अहिराणी कवीता आते आवरा घाईघाई
ऐका हो ऐका
पिंट्या दादा अन ताई
अहिराणी माय ना जागरले
आते आवरा घाईघाई!!
माय आपली अहिराणी
सोडीसन मावशीले भजतस
गोडवा तिना वयखा
कथा भलताज देव पूजतस!!
आते करू जागर
शे सातवा समेलन नि तय्यारी!
सर्वासले सांगा आते,
नको आडथया मझारी!!
पंचवीस फेब्रुवारी
तारिख ठेवा ध्यानमा!
8 ते 8 वखत
ठासी ल्या मनमा!!
समजेल,उमजेल आन समर्थ
अहिराणी समाज घडावाले!
करेल शे एव्हडी उठाठेव,
तुमले बठ्ठ समजाडाले!!
सर्व सांगाऊ शेतस
भाषानी शिरिमंती अन महत्व!
काय काय शे आपली,
अहिराणी माय न सत्त्व!!
काय काय कराले जोयजे,
आपली संस्कृती वाचाडासाठे !
कसा कसा नि गरज शे आज,
अहिराणी माय जगाडासाठे!!
तवंय ध्यानमा ठेवा
ठेवा मन मा
सर्वासनी हाजरी लावा,
अहिराणी माय ना 7 वा साहित्यसंमेलन नेर तालुका धुय्या मा!!
सौ.मनिषा टिकारामसिंग पाटील,वडगाव, जळगांव