Khandeshi Akhaji आखाजी
आखाजी भाग तिसरा
आखाजीनी सुरवात चैत मईनानी चान्नी तिज ले व्हस नी समाप्ती वैशाग चान्नी चतुर्थीले व्हस. म्हणजे बरोबर एक महिना हाऊ सन ऱ्हास, पनं खरी रंचना शेवटला दहा पंधरा दिनमाज ऱ्हास.
गौर बठनी का एक टोपलीमां पोरी माटी लेतीस त्यामा सात प्रकारना धान पेरतीस. रोज पानवठा वर पानी लेवले जातीस. तठे गाना, टिपरा, फुगड्या खेतीस. दमतीस तव लोंग खेतीस नी मंग पानी लई घर जातीस. त्या पानी वरी गवराईले धोतीस नी उरेल पानी, त्या टोपलीमां पेरेल धान वर सीतडतीस. गौरांईले भुईमूगन्या सेंगा, डांगरे, टरबुजन्या बिया मुरमूरा, कढई, यांसना हार, घरमाना काही डागीना घालतीस.
घरम्हाना हाम्बर तिले पंगरावतीस. आशी सजावट करी आरास करतीस. संकर लेवाना रोज नी आखाजिना रोज या पेरेल धान्यना रोपे, गौराई, संकऱजी, घरमाना देव यासवर टाकतस. पोरी यां रोपे येनी, बुचडामां लावतीस. माणसे पोरे या रोपे पागोट, टोपीमा तुराना गत खोसी लेतस.
आते इतला महिनाभर कांय कोनी पायतत नही. तरी पन 10/15 दिन तरी गौराई बठातसज. पनं मुंबई पुनामां जायल अहिर मातर गौरांई बठाडतस नही. सईर गावनं हाई जीवन बी लाथा तांगडनं से. नवरा बायको दोनीबी नौकऱ्या करतस त्यामा त्यासले महिना पंधरा दिन गौरांई बठाडता येत नही. त्यामुये पुढली पिढीले गौरांई कांय ऱ्हासं? संकर कांय ऱ्हास यांनी याद ऱ्हावाव नही. त्यास्ले रावनाई से. त्यास्नी निदान चार दिन तरी गौरांई घरमा बठाडो.
वैशाग चान्नी (शुक्ल) पक्ष पाडा (प्रतिपदा) ले गौरांई बठाडा. सोया शिलावा करी, आरास तयार करा. गवराईले निवद दावा. दुसरी रोज बीज (द्वितीय) संकर लया. त्याले गौरांईंनी पूढे बठाडा. हाऊ संकर खान्देशमां माटीना ऱ्हास. घोडावर संकरजीं, आंगम कुडची, कोट, धोतर, डोकावर खान्देशी पागोट आसा संकरजी कुमार घडावस. संकरजींनं हाई रूप फक्त खान्देशमां दिखास. हाऊ संकरजीं तुमले मुंबई, पूना, सुरतमां भेटावं नही.
तें आठे एक ऍडजेस्टमेन्ट करा. आपली लाकुडनी गवराई ऱ्हासज तीले पाडा (प्रतीपदा) ले पूजी का, बीज (द्वितीयां) ले बजार म्हाईन संकरजींनी, काच, चिनीमाती, प्लास्टिकनी जीं बी तयार मूर्ती भेटी ती घर लया. ती गवराई पुढे पुंजा. नही तें मंग देव्हारामा संकरजींनी पिंड ऱ्हासं ती गौरांई पुढे पूजी तरी चाली. संकर उना का त्याले नी गौरांईले सिया, सांजऱ्यासना निवद दावा. आखाजी म्हणजे तिज (तृतीयां) ले पुरन पोईना निवद दावा. चवथी रोज गवराई नी संकरजीं बेयाडी या.
सईर गावमां सरावन महिनामां मराठी बाया मंगयवारे एक जागे गोया व्हईसनी मंगळा गौर पुजतीस तशा खान्देशी बाया पोरी एक रोज कोना तरी घर एक रोज, दोन रोज, तीन रोज, चार रोज, तुमले जमीन तितला रोज एक जागे गोया व्हा. तठे गाना म्हना, टिपरा ख्या, फुगड्या ख्या. मज्या करा.
नवीन पिढीले आपली, भाषा, संस्कृती कळी. तुमले बी ऊर्जा भेटी, मन शरीर प्रसन्न व्हई जाई. खेय खेवाले कोनले आवडत नही? फक्त कोनी तरी पुढारपन करणार जोयजे. इतलज!
सध्या आठेज आखाजी समाप्त व्हस. पन यांना पुढे बी एक भाग व्हता आखाजिना. साधारण दोन आडीच शे वर्षे पूर्वी हाऊ एक विधी व्हता. तें कांय मी बी दखेल नही. मनी माय, मनी आजी नी गाव म्हातल्या जुन्या धल्या सांगेत. तिसनी बी निस्त ऐकेल व्हतं. दखेल कोनीज नही व्हतं.
शिववर जवय पोरीसना झगडा सुरु व्हय तंवय, बाजूले दोन्ही गावना पोरे कुस्त्या खेयत. हाई पद्धत आज बी सुरु से. पूर्वी दोन्ही गावना शिववर त्या त्या गावन बैल गाडं जुपिसनी तयार ठेयत. टिपरा खेता खेता पोरी गाया देवाले लागतीस. एराएरना झित्रा धरतीसं, लुगडा व्हडतीस. एराएरले धरी व्हडतीस. थोडा कबड्डी सारखा खे ऱ्हासं तों.
समोरला गावनी एक पोरं व्हडी लयतीस. तीन्या गावन्या पोरी तिले सोडावाना प्रयत्न करतीस. मंग प्रतिस्पर्धी पोरीसनी तिले उचली गाडीमां टाकी का मंग तिले सोडावान नही. तिले जाऊ देवान. आते झगडा खतम. तिले आते गौरांईनं रूप ऊन तिले गावमा लैसनी मारुतीना पारवर ठेवो. तीना संगे तीन्या एकदोन सई बहिनी, माय, बहीन या बी नंतर येतीस सोबत कराले.
हाई जीकी लयल पोरं म्हणजे गौरांईनं रूप. तीनी पूजा गावन्या पोरी बायां करतीस. तिले माजमां बठाडी तीना आवते भवते फेर धरी नाच गाना, फुगड्या खेतीस. सकाय उठी गाव पंगत करेत.
मंग त्या पोरले नवा हाम्बर, चोई, नारंय दिसनी खोय भरेत नी दुफारले परत तिले वाजत गाजत बठ गाव शिववर लै जायत. तठे त्या पोरना गावना शानला मानसे बाया येयलज ऱ्हायेत. तठे ती पोरं त्यासना हावाले करानी.
बठासनी गये भेट लेवानी नी पुढला सालले परत आठेज झगडा खेवाले या आस निवत एराएरले दी सनी घरे घर चालना जायत. हाऊ शेवटला आध्याय आते कांय कोनी करत नही. तरी पन पुढली पिढीले सांगत चला आपली चाल कांय से ती. कितली श्रीमंत से.
बापू हटकर