गटारी आमास्याम्हा khandeshi language sentences
नानाभाऊ नमस्कार
ती गटारी आमास्याम्हा मनम्हानी आमन्या पुरी करागुन्ता दोस्तारना फोन येताच काय लाडू फुटी र्हायनात बाप तुम्हना त्या पिचकेल पुचकेल पोटम्हान!
एक ताटम्हा डबूकवडा आन एक ताटम्हान्या बोट्याच बोट्या तुम्हना संगे मालेबी याss! याss! आसं म्हनीसन बल्हाई र्हायन्यात!आत्तेनआत्ते तथा निंघी ईवू का काय आस माले आन मन्ही जिभलीले वाटी र्हायनं! आन आरधा निरधा बचेल बुचेल दाते निस्ता वयवय रवरव आन खवखव करी र्हायनात!
तो लालजर्रक रस्सा, त्याम्हा त्या बोकड्यानी भाजीम्हातली कलेजी, नळ्या, च्याप, सीना गर्दन, फर्र्या, तिल्ली, भेज्या मिज्या समदासनं वज्जी भारी मिक्सींग माले आठूनच दिखी र्हायनं!
डबुकवडासनी मस्सालेदार भाजीले काय र्हाई र्हाई गदक फुटी र्हायना बाप! काही ईच्यारूच नका हो!
हाई वाचीसनी नॉनवेजना बरोबरीखाल वेज खावानी मग्ही गनज दिवसनी आमन्याबी पुरी व्हनार से म्हनीसन पोट तव तव पार खपाट व्हुई र्हायनं! पार तथा मांघे ती पाठले टेकी जावाले करी र्हायनं!

नानाभाऊ!
आस्सल खेडापाडास्म्हातली अहिरानी लिखानी तुम्हनी एक आल्लगज ढब से!
यार! बोले, तो भलता मजा आ गया कस्समसे!
गटारी आमावसनं निवतं एकदम भारी जमाडेल से बाप तुमीन!
मायन्यान भो कधी!
मन्हा हातम्हानी हाई पिव्वर देसी दारूनी बाटली दखा कसी थय थय करी र्हायनी! सप्पेत ल्हीसनी सांगस का तुम्हले दोन्हीसले एक बलका भी ल्हीवू देवाव नही मी!
तुम्हले दोन्हीसले ईतली दारू पाजीसनी तर्र करी दिसू का पुनाईन तुमीन मरतलगून माले गाटारीनं निवतं देवाले ईसरावतंच नथीन, तुम्हना आंगम्हाना कपडाससमेत तुम्हले गडरीसम्हा लोयाडी लोयाडी पार आदमरा करी टाकसू मी तुम्हले! नेमका आप्पालेच गटारीनं निवतं देवाले ईसरी ग्यातना ना आं!
ईसकी सजा जरुर मिलेगी! तुम्हले काय वाटनं आप्पा ऐसाच सोड देंगा तुमको?
बिलकुल नही! बराब्बर तीन थालियाँ लावनेकू सांगज्यात हौ!
शिवाजीआप्पा साळुंके
