प्रेम करा रे प्रेम करा!अहिरानीवर प्रेम करा
भावड्यासहोन! आज तारीख १४ आन महिना फेब्रुवारी! म्हन्जेच प्रेमदिवस शे!
बठ्ठा अहिरानी मायबोलीना जागलकरीसले मन्हा रामराम, नमस्कार! धाकल्लासले आसिरवाद आन जेठा मोठासले आरस्तोल!
आजना ह्या प्रेमदिवसनी रोजे आपली अहिरानीमायबोलीवरनं पिरेम जताडानासाठे धडपडनारासले जीव तोडीसन मन्ही रावनाई शे का, तुमीन रामपाह्यराम्हा झोपीसनी उठल्याबरोबर तिन्हावरनं पिरेम दखाडानागुन्ता तिले “आय लव यू !” म्हनीसन नीट सुदम्हा हुबा र्हाई जावानंतर, “मी तुन्ही सेवा करासाठे मन्हा आख्खा जलम खरची घालसू! अहिरानी मायबोलीना प्रचार आन प्रसार करासाठे जीव लाई काम करसू! सदा अहिरानीम्हाच बोलसू, लिखसू, वाचसू!”
ते मंगन चला उठा आते आन बोला SSSSS! जोरथीन आन मनफाईन, खल्लीखुल्ली, बेंबीना देठफाईन! “जय अहिरानी! जय खान्देश!!!”
मन्ह्या आजन्या दोन्ही प्रेमकईता वाचीसनी घरम्हातला बठ्ठासनासंगे प्रेमथीन वागा-बोला! येरायेरले धरीसन खल्ली जोरबन मिठी मारा जीवजंतुसले जीव लावा! जठे कोठे पडित जागा दखायनी तठे एक तरी झाड लावा! आडी-आडचीनम्हा दखायना त्येले व्हताव्हुई तव्हडी मदत करा! रागरुसवा, हेवादावा तथा गटरम्हा थुकी द्या बरका!
प्रेम करा रे प्रेम करा!
अहिरानीवर प्रेम करा!!
वाट धरा रे वाट धरा!
सत्कार्यानी वाट धरा!!
तुम्हनाच!
शिवाजीआप्पा साळुंके, ‘किरन’
च्याईसगाव, जि. जयगाव.
हाल्ली मुक्काम- नाशिक
भावड्यासहोन ह्या नाशिक नावना वरथीन माले एक याद वनी, ती आशी का, आपूनले ह्या नाशिकले आपला खान्देशनी राजधानी बनाडानी शे! म्हनीसन आत्तेफाईनच आपन प्रयत्न करुत! मरतलगून झटूत! तसा संकल्प करुत! आपली सत्तरशिंगीमायले नवस बोलूत!
बोलाSSSSSअहिरानी मायबोली की जSSSय!