अहिराणी भाषानीं गोडशेव महाराजा सयाजीराव गायकवाड

महाराजा सयाजीराव गायकवाड म्हणजे अहिराणी भाषानीं गोडशेव

नानाभाऊ माळी
आज महाराजा सयाजीराव गायकवाड यास्नी जयंती से!  
त्या निमतथून आपुन आज जागतीक आहिरनी दिंन साजरा करतस.एक व्यक्ती खान्देशम्हा जलम ल्हेसं आनी बडोदा राजगादीवर राजा म्हनीस्नी बठतंस!बट्ठी खान्देशी माटीलें अभिमान वाटसं!महाराजा यास्नी जयंती निमित्त काही बोल

महाराज सयाजीराव गायकवाड आदर्श राजा महाराज सयाजीराव गायकवाड आधुनिक व पुरोगामी शासक

महाराजा सयाजीराव गायकवाड  जयंती
महाराजा सयाजीराव गायकवाड यास्नी जयंती

अहिराणी भाषानीं गोडशेव महाराजा सयाजीराव गायकवाड

गाडं उराये व्हयन का उचकी जास!उराये व्हयेलं गाडं बैलस्लें जोतेस्घ्हायीं फास लायी उचकी जास!भरनं नेम्मन मव्हरे ऱ्हायन का गाडं ढागेंढागं नीट्टज पयेत ऱ्हास!मांगला पाच सव वरीस फायीन आम्हनी अहिराणी भाषा आशीच पयी ऱ्हायनी!संगे मांगे बठ्ठा शिनगार ल्ही पयी ऱ्हायनी!जितलं जोईजे तितलं सबद भरन ठी जोते नेम्मन बांधी पयी ऱ्हायनी!गाडं
हाकलनारा शेल नेम्मन व्हडी गाडं
तंगाडिं ऱ्हायना!अहिराणी मायन्हा सबद गासोडा आते जागतिक लेव्हल लें जायी भिडनातं!हिरदथून
बोलनारस्ना पसारा वाढी जायेलं से!आम्हनी मायनीं जनम देती भाषानां गाव,खेड, शहर, राज्य इतलंच काय जगम्हा अभिमान वाढेलं से!जगम्हा अभिमानथीन बोलायीं ऱ्हायनी!

मानोस जठे जास तठे नेम्मन उमटी उठस!मनोसन वागनं, बोलनं, चालनं, सभाव आनी भाषा त्यान्ह चरितर व्हयी जासं!मानोस सोतान्ह चरीतर चालता-बोलता संगे मांगे लयी फिरत ऱ्हास!वागाना,बोलानां भाषा  लहेजा पिढी जातनां ऱ्हास!धाकल्पनं फाइन जे दिखस,आयकतंस,बोलतंस तेचं मनम्हा घुसेल ऱ्हास!ते

तोंडम्हा जीभ जठे जठे ठोकायी उच्चार नींघतंस त्या उच्चारन्हा गोमडालें,अक्षरमाया म्हनं ते काय वावगं व्हनारं नही!तोंडंम्हा जीभ गंजज ठिकाने ठोकात ऱ्हास!तोंडंम्हा जठे कोठे ठोकास तठेंग अक्षर उच्चार नींघत ऱ्हातसं!जीभवरी अक्षरे तोंडंम्हा न तोंडंम्हा मिर्ची कांडप मशीनन्हा मायेक  ठोकात ऱ्हातस!जीभ ठोकावामुये उच्चारन्ही धुनी चेटी जास!तठे अर्थ घुशी स्वर आनी व्यंजन सबद जन्मालें येत ऱ्हातसं!ठोकायेल स्वर आणि व्यंजनन्हा सबद अर्थ फोडी मोक्या व्हयी जातंस!जशी भुईमुंगनीं शेंग फोडीफाडी शेंगदाना नींघसं तश्याचं फोडीफाडी गोडीन्हा सबद हारके भरायी मुखे नींघत ऱ्हातसं!

सबदार्थ तोंडम्हा नं तोंडंम्हा गोयमं करी घोयत ऱ्हातंस!गोयमं करेल सबद तगारीम्हा भरी चाहूरवर हुभा ऱ्हायीस्नी हालकी वार्गीम्हा उडावत ऱ्हावो!बीन कामन्ह्या बनग्या,काचोया, बदग उडी जातीस!नको त्या टुक्कार, उलगेल सबद उडी जातंस!अस्सल अहिराणी मायन्हा सेवेकरी सबद नेम्मन खाले चाहूरना पायंजोडे पडतंस!त्या जनम देतीना धुरकरी
ऱ्हातसं!अहिराणी मायन्हा पाय पडतंस!उलगेल बनग्या उडी जातीस!खयानीं वडांगम्हा चोरी दपी बठतसं!

आल्लग-आल्लग गायनी म्हायीन नेम्मन गायीस्नी अर्थफोड व्हतं ऱ्हास!तोंडंम्हानां या मोक्या-चोक्या जीभलें ठोकायेल स्वराक्षर व्हटनां बाहेर पडनातं का भाषानां जनम व्हस!मानोस्ना हिरदना बोल समजी उमजी लेनारं खरं माध्यम भाषा ऱ्हास!अहिराणी भाषा जग दुन्याम्हा
पह्यऱ्हायीं ऱ्हायनी!नवा कव्या
जरत कोंब उगी भाषानीं  गोडी वाढी ऱ्हायनी!कयकयथुन बोलेलं सामने वालान्हा डोकाम्हा घुसी ऱ्हायनी !

बठ्ठा खान्देशी भाऊ-बहिणी अहिराणी भाषानं खान्देशी भरीत व्हाडी ऱ्हायनातं!अहिराणी भाषानं न्यामीन भरीत नेम्मन चव दि ऱ्हायन!आते आडकन लायेलं ताटम्हा भरीतवर नजर जायी ऱ्हायनी!हिरदनी भाषानीं समज यीं ऱ्हायनी!हायी निक्खारं जोर्बन चव दि ऱ्हायन!तुम्हलें काय म्हननं से ते मव्हरलाले नेम्मन समज यीं ऱ्हायनी!सबदार्थ बांधेल साखयन्ह्या एक एक कड्या अहिराणी भाषालें सजाडी ऱ्हायनात!भाषिक संवादन्ह नव्व शिंगरू जनम लिसनी हुभ ऱ्हायीस्नी घोडं व्हयी पयी ऱ्हायन!

कोस कोस दूरवर भाषा बदलत ऱ्हास!अहिराणी बोली भाषा नेम्मन झाकेलं तोंडंन्ही से!मान पानन्हा पलो लेंयेल से!मोजी मापी सबदस्ना झाकनघायी झाकायीं ऱ्हायनी!अहिराणी भाषा सबद पलो लिसनी आते चौम्हेर भवडी ऱ्हायनी!धुये, जयगाव, नंदुरबार नाशिकसोडी मुंबई, पूणे,चलथान,सुरत, बडोदामार्गे mp म्हा घुसी खेता,पानसेमल, चिखलदा, मोयदा,दोंडवाडा मार्गे अहिराणीनं नातं गोत वाढायीं ऱ्हायनी!


जागतिक अहिराणी भाषा दिन

आज अहिराणी गौरव दिन से! जागतिक अहिराणी भाषा दिन से. आस्सल आनभवनां खजिना से!अहिराणी मायना जागर व्हयी ऱ्हायना!जागलक्या जागल करी
ऱ्हायनात!आंधाराम्हा दपाडेलं अहीरांनी अस्सल सोनं आते चौम्हेर चमकी ऱ्हायन!मानोस जित्ता ऱ्हावानी निशानीं भाषा ऱ्हास!जगान्ह गुणकारी औसध ऱ्हास!भाषा मायंतोंडे शिकी आपुन मोठा व्हतस!आंबानी कोंयी चोखी पुर्र मन गरात नही!तशी जनमन्ही भाषा बोला बिगर पोट भरत नही!अहिराणी भाषालें अथीतथी तगतराव वर बसाडी,पालखीवर बसाडी मीरावूत!आजारी मानोस्लें औसद बरं करस!पन हिरदन्हा कोनी मानोस भेटना, आपली भाषाम्हा बोलना का आजारी मानोस
फटकाम्हा बरा व्हयी जास!हिरदना बोलम्हा गुनकारी सबद कालायीं कुलायी आपली भाषा जनम ल्हेस!आज मन्ही अहिराणी भाषानां गौरव दिन से!आखाजी जोडे यीं ऱ्हायनी मायनां पायंजोडे बठी,तिन्हा मांडीवर बठी आखो सबद सवसार वाढत ऱ्हायी!

अहिराणी भाषानीं गोडशेव महाराजा सयाजीराव गायकवाड
अहिराणी भाषानीं गोडशेव महाराजा सयाजीराव गायकवाड


      
नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धूळे)
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
दिनांक-११ मार्च २०२४

स्वतंत्र भारताच्या आधुनिकीकरणचा शेवटचा राजा श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड

अहिराणी पर्व