बांध जुडी नी सोड पुडी

बांध जुडी नी सोड पुडी

बांध जुडी, नी सोड पुडी
खान्देश ना पुढारीस्नी आशी गत शे.. निवडणुका यी ह्रायन्ह्यात तेन्हामुये आते पुड्या सोडान काम जोरबंद चालु शे.अमयनेरना दादा म्हणस ८५० कोटीना उपसा सिंचन प्रकल्पले मान्यता, पाडळसर धरण म्हायीन पाणी उचलसु, नयस्मा पाणीच पाणी यीन… मव्हरल्या पन्नास पिढ्यास्ले म्हणे पाणी पुरीन… वा! काय महान नेता शेत आप्ला… पाडळसर धरण पूर व्हयेल नही… ते आजुन बी निमाये शे…..

सध्या दादा लोकस्ले राजकीय लव्ह फिव्हर व्हयेल शे. आते एक दादा म्हणस गिरणा म्हायीन मन्याड धरण मजार पाणी टाकसु… अहो महाशय *नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पा न नुस्त गाजर दिन्ह सरकारनी तरी आप्ला नेता जोरबन टिंगर ठोकाले लागी ग्यात, पण हाऊ प्रकल्प खरा शे का खोटा शे येन्हा तपास बी करा नही. बर खरा व्हयीन ते मंग १० टीएमसीवर काय व्हयीन. ३८ हजार हेक्टर सिंचन कसामादेनी जमीन वल्ली कोल्ली व्हस… तुम्ले भेटस १८ हजार हेक्टर… तरी बी कोंड्या खुशाल शेत. दादा मन्याड धरण मजार पाणी टाकन व्हयीन ते ३० टीएमसी करता बुक ठोका… सरकार यीन जायीन, तुम्हन्या आमदारक्या, खासदारक्या जातीन, येतीन… पण खान्देश ना वाळवंट जर झाया ते मंग पिढ्या न पिढ्या बरबाद व्हतीन तेन्ह काय?

तिकीट करता, निवडी येव्हा करता, नका बांड्या न घरन  चुलाले निवत द्या. खर म्हणजे खान्देश ना पुढारी निशेल शेत (निर्लज्ज) तेस्ले काहीच फरक पडत नही. खान्देश ना सयरस्मा कितला दिन मजार पेव्हान पाणी येस? इचार करा. दादा, भाऊ,आप्पा, ज्या गिरणा नदी ले माय म्हणनारस्ले नाव ठेवतस… पण गिरणा मायनी रेती चोरीसन तिन्हा पुरा लचका येस्नी तोडात, येस्ना सगा सोयरास्नी बी रेती चोरीसन आप्ला बोखारा तंग करी लेल शेत. म्हणीसन येस्ले काही फरक पडत नही, पयसासवर मतदान व्हस, माणस इकावतस, हायी खान्देश ना पुढारीस्ले माहित शे…


पण ह्या येले खान्देश हित संग्राम.. रस्तावर उतरीनच! जो खान्देश हित की बात करेगा, वही खान्देश पर राज करेगा आते हायी बंद करा.. खरा न खोट नी शिंनायस्नी खान्देश लुट
प्रवक्ता
खान्देश हित संग्राम