निय आभाय

निय आभाय

निया काया आभायले
धाडू कोणता निरोप
कोठे पाऊस पाडसं
कोठे व्हस त्याना कोप….

नको करु रे देवबा
हिना पोरेस्ना जिवन्या
हाल दखीसनी त्यास्ना
येत नही का किवन्या ?….

असा पड झरझर
कर वल्ली हाई माय
पोट पुरता पिकू दे
नको पाडू रे दुष्काय…

बी बिवाराले आते
जरा फुटू दे अंकुर
डोया भरीस्नी दखू दे
निय निय हाई वावर

भर कणिस कणिस
पारणं डोयानं फिटू दे
नको देऊ भरपूर
दोन घास ते भेटू दे

ठेव सुखी तू सर्वास्ले
मोट मनमा बांधू दे
तुनी करतस सेवा
सुख घरमा नांदू दे

सौ सुनिता कोठावदे

कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन