लाह्या अहिरानी कईतासना संग्रह

लाह्या अहिरानी कईतासना संग्रह



सुप्रसिद्ध साहित्यिक मा. सुभाषदादा अहिरे यास्ना बहूमोल मार्गदर्शनम्हा प्रकाशित व्हयेल आन डॉ.फुला बागूल सरेससारखा साहित्यिकनी प्रस्तावनानं भाग्य लाभेल तसच मनोज गांधलीकर यासनी सजाडेल मुखपृष्ठ शिवाय त्येन्हाच मांघे एक माऊली लाह्या भुंजताना दखाडेल आसं हाई वज्जी भारी पुस्तक माले नानाभाऊ माळी यासनी भेट म्हनीसन कईसनं देयेल व्हतं. कालदिन जयगावथीन मन्ही मोठी आंडेरनी तिनकडे र्हायेल मन्हा कपडा आन काही पुस्तके आज मन्हा हवाले कयात, त्याम्हा हाई लाह्या नावनं नानाभाऊ माळी यासनी लिखेल पुस्तकम्हा नानाभाऊनं बहारदार, खुमासदार मनोगत वाचताच मी हाई पुस्तक झपाटेलसारखं फटकाम्हा वाची काढं.
तसं दखाले गयं ते नानाभाऊनत्यासना साहित्यनासंगे काहीच संबंध नै शे. त्या का शिक्षक, प्राध्यापक शेतस का काय? बिलकुलबी नई हो! पन त्येसनी लेखनशैली हाई खूपच दर्जेदार, दमदार तितलीच धारदार आशी शे! त्या जे लिखतस ते थेट सरय हिरदयले जाई भिडंस, एखांदा विषयवर जव्हय त्या लिखतंस तव्हय त्या विषयना समदानसमदा पदरे वाचकस्ना मव्हरे मोकया करीसनी आपली बाजू चवचतराईवार मांडतंस. हाऊ आनभव मी देहेड दोन वरीसफाईन ल्ही र्रायनू, म्हनीसनी लाह्या नितातेलसारखा वाचाले लटकनू ते शेवटनी बावन्नावी कईता वाचीसनीच दम ल्हिधा. ह्या काव्यसंग्रहाम्हानली पह्यलीच कईता मनले भिडी गई.
वाऊम्हा फिरन्यात उलट्या सुलट्या, जगनं दुःख झेलाले!
फुगना आकार लाहीना लाग्यात मोक्या चोक्या उडाले!!
नानाभाऊनी कल्पकता खूपच तुफान शे! त्यासनी आपला कईतासना मथयाबी भू आर्थपूर्न ठेयेल शेतंस घट्यामा दाना कारभारी आसा
चटकदार शिर्षक वापरीसनी धमाल उडाई देयेल दखावस. नानाभाऊ माळीनं आन वावरम्हा राबन्हारा शेतकरी, कामगार, शेतमजूर आसा बठ्ठानबठ्ठासनं नातं भू जवयनं शे! तेसले मया खयानं सखोल न्यानबी शे!
डोया मव्हरे भुक्या तिस्या, गोल फिरस डोकावरना याय!
समाई – सुमाई र्हाय पो-या सिकी जासी साय!!
आसी आपला आवते भवते चौफेर नजर फिराईसनी बठीन बठ्ठी शिरस्टी डोयासमव्हरे गरागर गरागर फिरावत ठेवानं कसब नानाभाऊनत्यासले भू भारी जमस!
र्हायेल दिन मोजाना
धीरे धीरे पखे पोर्हेसना दनगट व्हई ग्यात!
!एक एक करी करी सोताना खोपाम्हा दूर ऊडी ग्यात!!
आसा ह्या चटाचटट आन पटापट फुटन्हा-या लाह्या! परतेकना घरेघर जावाले जोयजेल!
मानूस फिरस बैल फिरस, फिरावस पायेंत गोल!
फिरता फिरता हेटे वर, समजंस खुटानं मोल!!
सवसार फिरावस गोल, जाता जाता हातम्हा र्हास काय?
नाकले भांदेल नात घाई, फिरतंस गोल दहा पाय!
जुनी शेती करानी पद्धत आते मुडत चालनी. आते ट्रॕक्करे वुनात.
वडांग तोडी खयाम्हा, घुस्न आते ट्रॕक्टर!
निर्जीव लोखंड्या नांगर, झाया अॕक्टर!
आखो कितलं लिखो आन कितलं नई
आसं मन्ह मन करस आसा हावू लाह्या कईतासंग्रह १३/०५/२०१३ रोजे परकाशित व्हयेल आसना तरी तो माले कालदिनच परकाशित व्हयेलसारखा नईन वाटंस. समाजप्रबोधन घडावन्हारा आनी एक नईन दिशा दखाडन्हारा मार्गदर्शकच वाटंस माले हावू लाह्या कईता संग्रह!
नानाभाऊ माळी यासना कडथून लाह्या सारखाच वैचारिक, चिंतनशील आसाच खूप खूप पुस्तके प्रकाशित व्हत र्हावोत आसा त्येसले आशिर्वाद देस आन थांबस!

शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसगाव, जि. जयगाव,

भावड्यासहोन माले माफ करा!
ह्या लाह्यासवर आखो थोडं लिखानं बाकी र्हाई जाएल शे!
खानदेसना माटीम्हा जलम लेयेय नानाभाऊले पार तथा शिंदखेडा फाईन ते आथा च्याईसगाव जयगाव, धुये नाशिक, साक्री नंदुरबार भागनी खडानखडा म्हाईती शे. कोठे काय पिकस, कोठे पानीपाऊस कसा शे! कोठे कायम दुष्कायनं संकट दैतना मायेक शेतकरीसनी सत्वपरीक्षा ल्हेस हाई बठ्ठ तोंडेपाठ शे! आपला आजोळना बाराम्हा लिखताना त्येसनी जे लिखेल शे ते भूच भारी लिखेल शे!
नानाभाऊ लिखतंस का आम्हना घरना मांघे नीम आन निमले लागीसनज सातपुडा शे! जेले सकाय उठा बरबरच रामपाह्यराम्हा सातपुडानं दर्सन व्हस व्हई तो सातपुडाना बाराम्हा आखो काय लिखी हो? काय लिखी?
नानाभाऊनी निस्त्या शेती-माटीवरच कईता लिखेस नईत, त्येसनी एकत्र कुटुंब पद्धतम्हा जितला नातलग खेईमेईखाल र्हातंस त्या बठ्ठासवरबी लिखेल शे. त्येसनी माय शंभरी पार करी गई, मोठा ज्येठा भाऊबन आन त्यासना पोर्हेसोरे आसा मनमनतसा कुटुंबपसारा शे आन त्येसनं आपसम्हानं जे हेतपिरेम शे ते ते नजर लागा लायकच शे. मी सोता हाऊ आनभव ल्हेयेल शे.
साहित्यप्रेमी मानूस म्हन्त का त्येले समदा रसेसनं न्यान जोयजेचना?
नानाभाऊना रंघतम्हा साहित्यना बठ्ठा नवना नव रस सयसय सयसय करतंस हाई माले लाह्या सम्हा दखावनं.
शाया कॉलेजम्हा शिकनारी पोर जानजिवान छैलछबिलासकडे कसी दखस हाई सांगताना तिन्हा साखरपुडा व्हुई गेल्यावर नानाभाऊना हातवर पेढा दीसनी मव्हरे निंघी जास तधय तो पेढा हातम्हाना हातम्हा कसा चोयामोया व्हुईसनी गई जास हाई नजर चगाडी दखस* याम्हा हुबेहुब चितारेल शे! तसंच सालीनी खेसर हाई कईताबी खेडापाडासना जनजीवनम्हा कसी रुजाई जाएल, एकरुप व्हईजाएल दखाडेल शे!
तसं दखाले गयं ते मी सोताबी चौदा पंधरा वरीसना व्हतू तईनफाईन कईता लिखत वनू पन अहिरानी भाषाम्हा लिखताना माले भारी आडचनी येतीस. भूत भू मी चौंदा नै ते सोया नै ते जास्तीत जास्ती वीस ओईसनी कईता लिखी काढस, पन हाऊ नानाभाऊन्या लाह्या मातर आशा फटाफट फुटेल शेतीस का तिसले ओईसनी मर्यादाच म्हाईत नई. एकएक कईता कमीत ते कमीत वीस ओईसन्या वरच शे. काही काही ते चांगल्या तीस च्याईसना वर्हे कुदी जाएल दखावन्यात! तुमीन माले काहीबी म्हना पन मी ह्या नानाभाऊ माळीले आह्यरानीना बिलंदर भावड्याच म्हनसू. न्यानेसर मावलीच म्हनसू!
बोला तुमन्ह काय मत शे याव्हर?

img 20240116 wa00211994293203246625053
लाह्या अहिरानी कईतासना संग्रह

3 thoughts on “लाह्या अहिरानी कईतासना संग्रह”

  1. आज मी गह्यरा ईच्यारम्हा पडी गवू कारन तुमीन हाई समिक्षन लगेजना लगेज परकाशित करीसनी माले उपकृत कये आसं म्हनापरीस मी आसं म्हनसू का अहिरानी मायबोलीना परच्यार आन प्रसार करन्हारा खान्देशी ब्लाॕगवर आनी ठी दीधं हावू म्हावर एक परकारे उपकारच कया! तुमीन! तुम्हना आभार मानाले मन्हाजोडे सब्देच नई शेतंस! भू आभारी शे मी तुम्हना ! मायन्यान भो!!!!!!

Comments are closed.