गूढं लागांमव्हरे लगीनघायी khandeshi language words
गूढं लागांमव्हरे लगीनघायी
२८ एप्रिललें आयतवार व्हता! लगीनन्ही मोठी तिथ व्हती!मव्हरे गूढ लागणार से!सव्वा एक महिनापावूत लग्ने ऱ्हावावूतं नई!थंड बठनं पडनार से!जो तो गुढ लागांमव्हरे लग्नेस्न्या तिथा, मुहूर्त काढी लगीनन्हा बार उडायी ऱ्हायनात!गाड्या-मोट्रा बठ्ठया खुंदी खुंदी कपाशी भरो तश्या, लोकेस्न्या भरी भरी लग्ने लावाले पयी ऱ्हायन्यात!एसटी म्हनो,जीभडा म्हनो दडपायी-दुडपायी लोके भरी पयी ऱ्हायन्यात!त्याम्हा उंडायांना चटका आनी घाम जीव गुदमरालें लायी ऱ्हायना!डुकऱ्या रिक्शास्मझार मांगे मव्हरे मोजीस्नी पाच लोके बठतसं!पन तीम्हा दडपायी-दुडपायी धाकला -मोठा धरीस्नी २०-२० लोके बसाडी लिदात!
लगीनन्ह ठिकान येवा पावूत गुदमरांयेल जिवडा पुरा झामलांयेलनां मायेक व्हयी जास!मी भी २८ एप्रिल ना आयतवारे लगीनल्हे गयथु धुयाथीन दोंडाईचा पावूत,हुभा ना हुभा ठोकलायनू!काने कोपरे उभं ऱ्हावालें जागा भेटनी हायीचं नसीब समजेल व्हतं!!दोंडाईचानी नदीनां टापवर एसटी उभी ऱ्हायनी तशी दडपायेलं कपाशी फुली बाहेर फेकास तशी आम्ही दरवाजाबाहेर पडनूत!एसटीम्हा घाम चाली ऱ्हायंता!उतरता बरोबर मोके वाटन पन वरतीन सूर्यदेव चुलांगेनं खोली हुभा व्हता!आग वकी ऱ्हायंता!संगे मन्हा आठ वरीस्ना नातू व्हता!
तो ते उनम्हा पक्का झामलायी जायेल व्हता!त्यान्हा डोकावर टोपी ठिसनी तोंडं मन्हा रुमालघाई बांधी दिथं!त्यांनसंगे गोड बोलत बोलत दुपारनाभरे देड किलोमीटर चालत चालत संतोषी माता मंदिरं फाइन लगीनन्हा मांडे जायी भीडनूत!उनमुये तीस लागेल व्हती!मांडोम्हा भिडता बरोब्बर आम्ही दोन्हीस्नी एक एक गल्लास पानी पी लिध!तीस भागाडीस्नी,ज्या कोपराम्हा कूलर लायेलं व्हत,त्यांनमव्हरे जायी बठनूत!कसानं काय हो?कूलरन्हा पंखा बीन पानीन्हा चाली ऱ्हायंता!आंगवर निस्ती हुनी वार्गी यी ऱ्हायंती!
लगीनन्हा मांडो मातर भू भारी व्हता!दखतंच ऱ्हावो असा व्हता!लगीनन्हा ठिकानें गायक-गायिका गाणं बोल ऱ्हायंतात!वयख-पायखनां लोके भेटनात!मांडोनां बाहेर अर्केस्ट्रानां आवाज यी ऱ्हायंता!तितलाम्हा
जेवणन्ही पंगत सुरु व्हयी गयी!लगीन लागांमव्हरे पंक्ती चालू व्हयी गयत्यात!आते असा हाऊ फंडा चालू व्हयी जायेल से!जेवनारस्नी गर्दी व्हती!मी भरेलं ताठम्हा दखी दखी जेवण करी ऱ्हायंतू!मनमांगे जेवणगुंता नंबर लायी लोके हुभा व्हतात!मी खावली ऱ्हायंतू!मी कुमचांडी जेवनू!वरतीन दुन्यान्ह धपी ऱ्हायंत!जेवनन्हा हुना हुना ताठ सरी ऱ्हायंता!हुन हुन उन धपाडी ऱ्हायंत!घामलायी,कुमचाडी जी ऱ्हायंतू!पलास्टिकना गल्लास्मानं थंडगार पानी गये-नये उतरी ऱ्हायंत!पानी घटाघट गये उतरी ऱ्हायंत!तथा नवरदेव बँडबाजामांगे देवना पारवर जायेल व्हता!
लगीन एकदावंच व्हस!नवरदेव ४२ डिग्री तपमानम्हा,भर उनम्हा घोडावर बठी यी ऱ्हायंता!बँडवाजांमांगे नाचनारा नाची ऱ्हायंतात!आपली हाऊस भागाडी ऱ्हायंतात!उंनन्हा चटका इसरी वऱ्हाड नाची ऱ्हायंत!उनन्हा चटकाल्हे तऱ्हे दि, काना डोया करी नवर देवना आंगे मांगे पोरे नाची ऱ्हायंतात!
आथा टेजवरतून पीकरवर आवाज यी ऱ्हायंता!लगीनलें येल पाव्हना पयीस्न स्वागत व्हयी ऱ्हायंत!पिकर वरथीन नवरीना मामा, नवरदेवना मामानां पुकारा व्हयी ऱ्हायंता!नाची कुदी थकी वऱ्हाड मांडोम्हा यी ऱ्हायंत!नवरदेव मांडोन्हा दारवर यी हुभा ऱ्हायना!टेजगंमतून नवरी उनी!नवरदेव-नवरी दोन्ही सजाडेल सिंहासनवर बठी टेजगंम जायीऱ्हायंतात!दुन्यानभायेर गर्दी येल व्हती!टेज आनी मांडोम्हा वऱ्हाड म्हायी नयी ऱ्हायंत!नवरदेव नवरीना माय-बापस्नी लोकेस्ना संग्रोह करी ठेयेल व्हता!लोकेस्न पेरेम जोडी ठेयेल व्हतं!आपुन जे पहेरंसूत ते उगत ऱ्हास!लगीनल्हे दुन्यांनी गर्दी येल व्हती!हायी पहिरेलं व्हत!उगेलं दिखी ऱ्हायंत!
बाम्हन भटजी काकानी मंगलाष्टक सुरु कयी!पवतीर,मंगल सबदस्मझार अक्षदा नवरदेव नवरीना आंगवर पडी ऱ्हायंतात!वाजा वाजना तसा लक्ष्मी नारायणन्हा जोडानीं येरायेरन्हा गयाम्हा फुल माया टाक्यात!जग दुन्यालें साक्षीदार ठिस्नी लगीन लागनं!माय-बापन्हा डोयांसले आननंन्हा आंसू व्हायेल दिखनातं!जिंदगीनं कर्तव्य पूर व्हयन!आननंम्हा लागीन लागन!
लगीन लागताचं भर उनम्हा लोकेस्न्या चुंग्या नं चुंग्या गाड्या मोट्रास्वर बठी आपाआपला गावें निंघी ऱ्हायंतात!मी आनी नातू सूर्यादेवले डोकावर बठाडी संतोषीमातानां टापवर उनुत!धु्यांगम जावालें एकभी गाडी थांबें नई!डोकावर उन झेली झेली थांबनूत!कयीक जुगम्हा एक तीन चाकी डुकरी रिक्शा भेटनी!पाच सीटवाली रिक्शाम्हा कोंबी कांबी २० जन कोंबायनूत!मी नेम्मन मांगे बठेल व्हतू!अर्धा उनम्हा अर्धा सावलीमां बठेल व्हतु!भर दु्फारंनां भरे रिक्शा चिमठाने रस्तालें पयी ऱ्हायंती!रस्ता मांगे मांगे जायी ऱ्हायंता!झाडेस्वर बठेल पक्षी सावलीलें येल दिखी ऱ्हा यंतात!आंगे पांगे कायांभुधूम नागरेल वावरे मांगे जायी ऱ्हायंतात!
उनन्हाभरे झाडेस्वर किरकोडा किर्रर्र आवाज करी ऱ्हायंतात!रस्तानां आथा तथा कोल्ल गवत उभं दिखी ऱ्हायंत!निय्यागार कडू निमन्हा झाडे वावरेस्मझार दिखी ऱ्हा यंतांत!आम्ही आम्ही दडपायी दुडपायी बठेल व्हतूत!आंगल्हे घाम यी ऱ्हायंता!बठेल एक एक जन,’आथा खरक, तथा खरंक!’ सांगी ऱ्हायंतात!धाकल्ला पोरे गुदमरी रड बोंबल करी ऱ्हायंतात!रिक्शा उधयी वाधयी रस्ता उरकी ऱ्हायंती!उनन्ही झय लागी ऱ्हायंती!तितलाम्हा एक जन हातनां ढोपरघायी ढकली बोलना,’हो खरक तथा!बट्ठी जागा आडायी धरेल से!आठे गांड टेकालें जागा नयी,खुशाल चौडा व्हयी बठेल से!लोकेस्लें किदरचं ऱ्हातं नयी!’ त्यान्ही कुरकुर चालूच व्हती!रिक्शा दोंडाईचा चिमठानें रस्ते पयी ऱ्हायंती!इखरण,मेथी फाटा, पेडकाई अशा गंजज ठिकाने मांगे जायी ऱ्हायंतात!
काल्दीन २८ एप्रिललें लगीनन्ही मोठी तिथ व्हती!मोठं मुहूर्त व्हत!लोके ते
मुंग्यास्ना मायेक एसटीम्हा, जिभडास्मा डुकऱ्या गाड्यास्मझार दाबीदुबी दडपायी बठेल व्हतात
रिक्शा डायवरलें बठालें जागा नयी व्हती!पुरा चिप्पट व्हयी बठेल व्हता!रिक्शानं हॅन्डल मातर नेम्मन हलायी ऱ्हायंता!वट टायी टुयी,दुसऱ्या मोट्रा गाड्या टाईटुयी, रिक्शा एकदावंन्ही चिमठानालें यी भिडनी!जीवम्हा जीव उना!दु्फारंनां आडीच वाजेल व्हतात!नातू जीव गुदमरी गुदमरी चांगलाच आदमल्या व्हयी गयता!त्याले असा माव्हरा नयी से!पूनालें ऱ्हास!चिमठानां टॅंडना आंगे रसंवंती दिखनी!तठे घूसनूत!नातू आनी मी एक एक रसन्हा गल्लास घटघट करी! पिदा!पोटले हांलक वाट्नं!
दोंडाईचा,लाल मिर्चीनं बेपारी शहर से!उंडाह्यानां चटकानं शहर से!४२-४३ डिग्री तापमानन्ह शहर से!आंगन्ह पानी व्हडी व्हडी काढणारं शहर से!तठेंग लगीन लायी चिमठानालें यी भिडनूत!आठेंग एसटीम्हा पाय ठेवाले जागा नयी व्हती!तीन-एस्ट्या उन्यात!नावले उभ्या ऱ्हायन्यात रेस करी,पाठ दखाडी निंघी ग्यात!उनम्हा काय करो बवा? जीव निस्ता शिजी शिजी खालेवर व्हयी ऱ्हायंता!चौथी एसटी उनी!उतरनारा उतरानं पहिलेंग चढनारस्नी गर्दी व्हयनी!कंडक्टर बिचारा आराया मारी मारी थकी ग्या!संतापम्हा एसटीनां खाले उतरी ग्या!
आनी समोर उसना रसना दुकानम्हा घुसी बठना!उतरनारा उतरी ग्यात!एसटीम्हा घूसनारा जागा नई व्हती तरी भी धडश्या मारी मूरी,आंग चोरी चारी घुस्नातं!एक दावनीं माले आनी नातूलें उभं ऱ्हावालें जागा सापडणी!नातूले एसटीना डायवरजोगे केबिनम्हा घुसाडी दिना!मी आथा तथा तंनगत उभा ऱ्हायनू!कंडक्टर निश्चितवार उना!बेल दिन्ही!एसटी धु्यांगमं धूर काढी पयतं ऱ्हायनी!आंग चोरी,जीव चोरी खुटलानमायेक उभाचं व्हतुत!असा तंनगी तुंनगी धुयापावूत गवूतं!हायी याद हिरदन्हा पानवर पक्की लिखायी गयी!
नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धूळे
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००