अहिराणी रचना कैफीयत
ज्याना ज्याना खिसा गरमं त्याना त्याना देवधरमं
हाई म्हणं काही खोटी नही । कुबेरना दारले चांदीन तोरणं ।
आंधळाना दारमा लंगड्यानं मरणं ॥
चिठे बिठे खोंड्या सवाट्याले, निठ्या आठ्यान खोंड्यानं चरणं । गावगाडानी गुजरी बजारमा , शेर पायलीन चंपानं, धोरणं ॥
जलम जिंदगी ठेकळं फोडामा, तुका तात्याना तुटणात चरण ।
काटा कूटा मोडा धसकटं, बायजा काकूनं,माटीमा मरणं ॥
गावगाडाना पाडा वाडामा , सगा भावकीन , राह्ये धोरणं । सुख दुःखमा लागे उंबरा , सगा सोयरा , बायजाकाकू, तुका तात्याना पावन चरणं ॥
गावगाडामा नव्हता राडा, जलम जिंदगी वैर सरणं । आथानी कैरी, तथानी कैरी, झोका खात गाणा म्हणेत । ववा बेट्या नंदाभाच्या आखाजीले बांधे तोरणं ॥
जुना डोळा व्हयना आंधळा, नवा तमाशा पाहिसन । वाडा गया गाडा गया , मनी गौराईना गया सन । इंटरनेटना नवा जमाना तात्या काकून घरमा मरणं ॥
गावगाडाकार साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक 7507148676