Khadeshi Marriage देव उठी ग्यात हो

Khadeshi Marriage देव उठी ग्यात हो

” देव उठी ग्यात हो ss ! ”

” कथा डबडा झामली राह्यनात रे ? अरे बठ्ठा डबडा खल्ले लागी ग्यात . दिवायीना फराय अनलोंग पुरी का बरं ! बये ‘ जसा दुसकाय म्हाईनच उठी येल शेतस या पोरे मायन्यान कदी भो .

परोंदिन देव उठी ग्यात . खोपडी एकादसी ले देव लई गयथूत . तुयशी मायनी पुंजा कई . खरं शे ना हो ‘ परोंदिन गुरुवारे खोपडी एकादशीले देव झोपम्हाईन जागे झायात असं म्हंतस . तुमीन म्हंशात देव काय जपेल व्हतात काय ? अहो ‘ मंग हो ‘ असं म्हंतस आषाढी एकादशीले श्री हरी विष्णु नारायण ह्या निद्रा अवस्थामा जातस ‘ म्हंजी क्षीरसागरमा त्या जपाले जातस . ते या कार्तिकी एकादशीलेच जागे व्हतस म्हने . असं पुरानमा म्हनेल शे . अशी आपली धार्मिक कल्पना शे .

तुलसी विवाह

देवच जर जपेल व्हतीन तर लग्ने याव कसा व्हतीन बरं

देवच जर जपेल व्हतीन तर लग्ने याव कसा व्हतीन बरं ! म्हनीसन कोठेच लग्ने लागनात नईत . कसा लागतीन हो ? श्री हरी विष्णु आपला बाळकृष्ण म्हना ‘ पंढरपुरना श्री हरी विठ्ठल म्हना ‘ ह्या देव जपाले चालना गयथात . मंग या कार्तिकी एकादशीले चार महिनामा देव जप म्हाईन जागा व्हतस ‘ देव उठतस . म्हनीसन धार्मिक लोके चतुर्मास पायतस . चार महिना व्रत करतस. कांदा लसुन ‘ आपला जेवन म्हाईन त्या वर्ज्य करतस. लगीन याव बंद करतस. मंग खोपडी एकादसले देवसले उठाडा करता जागे व्हवा करता आनी तुयशीना पुजा करा करता जान पडस . त्या दिन दखा तुमशीनं पन लगीन ऱ्हास .

तुमीन म्हंशात कोठे गावना भाहिर गयथात का ? अरे नई रे भो . ‘ हाऊ आपला छोटु आप्पा शे ना ‘ त्याना दारसे ‘ त्यानाच आंगनमा खोपडीनी पूंजा मांडी व्हती . पाच ऊस लयतस त्यासले खोपडीना मायेक उभा करतस मझार पाट मांडी देतस . त्याना वर श्रीहरी ले घोंगडी लागसती घोंगडी आथरतस . हयद ‘ कुकु ‘ पुजा ‘ पुलेसना हार ‘ बठ्ठी पुजा मांडनी पडस . तठे तुयशीना लगीन नी तयारी करनी पडस .

खोपडी

खोपडी एकादशी

खोपडी एकादशी ना दिन आमीन उपवास कया त्या दिन ‘ भाजी ‘ भाकर ‘वरण’ भात ‘ काईच खातत नई . या उपवासना दिन तुमीन फये खा ‘ साबुदाना खा ‘ भगर शेंगदानानी आमटी ‘ असा फराय खाना पडस . उपाशी राह नका . मोजकं खा . असं हाई एकादशीनं व्रत करानं पडस . पन एकादशी नी दुप्पट खाशी असं नका करा .

मंडई ‘ देव श्री हरी विष्णु जो चार महिना पासुन या चातुर्मासमा जपेल व्हतात त्या देव कसा उठनात ? आमीन एकादशीना दिन त्यासनी प्रार्थना कई . त्यासले प्रार्थनामा सांग ” देवबा तुमीन आते जागे व्हा .. लगीन याव का बठ्ठाच व्यवहार थांबेल शेत . त्या दिन पूंजाना ताटमा घरना देव्हारा म्हातला देव लई उथूंत . देवेसले हात जोडीसन सांग आनी पूजा ना ताट लिना आनी चमचा वरी ताट दनादना ठोका . ” ठण ठण ‘ ठण ‘ … वाजा ताट . अनायासे तुळशीनं लगीन लागावर वाजाबी वाजना पडस . मंग आमीन ताट ना ठण ठण आवाज मा देवले जागे कये .

” बोर भाजी आवया ‘ सुकदेव सावया ” असं म्हनत जावूत . आमना पूंजाना ताटमा बोर ‘ पेरू ‘ चिच ‘ आवया ‘ हरभरा ना पाला ‘ हाई बठ्ठ ठेवनं पडस . कारन हयद ‘ कुकु तर ऱ्हासच कारन हाऊ असा हंगाम ऱ्हास कपाशी मका ‘ असा महामुर पीके निघेल राहतस येग येगया परकारना फये ‘ झाडेसवर हंगाम बहरेल ऱ्हास कारन हाऊ शेती संस्कृतीना संबंधीत सन ऱ्हास .

श्रीहरी बठ्ठा देव चार महिना जपेल राहतस आम्हनं पीक पानी चांगल येल शे . आम्हना माल ले बाजार भाव चांगला भेटू दे . आख्खा बजार रुकेल शेत . लग्ने याव रुकेल शेत . घरमा पैसा येथीन तरच पोरसना लग्ने ‘ सन उत्सो करसुत ना देवा . या लग्ने यावमा तुम्हनी खरी गरज शे देवा . तुम्हना साक्षीनी ‘ तुम्हना आशिर्वाद नी खरी गरज शे देवा . म्हनीसन या खोपडी एकादशीले श्री हरी विष्णु ले ‘ थाटी ‘ घंटी वाजीसन पूजा प्रार्थना करानी पद्धत लाई देल शे ती आम्हीन पुरी कई . आनी देवबाले जागे कये .

देव उठी ग्यात हो

देव उठी ग्यात

आते लोके सुटनात भो लगीनना मुहूर्त ‘ साखरपुडा ‘ पोरीसले दखाडाना कार्यक्रम ‘ लगीननी तारीख ‘ दखाना कार्यक्रम लोकेसनी धावपय सुरु झायी . आते बेंडबाजा ‘ पोट झोड्या ‘ डी . जे . वऱ्हाडी ‘ वऱ्हाडनी ‘ यासनी नुसती सोयताले नटी थटीसनी मिरवानी नुसती धूम राही .

पन काय शे मंडई ‘ बये पोरीसना दुसकाय शे हो आते . पोरीसनं प्रमान कमी व्हई जायेल शे . आनी पोरेसनं परमान जास्ती शे . मंग पोरी वाला बी भलता नखरा करतस हो . आमले पोरगा नोकरी वालाच जोयजे . म्हंजे तथाना तथा नोकरीना ठिकाने भाहिरच राहनारा जोयजे . बये काय काय ऐकाले भेटस ‘ दखाना हो .. तसं खाजगी मा कोपरामा लई जाईसन सांगु का ” आहो घरमा बठ्ठा खकाना ऱ्हास हो . ” त्यामा न त्यामा काय व्हस पोरे लगीन करता बाशिंग बांधीसन तयार ऱ्हातस . ज्यासले नोकरी नई ऱ्हास त्यासले या जमानामा या बैलबाजारमा सौदाच चालस ना हो मंग ! बये ‘

देव घ्यायला नाचवायला

आमना लग्ने कथा लागनात पत्ताच नई . ना हुंडा ‘ ना बँड ‘ ना डी. जे . मातर पाव्हना पई दोन्ही याय कुमचाडी लेत आनी पाच दिन मुक्कामे राहेत . पाच मांडोनी हायद ‘ लगीनन्या बठ्ठ्या रिती भाती पार पडेत नवरदेव नवरीले हयद लावा पासुन ते आंग धोवाना कार्यक्रम एकमेकना आंगवर गुयन्या फेकाना कार्यक्रम नुसती धूम राहे . रुसवा फुगवा ते चालतसच . वऱ्हाडी ‘ वऱ्हाडनी त्यासना त्या लगीनना गाना आते बये कोठे ऐकाले भेटतस हो .

सया गई हो नसिराबाद .. कोन ढोलगी वाजे चमेलीना झाड खाले . . . बये या गानासवर कलोंडन्या काय नाचेत भो ? बायासना त्या लगीनना गाना ऐकतच राहो असं वाटे . आते त्या गाना म्हननाऱ्या बाया च सापडनार नईत . आते डी . जे येवा पासून झाल नाचानी पद्धत बंद कई गई काय रमुस राहे हो ? आते या रिती भाती लोके इसरत चालनात . आते लगीनले थांबाले कोनलेज ये नई शे . अक्षता फेक्यात की जो तो टँड नी वाट धरतस . चार वाजताशी बठ्ठा खकाना मिटी जास हो .

तसं दखाले गये ते मंडई लगीन हाई दोन जीवननं पवित्र बंधन ऱ्हास . बामन ‘ पुरोहित यासना मुखथीन निघनारा वेद मंत्र उच्चारमा आगीन देवले साक्षी ठीसन साथ फेरा लीसन आपुन हाई लगीन पार पाडतस . काय मस्त रिती भाती व्हत्यात आपल्या . लगीन लगीनन्या चालिरिती आपल्या आपुन आते इसरत चालनुत . जाऊ द्या काय करतस आते ? पन हाई गोट खरी शे ज्यासना घर पोरे पोरी लगीन ना उपवर शेतस त्या देवना उठानी वाट दखी राह्यंतात .

चला मंग देव उठी ग्यात ‘ देव उठनात हो . . . . . ” देव उठी ग्यात हो ss I ”

विश्राम बिरारी ‘ धुळे .….

9552074343 ……….

खोपडी बारस