अहिराणी कवीता तुयसं
🌿तुयसं🌿
रुप रोपटानं ल्हेस
मन्हा दारसे उगसं
सई-बहिन जशी कां
नाव तुन्हं से तुयसं॥धृ॥
मन्हा साठी व तू-येस
म्हनीसनी तू तुयसं
तुन्हं पहिलं दर्सन
माले पायठे भेटस॥१॥
काम धामले व जीव
मंग मन्हा बी रमसं
तुन्हा दर्सने सक्काय
नित मन्ही व खुलसं॥२॥
नित सुर्यानं किरन
पैले तूच व देखस
तुन्हा दर्सने आर्चने
माले देखाले भेटस॥३॥
तुन्हा मुयेच मिटस
सर्दी खोकला पडस्
मन्हा घर दवाखाना
पैला तूच उघाडस॥४॥
कोन्ही म्हनो तुले देवी
नही फरक पडसं
मन्हा मनम्हा ह्या नातं
सई बहिन नं यसं॥५॥
मन्हा आंगनम्हा तुन्ही
देख मंजिरी फुलसं
तिन्हा संगे मन मन्हं
नित झुलसं डुलसं॥६॥
—निसर्गसखी सौ. मंगला मधुकर रोकडे.
शब्दसृष्टी, प्लाॅट नं ७अ, नारायण नगर,धरणगांव चौफुली रोड, एरंडोल जिल्हा जयगांव.
दूरध्वनी क्र. :-९३७१९०२३०३.
॰॰🌿॰॰🌿॰॰🌿॰॰🌿॰॰🌿॰॰🌿॰॰🌿॰॰🌿
2 thoughts on “अहिराणी कवीता तुयसं”
Comments are closed.