कानबाई उत्सव
कानबाई माय की जय
नानाभाऊ माळी
परोनंदिन,काल्दीन आनी आजन्हा….सनवार,आयतवार,सोमवारन्हा तीन दिन कश्या पयेत निंघी ग्यात!चाकण, पुणे, सांगवी, वाल्हेकर वाडी चिंचवडम्हा जथा बन तथा बठ्ठा खान्देशी भाऊ बहिनी कानबाई मायन्हा भक्तीम्हा गुंग व्हतात!कानबाई मायन्हा रोट व्हतात!गंजज खान्देशी भाऊ बहिनी आपापला गावलें ग्यात!बठ्ठ गाव एकच से हायी दखाडी दिन्ह!ज्यासले जाता उंनं नई त्या बठ्ठा कानबाई मायन्हा उत्सवम्हा भक्ती भावतीन लीन व्हतात!
कानबाईन्हा रोटमुये खान्देशन्हा बठ्ठा गावें हारीक भरायी जायेल व्हतात!कानबाईमाय, रानबाई माय, कन्हेर राजानां गानां कानवर यी ऱ्हायंतात!घर, गल्ली, गाव, बठ्ठा गावें आनी पुरा खान्देश कानबाई मायनीं भक्तीम्हा व्हतात!दूर मुंबई, पून, छत्रपती संभाजीनगर (जुनं औरंगाबाद), नाशिकलें जायेल पोरे-सोरे बठ्ठ खटलं एसटी, प्रायव्हेट गाड्या, सोतानी गाडी लयी कानबाई मायना रोट गुंता आपला गावलें येल व्हतात!
कानबाई मायन्हा ‘रोट’ पुरा गावल्हे जोडस!जात,पात बठ्ठ एक
बोघनाम्हा गोया करी ठेवतंस!तठे जात नावनां इसडाफोक सबद व्हाती झिरीम्हा व्हावाडी देयेल ऱ्हास!बठ्ठ गाव एक पंधाम्हा बांधायी जास!एक जुगनं हायी गाव नेम्मन रोटस्ना गुंता एक व्हयी जास!
खान्देश संस्कृतीनां हाऊ सन आप्रुक से!आल्लग से!आदर्श से!कानबाई माय म्हंजी ‘राधा’ रानबाई माय म्हणजे साक्षात ‘लक्ष्मी’ माता!कन्हेर राजा म्हणजे साक्षात कृष्ण भगवान!कान्हा कृष्णन्हा हावू कान्हदेश से!अहिर राजानी संस्कृतीन्हा हाऊ देश!आपली श्रद्धा,आस्था,परंपरा, भाषा संगे मांगे लयी चाली ऱ्हायना!जगम्हा आल्लग वयेख लयी मव्हरे जायी ऱ्हायना!खान्देश अभीरस्नी जुनी वयेख लयी मव्हरे जायी ऱ्हायना!त्याले निमित्त से आपला खान्देशी सन!आखाजी गवराई ,भालदेव,कानबाईनां रोट हायी आमन्हीं वयेख से!तुम्ही कितला भी दूर जावा पन आखाजी, दिवाई, कानबाईनां रोट हायी खान्देशन्ह रुपडं जिंदगीन्ही वयेख से!
खान्देशी मानोस पोटगुंता गाव सोडी दूरलोंग चालना जायेल से!परदेश, सुरत, आमदाबाद, बडोदा, पून, नाशिक,छत्रपती संभाजीनगर, मुंबईलें ऱ्हावाले जायेल से!पन त्या त्या तारीख सन सनावळलें गाव जास!नही तें मंग तिचं परंपरा ऱ्हावानां नवा ठेकाने करत ऱ्हास!पुनालें चाकण, वाल्हेकरवाडी, सांगवी आनी आखों गंजज ठिकाने कानबाईना सन मनाडा!बाहेर गावलें इथला लोके गोया व्हतस हायी डोयान्ह पारनं फिटालोंग अनुभव लिधा!
आम्हनी खान्देशी संस्कृतीनीं आल्लग परंपरा दखी स्थानिक आठला
लोकेभी दखत ऱ्हायी ग्यात!या
वरीसन्हा कानबाई सन हिरदलें शिकाडी ग्या!बठ्ठा खान्देशी लोके, भाऊभन एक व्हयनूत तें काय व्हस इतलं दर्शन मोठं व्हतं!१०तारीख फाइन १२तारीखलोंग… सनवार, आयतवार आन सोमवार भक्ती
भावम्हा बुडेल खान्देशी मानोस आज मंगयवारे मोक्या व्हयना!
ह्या वरीसना कानबाई मायन्हा सन डोयान्ह, हिरदन्ह, मनन्ह पारनं फेडी ग्या!खान्देशन्ह न्यारं दर्शन दखाडी ग्या!आपले वाटस आपलं जगनं दखाडी ग्या!सन खुरखुरा लायी ग्या!मन्हा खान्देश दखाडी ग्या!कानबाई मायनां रोट खावाडी ग्या!जय कानबाई माय!जय रानबाई माय!जय कन्हेर राजा!
… नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे)