Table of Contents
खान्देशी अहिराणी ईतिवृत्त ईतिवृत्त ७ वं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलन
आपला खान्देशनी बोलीभाषा अहिरानीमायना बठ्ठान बठ्ठा जागलकरी भावड्यासहोन, आयाभैनीसहोन आन मन्ह्या मायआंड्रीसहोन नमस्कार! ईतिवृत्त ७ वं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलन
कालदिन नेर, जि. धुये आठे पार पडेल ७ वं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलन आटपीसन तुमीन आपापला घरे भिडी ग्यात आसा येरायेरेसले निरपे दी सनी मांघना महिनाभरफाईन डोकावर जो तान तनाव व्हता तो सम्दा ईसरीसन खाटलावर आंग टाकताच डोकावर्हनं वझं हालकं व्हयनं आसं समजीसनी बिनफिकीर जपी ग्यात व्हतीन. काहीसन्या जपा आदलगून पु-या व्हयन्याच नई व्हतीन म्हनीसनी मी रामपाह्यराम्हा उठीसनी हाई ईतिवृत्त लिखाले बठनू!
हाई नेर गाव ईतिवृत्त ७ वं अखिल भारतीय अहिरानी साहित्य संमेलन
हाई नेर गाव नेमकं कथा शे यान्हा सोद तपास करता करता ह्या नेर कुसुंबा दोन शेतंस आसं माले कयनं. एक आथा धुये जिल्हाम्हा आन दुसरं तथा जयगाव जिल्हाम्हा शे आसं म्हाईत पडनं!
सक्काय पाच वाजाना पह्यलेच उठनू, आंघोय मिंघोय करीसनी बसस्टॕनवर जाई भिडताच तठे धुये गाडी हुबी दखावताच तिम्हा जाई बठनू. आठ वाजतलगून धुयाले भिडनू ते तठेबी नेर गाडी नेकटीच लागेल दखायनी. तिम्हा बठूत आसा ईच्यारज करी र्हायन्तू तवसाम्हान कंडक्टरदादाना सीटना मांघनी सीटवर माले आपला खान्देशरत्न, खान्देशभूषन, तुम्हना मन्हा आसा सम्दासना गयाम्हाना ताईत, आपला आवडता आप्पासाहेब विश्राम बिरारी सर दखावताच मी त्येसना पायवर डोक ठेवाले लवना व्हयनू आन पाय पडीसन त्येसना जोगे जाई बठनू.
आप्पासाहेब हाई यक्तिमत्व माले भू म्हनजे भूच वंदनीय शे, हाई ते तुम्हले समदासले ठाऊकच शे! एक हरहुन्नरी, बहूआयामी, हरफनमौला, अष्टपैलू आसा बहूगूनसंपन्न शिवाय तितलाच निगर्वी, विनम्र, सौजन्यशील, अजातशत्रू आसा साक्षात देवरुपी आप्पासनं सक्काय सक्कायम्हा दर्सन व्हताच माले मी नेरनं संमेलनले भीडी गवू आसं वाटाबिचूक नै र्हायनं खरं सांगस मी तुम्हले.
नेर गावम्हा
गाडी जशी नेरकडे जावाले निंघनी तसा आप्पासाहेब आपल्या जिवानपनन्या आठोनी सांगाले लागनात. आजफाईन साठ वरीस पह्यले आप्पासाहेबसनी नेरले एक सालभर साठे बदली व्हयेल व्हती. त्या कायम्हा भू सस्ताई व्हती. आप्पासाहेबले एकशे तेवीस रुपये पगार व्हता. नेरले जावाले एक रुपया तिकीट व्हतं. रोज जावा येवाले दोन रुपया लागेत. आश्या आथातथान्या गप्पा मारता मारता आमीन जाई भिडनूत त्या नेर फाटावर. कंडक्टर भावड्यानी आप्पानत्येसनासंगे वयखपायख निंघनी म्हनीसनी त्येन्ही आप्पासनी जठे सांगं तठे आम्हले उतारी दिधं.
तठून पायेपाये बालाजी लॉन्सलगून भिडतस नै तवशीन डॉ. सदाशिवदादा सूर्यवंशी, रमेशदादा बोरसे, सुभाषदादा अहिरे ह्या बठ्ठान बठ्ठा मानवाईक मान्यवर मेढ्या आम्हले दखावताच जीवम्हा जीव वना! बहुतेक डॉ. सदाशिवदादाले आम्ही दखाईगवूत व्हतीन म्हनीसनी त्यासनी ती त्यासनासारखीच मस्त सुंदर, देखनी कार हुबी कई आन आम्हले ल्हीसनी तथा नेर गावम्हा जठीन दींडी निंघन्हार व्हती तठलगून पौचाडी दीधं.
हाऊ सदाशिवदादाले गाडी चलाडताना दखताना एक नवल वाटनं ते आसं का हाऊ भावड्या, एकहातेवरी कार चलाडता चलाडता दुसरा हातम्हाना फोन कानले लाईसनी वटम्हा बोलत बोलत त्या आवाढासा चिर्होटीनामायेक रस्तावरथीन मोक्याचोक्या बिन्धास गाडी चलाडी र्हायन्था. काहीच टेन्शन नै का काही नै! मी न मी निस्ता घाबरी र्हायंथू का हाऊ भाऊ न जानो दे ठोकी एखांदी हातगाडीले नै ते मोटरसायकलले! पन नै! पठ्ठानं गाडी चलाडनंबी सुरु, आन फोनवरबी बोलनं सुरुच सुरु!
बालाजी लॉन्सना तो हॉल गचागच भरी ग्या
गावम्हा भिडनूत भो एकडावना. भावड्यासहोन आठली जी यवस्था व्हती ती दखालायक व्हती. धाकल्ला धाकल्ला पोर्हे पोर्ही मस्तपैकी धोतर लुगडा नेसीसनी काई हातम्हा लेझीम ल्हीसनी तालसूरम्हा नाचीकुदी र्हायन्थात. महात्मा ज्योतिबा फुलेसनी पूज्याबिजा काई हार अर्पन करीसनी हाई ग्रंथ दींडी गावम्हाईन वाजतगाजत अहिरानीमायबोलीनं कवतिक गात गात कार्यकरमना ठिकाने येतलगून गावम्हातला जेठामोठा काई आया भैनी सामील व्हत व्हत बालाजी लॉन्सना तो हॉल गचागच भरी ग्या भो! कार्यकरमना सुत्रसंचालन करन्हारा, निवेदक, संयोजक ह्या बठ्ठासनी एकच गर्दी करनी लाई तठे.
माले तठे एक आल्लगच आनभव आसा वना का, काही काही लोकेसले कोठे काय बोलवो आन काय नै बोलवो यान्हं भानच नई र्हात. निरानाम गोंधई जातंस त्या. त्याच नै हो, जर आपीन बी त्येसना जागावर र्हायनूतना ते तीच गत व्हस आपलीबी! बठ्ठा कालाकतला व्हई जास. कोन्ही कोन्ही ते आपला आपला खेय मांडागुन्ता नेम्मन नबूतनी येळ दखत र्हातंस. त्या बरोब्बर येळ दखी खेळ मांडतंस! त्यास्ना म्हझारम्हा त्या कोनले बोलूबी नै देतंस, एकदम, हम करे सो कायदा! नुकसान व्हवो का फायदा!
गरज सरो आन वईद मरो!
बैझू! त्या आवल्हा आवल्हा पोर्हे पोर्ही देहेड दोन किलोमीटर पायपीट करत करत, नाचत कुदत तठे हॉलम्हा वनात. पोर्हेभाई पोर्हेचना त्या? त्येसले चांगलं समजाडी सुमजाडी गपचूप करानं र्हायनं एक कडे आन एकझन लाऊडस्पीकरवरथीन आल्लाया मारी मारी सांगे का, आते शायना पोर्हे पोर्हीसनी आपापला घरे निंघी जावो! त्येसनं जे काम व्हतं ते आते व्हई जायेल शे!हाई आयकीसनी माले भू वाईट वाटनं! त्येसनी कार्यकरमनी आव्हढी सोभा व्हाडाई आन त्यासलेच म्हनतंस का आते तुम्हनं काम सरनं! यालेच म्हनतस गरज सरो आन वईद मरो! शायना पोर्हे पोर्ही घरेघर निंघी गेल्यावर रितसर शांतताखाल निचितवार पुनाईन कार्यकरमले सुर्वात व्हयनी.
डॉ. सदाशिवदादानी हारहमेशानागत सदाबहार प्रस्तावना. मान्यवर पैपाव्हनासना तितलाच जोरबन आदर-सत्कार, खुमासदार, प्रबोधन करन्हारा आसा एकथीन एक भाषने म्हन्जे जशीकाय त्या पुरनपोईनागत गोड धोड, रसई-भात, कुल्लाया-पापडेसनामायेक चटकदार, मसालेदार मेजवानीच वाटनी माले ते ती.
सरंपच र्हायेल भास्करराव पेरे सायेबसनी
अठ्ठाईस वरीसफाईन सरंपच र्हायेल भास्करराव पेरे सायेबसनी आपला आनभवना बोल आयकाडता आयकाडता आख्ख संमेलन गाजाडी टाकं. घरना आंगनम्हा, वावरेसम्हा, रस्ताधरी, पडित जागावर फयझाडे लावा, गाव झाडीझुडीसनी स्वच्छ ठेवा, शुद्ध हवा, शुद्ध पानी, भायेरनं खाऊ नका, पोर्हे पोर्हीसले शिकाडा, आशा एकथीन एक सुखसोई त्यासना गावम्हा त्येसनी सुरु करेल शेतीस हाई आयकीसनी माले ते आसं वाटी र्हायनं का, ते गाव मी कईन जाई दखस नी कईन नै! आजलगून येगयेगळा चार कोटीना पुरस्कार त्येसले प्राप्त व्हयेल शेतंस,
हाई खरी प्रगतीनं आपला भारतम्हानच नई जगम्हानं एकमेव उदाहरन आशी आसं मी छातीठोकपने सांगस. येन्हा नंतरनं अध्यक्षीय भाषनबी खूप अभ्यासपूर्न व्हयनं. दखा भावड्यासहोन ह्या दोन्ही मान्यवरेसना जर नीट नेम्मन ईच्यार कया ते त्या, ना ते प्राध्यापक शेतंस ना शिक्षनक्षेत्राम्हातला कोनी नवाजेल बिवाजेल वक्ता शेतंस ना राजकीय पुढारी बिढारी शेतंस. पन त्यासना भाषनेसम्हा जी आत्मियता, सामाजिक भांदिलकी, देशप्रेम दखायनं तेले ते तोडच नई हो मायन्यान भो आजिबात तोड नै!
परिसंवादबी कथाकथन कवीसम्मेलन्या बठ्याच फे-या ठसकेबाज
नंतरना परिसंवादबी नमूदबनच व्हयनात. कथाकथन बी एक नंबर व्हयनं. कवीसम्मेलन्या बठ्याच फे-या ठसकेबाज विशेष म्हनजे मराठीथून लाखपट भारी. त्याम्हातली पह्यली फेरीम्हातली माया साळुंकेनं सादरीकरन वज्जी भारी व्हतं. खरं दखाले गयं ते, कवीले जी कविता सादर करानी शे, ती तेले तोंडपाठच जोयजे! अहिरानी कविता सादर करताना ज्येसनी ज्येसनी गाईसनी कविता सादर कयात त्येन्हाम्हा मराठीसारखा एकसारखेपना नई वाटना हाई गोट नमूद करालाईक शे! ह्या कवीसम्मेलनम्हातला सुत्रसंचालकबी वज्जी तरबेज आन बिलकुल तयार दखावनात! रमेशदादा धनगर, न्यानेसर मावली आन बाकीना बठ्ठासनीच जीव वतीसनी कईता काई गझला सादर कयात!
पन भावड्यासहोन तुमीन गाना लिखताना आन म्हनताना एक भू भारी चूक कर्तस, ती आशी का, ज्या यमक तुमीन जुडावतसना त्यासना भावार्थबी नेम्मन जुडालेच जोयजेल आसाच यमक ल्हेत जावा! नैते, निस्ता ट ला ट आन री ला री! जन म्हने काव्य करन्हारी!! आसं नै करवो! लय किंवा चालवर जोर न देता ती रचना उपमा, उत्प्रेक्षा आशी अलंकृत करत करत जावो.
ह्या संमेलनना समारोपीय तानतनावना बाबतम्हा, मन्ही पाटी निरानाम कोरी शे!
अहिरानी मायबोलीले उचली धरानी खूप गरज
भावड्यासहोन! आपली अहिरानी मायबोलीले उचली धरानी खूप गरज शे. बापूसाहेब हटकर आन बाकी बठ्ठानबठ्ठा जेठा मोठा विचारवंत जीव तोडी तोडी सांगतंस पन आझून जसा जोयजेल तसा उठाव, तसी पोटतिडीक, तसी झूंज देवानी ताकत, खव्वी उठानी जीद जदलगून हारेक अहिरानी मायबोलीना जागलकरीसले वाटाव नई तदलगून काहीच हाते लागाव नई! आपली भाषा न्यारी जोयजे आपले आपलं राज्यबी न्यारंच जोयजे! बोला! काय म्हन्तस याव्हर तुमीन? भावड्यासहोन जाता जाता ह्या संमेलनम्हाना एक खेसरगम्मतवर मातर बोलनंच पडी. त्येन्हाबिगर हाई ईतिवृत्त आपूरच र्हाई!
आपन ह्या संमालनम्हा काही खेसरगमती आयक्यात त्याम्हातली एक खेसरगम्मत आशी व्हती, मैं ऊस के बिना नही रह सकती!
भावड्यासहोन मराठी, अहिरानी भाषाम्हातला ऊस म्हनजे हावू समदासलेच समजस. पन हाई गोट हिंदी भाश्यानी खेसरगम्मतले लागूच नई पडंस. कारन हिंदी शाषाम्हा ऊस ले ईख नै ते गन्ना म्हनतंस!
खेसरगम्मत करोना जरुर करो, पन त्यान्हा आर्थ-बिर्थ समजीउमजीसनी करो
चला ते मंगन आते मी तुम्हनी रजा ल्हेस आन थांबस आठे!
पुढना साले डॉ. एस. के. पाटील साहेबसनी आठवं अखिल भारतीय साहित्य संमेलन तथा दाभाडीले भरावानं आगावू निवतं आपूनले दी ठेयेलच शे!
तुम्हना बठ्ठासना वतीथीन मी बी त्यासना आभार मानस!
शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसगाव, जि. जयगाव.