Khandeshi Ahirani Katha हेटला आंगे
. . . . . “हेटला आंगे ” ( कथा )
” कौता ss ‘ अय कौता ss ” सुका आप्पा भाहिरथीन हाका मारी राहयंता . ” कौता ss ‘ बये कथा तरफडना रे हाऊ कानजान ? ” तवसामा कौता डोकावरना चारानं बदग् आनी आंग वर बदग् झटकीसन वाडगा म्हा ऊना ” काय सांगतस आप्पा ? ” … ” आरे काय सांगतस काय करी राह्यना येडा मी कदयना हाका मारी राह्यंतु . कथा जायेल व्हता . ? आनी हाई काय ? ” अहो आप्पा मोठ मायनी कनगीमा जुव्वारी भरानी सांगी ती भरी राहयंतु ‘ तठे मझार पोता शेत त्यास म्हाईन काढी काढी हाई कनगी भरी राहयंतु आप्पा .. तवसामा सुका आप्पा बोलना ” मायनी उपाद मारू इनी उपाद नी . आते उनी कानी पंचाईत . ” … ” का बरं काय झाये आप्पा ? ” ‘ आर ‘ कौता तुले गाड् जुपीसन वावरमा धाडानं व्हतं . बैलेसले पानी बिनी दखाडका का नई ? ” ” मंग हो आप्पा ‘ बैलेसना मव्हरनं शेन आवरं बैलेसले चारा टाका ‘ पानी दखाड् मंग मी तथा कामले लागनु ” .
” पन ‘ तु असं कर आते ‘ बैलेसना चारा खावाई गया का गाड् जुपीसन वावरमा जाय . नालाना आंगे खयाम्हाईन खत नं गाड् भर आनी वावरमा दोन तीन खेपा करीसन व्हाई ले . ” ” पन आप्पा । ” ‘ आते आप्पा बिप्पा करत बसु नको . ” ‘ आहो पन मोठ माय .. ” ” सांग ना ‘ पहिले खत नं गाड् भरी लई जाय वावरमा आनी गहुसले पानी दखाडनं पडी … बये ‘ थंडी बी कथी नबेदा व्हई गई कोन जाने ? थंडी कुमचाडा शिवाय गहु बी भराव नई . कपाशी न कपाशी भरी पडेल शे . बये ‘ कपाशीले भावच नई भेटी राह्यना उकाव तु तव्हढ काम कर . तुनी मोठ माय बोली मी दखी लिसु ‘ . आनी कोठे जाशी ? नालाना हेटला आंगे पह्यले खयामा जाय . ते खत गाडामा भरीसन वावरमा टाकी ये भो . तव्हढ काम कर रे दादा ” .
कौता मनमा न मनमा इचार कराले लागना बये ss ‘ कोनं ऐको भो .. ? ” मोठ मायनं काम तसच सोडी दिनं ते मनावर सुटा शिवाय राहाव नई . आते काय सांगो या आप्पाले ? आप्पानं काम बी बये घोडावरच ऱ्हास मायन्यान कदी भो . तवसामा ते सुका आप्पा त्यानावर आल्लायनाच ” काय येडाना मायेक ईचार करी राह्यनारे ? ” ” आप्पा ‘ नई ‘ मी असं म्हनी राह्यंतु . ” ” तु काई म्हनु नको भाहिर निंघ , आनी गाड् जुपीसन जाय व्हय ते . दखी लिसु तुनी मोठ माय काय म्हनी ते . ” ” कौता ‘ आखों ‘ मनमा न मनमा ईचार कराले लागना बये या दोनी जीवसना वाव्हन्या एकमेकना पायमा नई शेत . कोन कथा तानस आनी कोन कथा तानस . मझारमा न मझारमा आपली चेपनूक व्हस मायन्यान कदी भो ! ”
आप्पानी दखं ‘ कौता तठेच पुरानं लिसन घुटमयी राहयंता . ” कारे ‘ येडा बिडा शे का रे ? मी न मी कायपात करीसन सांगी राह्यनु ‘ तु मातर – ” ” आवं आप्पा ‘ मोठ माय खव्य्यी मनावर … ” अरे येडा ‘ तुले सांग ना ‘ दखी लिसु तुना मोठ मायले . व्हय गाड् बीड् जूप आनी निंघ . जे काम सांग ते नई करत . ” तर मंडई ‘ सुका आप्पा ‘ आनी कौता या वाडगा म्हा व्हतात . सुका आप्पा ले गहु नी चिंता व्हती . गहु पेराई गयथा . तिस किंटल कपाशी भरी पडेल व्हती . कपाशी येचाले बी बाया भेटेत नईत ‘ कपाशी येचनाऱ्या बाया अडीचशे तीनशे रुपया रोज मांगतीस .
घर येवाले डुक्कर गाडी जोयजे . असा रुबाब ऱ्हास .. ” कपाशी तीस किंटल निधनी . मोट मायले कपाशी ना पैसास वर धाकली चिंगानीनं लगीननी चिंता व्हती . तिना हात यंदा पीव्या कराना कुरता कपाशी इकानी वाट दखी राहयंती . आते गहु पेरेल शेत . गहुसले पानी भरनं पडस . चांगली थंडी पडा शिवाय गहु ना दाना भरतीन कसा ? दोनदा पानी भराई गयथं गहुसले . कौता गया नी आप्पा वाडावर उनात . आनी वाडा वरना म्हशीसले चारा टाका . पानी दखाड् . चपला घाल्यात . आनी जावो तवसामा ते मोठमाय घरम्हाईन भाहिर उनात . त्यासले आप्पानी सासुल लागनी सालदाऱ्यासन्या न्याहार्या वावरमा धाडा करता मोठ मायनी धावपय सुरु व्हती . पन आप्पा उनात तशी ती वाडामा इ लागनी आनी आप्पाले इचाराले लागनी .
” कावं ‘ मी काय म्हनस . हाऊ कौता ऊना नई का ? ” तवसामा ते तो तिनावर डाफरनाच ” वं तुले बी काई काम दखात नई मन ध्यान . कसाले त्याले वाडगामा धाड् ? त्याले वावरमा खत व्हावानं सांग . तठे वावरेसमा आते बाया ईथीन . मोठ मायले आप्पानी बात काई पटनी नई . बायासना आंग म्हाईन अजुन दिवाई गयी नई . भाऊबीज पाईन तिसन्या पोरी येत राहतीस . फरायना चिवडा ‘ लाडुसना डबा खल्ले लागतत नई तो लोंग त्या वावरमा येथीन ? नाव नका ल्या . तुमीन कितलीबी वाट दखा . येवाव नईत . तवसामा ते सालदार तठे आरोया ठोकतच तठे ऊना . ” आप्पाव ‘ वं अप्पाव पया ‘ पया ‘ मोठ माय आपला कपाशी ले आग लागनी . आपली कपाशी पूरी पेटी गई . ” सालदारना तो आवाज ऐकीसन मोठमाय नी आप्पा थंडागारच पडी ग्यात . त्यासना चेहरा दखा सारखा व्हई ग्या . पयतच सुटनात खया कडे . खयाना माटीना घरमा तीस किंटल कपाशी भरेल व्हती . भाव चांगला नई भेटी राहयंता . म्हनीसन तिले दडपी ठेल व्हती .
पन त्या घर ले कशी आग लागनी ? का कोनी पेटाडी दिनी . दिवाईना दिन शेत . फटुकडासनी चिनगी बिनगी ते नई उडनी ? कई समजाले मारग नई व्हता . तीस कींटल कपाशी म्हंजी लाख्खो रुपयानं नुकसान . ” वं माय वं हाई काय व्हई ग्ये . आनी मोठ्माय तोंड ठोका ले लागी गयी . या कपाशीना मांगे मेहनत व्हती . कष्ट उपसा व्हतात . घाम गाया व्हता . याच कपाशी ना पैसासवर मोठ माय आपला पोरना हात पीव्या करनार व्हती . मोठ्ठ सपन मोठमाय नी दखेल व्हतं . पन हाई काय झाये . काय झाये . बिच्चारी भलती रडनी ‘ भलती रडनी . तिना तो आटापीटा दखीसन देखनारेसले पन रडु ये . पन नशिब मा काय वाढेल व्हतं हाई कोनले समजनं का ? ती रडत जाये नी सांगत जाये . ‘
तरी मी त्यासले बोंब मारी सन सांग व्हतं हाई कपाशी थोडी थाकडी नई शे . गावना भाहिर वाडगा ना पत्राना शेड मा ठेवा . गावना भाहिर या बिड्या पेनारा ‘ थंडी ना उब्या करनारा तठलोंग भिडतत नई . पन मन्हं कोनीच ऐकं नई .. कोनीच मन्हं ऐकं नई ” अशी म्हनीसन तोंडले पदर लाईसन मोठ माय रडत होती . ढसा ढसा रडत होती . दखनारा बी रडत व्हतात . या कपाशी करता कितली मेहनत लेल व्हती . धाकला पोर्या ले वाढावतस ‘ जपतस तशी निगरानी कायजी लेल व्हती . ती कपाशी बई राह्यंती पन शेतकरी आप्पा मझारथीन पुरा बई राह्यंता . काय मन म्हनत व्हई त्यानं हाई कल्पनाच नई करेल बरं राही . कपाशीनी वारा सरशी राख रांगोयी झायी व्हती . मोठमायना सपननी राख रांगोयी झायी व्हती . ती सारखी रडत जाये नी सांगत जाये नालाना त्या ” हेटला आंगे ” जे वाडग् व्हतं तठे जर कपाशी भरेल ऱ्हाती हाऊ काया दिवस दखाले नई भेटता .
विश्राम बिरारी 9552074343 .