर खरी त्या निमित्त खाल बठ्ठा नाता गोताना बाया मानसे गोड धोड खावाले येतस आपला भेद भाव ईसरी जातस हाई गोट तव्हढीच खरी . ! पन आमले आठे हाई बठ्ठ स्वर्गामा येवा वर कयनं बरं खरं काय ऱ्हास ते .. म्हतं आपला पीतरे खरच वरथीन स्वर्गा म्हाईन येतस व्हतीन पन म्हंतस ती गोट खरी ” आप मरा सिवाय स्वर्ग दखात नई .. i ” बरं मंग मंडई . ईचार करा यानावर .. या गोट वर … ध्यानमा राहीन ना .. ! येस मंग मंडई .. ।

राम राम ..!

विश्राम बिरारी ‘ धुळे . 9552074343 ……