अहिराणी कविता

अहिराणी कविता

मना बापनं वावर

मना बापनं वावर
कोल्लं ठणठणात
टाईमवर‌ नही पाणी
कशी व्हयी अबादानी

बाप राब राब राबस
करस रंगतनं पाणी
त्या काया ढेकायामा
घाम गायस वावरमा

पिकस नही वावरमा
बाप करस अवकया
भेटस नही मालले भाव
आते कोणले सांगी राव

सावकारनं कर्ज नही
फिटस मारस चकरा
हाऊ रोज घडी घडी
कसं बरं आपले सोडी

दिलीप हिरामण पाटील
       कापडणे ता जि धुळे
       मो.९६७३३८९८७३