कवीसंमेलन 7 वे अखिल भारतीय अहिराणी संमेलन
शिर्षक:- तुना आयुष्याना सदरा
तुना आयुष्याना सदरा,
मना हातेकन शिवा!
तवय कुठे मना पोऱ्या,
तू हापिसर झाया!!
गयक्या सप्परन्या धारा,
आमी आंगवर झेलात!
तुले लाई छातीले,
आमी कैक वावधने पेलात !!
मायबापना कर्तयाले आमी,
आमी नई नइज इसरनूत !
मानपाननं जगणूत आमी,
नई कोणासमोर झुकनुत!!
लगीन तुनं थाटमां लाई
जीव मना झाया मोट्ठा!
वाटे समदं हुई चांगलं,
पन आमना पईसा निंघना खोटा!!
या म्हतारासनी आडचन,
तुले रे कशी वाटनी!
खरा मायममतानी नाय,
तवय कशी तटकन तुटनी!!
माले काही सांगू नको,
वृद्धा आसरम मान जाई र्हाय!
मोठा साहेब शे तुना पोऱ्या
तुनी समदी सोय करी माय!!
डोयाना काकर गायत ,
दोनी बि घरना बाहेर निंघनूत!
कयनज नई ,नईज समजनं,
लेकरूना या सुखले आमी कुठे नडनूत !!
आमी कुठे नडनूत!!!
सौ.मनिषा टिकारामसिंग पाटील,
वडगांव, जळगांव