निमित्त:अहिराणी संमेलन, नेर
७ वा अहिराणी संमेलनन्या बठ्ठासले मनफाईन मंगलमय शुभेच्छा सेतीस.
काही दिवसफाई कविता वाची ऱ्हायनू. तव्ह एक मनमा इचार उना, खानदेश मा साहित्यिक लोकेस्कन भरपूर पीक येयेल से. कवी तर बांधेबांध उगी ऱ्हायनात. तशी ती आनंद नी गोष्ट से. पन काही कविता भलत्याच सुमार
वाचामान येई ऱ्हायन्यात.
आपला गाना कविता
देखा तोच तो विषय वाचाले/आयकाले भेटस. मामांनी पोर,,मामींनी थट्टा, बायकोनी तक्रार
याना पलिकडे जावा ले आपण तयार नहीत का? गंज दुनियभरना विषय पडेल सेत.आपलाच सोडा पन
परक्या भाषाना लोकेसन बी वाचाले पाहिजे असं लिखाले पाहिजे. तरच अहिराणी पुढे पुढे जायी ना.
खानदेशमा भलती चांगली प्रतिभा से. हाही जे ७ वं संमेलन भरी ऱ्हायनं हाऊ त्याना मोठा पुरावा से
अवते भवते देखा समाजमा काय घडंस,राजकारण कोनता लेव्हल ले से, मानुसकी कोठे जाई ऱ्हायनी, धरम ना यापार चालू से, माय माता बहिन वर अत्याचार व्हयी ऱ्हायनात. प्रेम करा त्या वर बी लिखा पन सामाजिक भान बी जपा.
चांगला चांगला लोकेसनी ह्या सर्व विषय हातालेळ सेतंस. पन नवीन लेकरं त्याना कडे देखतंस नही आनि खरं म्हणजे वाचतंस नही. अहिराणी मझार चांगलं से ते पहिले वाचा. अभ्यास करा मंग लीखा देखा कितलं
दमदार लिखान बाहेर येयी.
ट ले ट लागना म्हनिसन कविता व्हत नाही.
बोला ना राग धरू नका. अहिराणी माय ना प्रेम पोटे बोलनू .
आज पुरतं बस झाय.
आपला
यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे
बदलापूर
तारीख:- १६/२/२४