Kanbai “आम्हना घर नी कानबाई”
“आम्हना घर नी कानबाई”
काय करू भोंऽऽस, ह्या गिरजा बोयले काही चैन पडे ना! हाऊ सावन महीना लागना रे लागना, जसं काय तिना आंग माज ई जास ना हो! नई ते काय हो? नागपंचमी ना सन झाया वर जो पहिला ऐतवार येस ना, त्याले कानबाई बसाडानी परंपरा शे आपला खान्देशमा. कानबाई म्हंजी हाई एक गरामदेवता शे. तर दखा भाऊसहोन आनी बहिनीसहोन गिरजा बोय अशी मांगे लागी जास ना, मायन्यान कदी भोंऽऽकी, इच्चारता सोय नई. दखानं शे का? चला मंग मना संगे. कोठे काय इचारतस? गिरजा बोयना घर जावूत आपुन आनी दखुत गंमत. चला तर मंग मना संगे…
दखा ती गिरजा बोय कशी तन फन करी राहयनी. खिजाव कताव शिवाय तिनं कामच व्हवाव नई अशी तिनी समज शे. दखा, दखा तर खरी!
“उकावा वं ऊकावा पोरीसहोन. दिन कथा चालना… दखतीस नई?” तवसामा सुमन बोलीच पडनी, “आयाय माय, काय झाये आत्या बाई?”
“वं मी काय म्हनस?”
“काय म्हंतीस आत्याबाई?”
“वं मी म्हंत, तुमनी कानबाईनी तयारी झायी का नई?” अशी इचारी राह्यंतु.
“मंग, आत्या बाई, झायी ना!”
“आनी हाऊ नवल कथा ग्या? वावरम्हाईन ऊना नई का तो?”
“दखा, आत्याबाई, नाव काढताच ई लागनात त्या.”
“काय वं माय… काय सांगस?”
“अरे बाऽऽ, तुलेच दखी राह्यंतु मी.”
“वं माडी मी कानी कानबाई मायना करता एकशे सात न्यारा न्यारा परकारन्या झाडेसन्या कोव्या कोव्या पाने तोडी आनात त्याना करता सक्कायना पाहयरे झापाटामा जंगलमा जायेल व्हतु.”
तर बहिनीसहोन आनी भाउसहोन अशी धावपय सुरु होती त्या घरमा. नागपंचमीना सन व्हवावर जो पहिला ऐतवार येस त्या दिन संध्याकायले कानबाई मायनी स्थापना करतस, त्याना करता घरे सारी पोतारी, लीपी सन ठेवना पडतस. आते सिमेंट ना घरे शेत पण तवय खेडासमा माटीना घरे राहयेत. चाकपाक करी ठेवना पडेत. आंथरूने पांघुरना बठ्ठा बठ्ठा धोयना पडतस. गोधड्या गाधड्या चाकपाक करीसन घड्या करीसन ठेवन्या पडतीस. कानबाई मायले घर चाकपाक लागस. स्वच्छ लागस. गायनं गोमतीर घरमा शितडन् पडस. मंग घरना मझार आंबाना लाकडेसना बनाडेल चौरंग ठेवना पडस. चौरंगवर लाल मदरा आथरना पडस. त्यानावर गहुना दाना, त्यानावर तांब्या, त्याले कयस म्हंतस, कयस म्हा सात पवित्र नद्यासनं पानी टाकनं पडस. चौरंग ले चारी बाजुले केयीना बारका बारका पील बांधना पडतस. समोर पुजाना ताट ठेवना पडस. त्या पुजाना ताटमा बारक्या बारक्या सुपाऱ्या, हयद, कुकु, कापुर, उदबत्ती, ठेवनी पडस. आजुबाजुले समया. त्यामा गायनं तूप सतत दीवा रातभर तेवत ठेवना पडस. काई काई घरे जुना दगडी दीवा पण राहतस. कानबाई मायले बिजोराना, झेंडूना, नी कन्हेरना फुले भलता आवडतस, त्याच फुले मायले चालतस.
त्या कयसवर परनाई आनेल नारय ठेवनं पडस. परनाई व्हई नई ते आपलं पुर्वापार चालत येल नारय व्हई ते पन चाली. परनाई म्हंजी काय ते ज्याना घर नवाईनथीन कानबाई बसाडतस व्हतीन, तर जुनी परंपरा गत कानबाई व्हई रातभर ते नारय त्या कानबाई जोडे ठेवनं पडस. आनी नुकतच लगीन व्हयेल जोडप् गाठ पलो बांधीसन वाजत गाजत ते परनेल नारय स्थापन करतस. त्याले परनाई आनेल कानबाई म्हंतस. मंग ते नारय म्हंजी आमनी ती कानबाई. पाच नागीनना पाने कयस मा खोचना पडतस. नारय ले वाटनं तर नाक डोया काढता येतस. मंग गयामा मोत्यासनी माय, वज्जटी, नाकमा नथ, कप्पा ये कुकु. डोकावर मस्त शालुना पदर पुरा पांघराई देवो. अशी आम्हनी सुंदर कानबाई दखास मंडई. वर आंबाना पानेसनी माय बांधो. आंबाना पाने मांगल्य निर्मान करतस.
चौरंग ले ताडीना फडे पन बांधतस. ताडीना फडेसले लाह्या टोचीसन ठेवतस. मस्त दखास ते… कानबाईना परसाद पन फकस्त लाह्या नी फुटाना. इतला साधा परसाद ऱ्हास. या कानबाई ले बठ्ठा भाऊबंद जमतस. आपला आपस म्हातला भेदभाव व्हई तो ईसरी सन एकत्र येतस. आनी कानबाईना उत्सोमा रममान व्हतस. कानबाई माय बठठासले एकत्र लई येस.
संध्याकायले कानबाई मायनी आरती करतस. बठ्ठाजन पुंजा करतस. गाना म्हंतस. मानसे पन गाना म्हंतस. बाया पोरी फुगड्या खेयतीस. आनी मंग रातले पूजा व्हवावर कानबाई मायले भोजन देवानी पद्धत शे. भोजनमा पुरणपोयी, रशी, फुनका, नईते त्याले मुटका पन म्हंतस, भात ऱ्हास. पन कानबाई ना या भोजनले पुरन पोयी ले मांडा म्हंतस, भातले मोगरा म्हंतस, फुनका ले नारय म्हंतस, मीठले साखर म्हंतस. म्हंजी हाई पार पुर्वापार चालत येल प्रथा सांगी राहयनु मी. आनी हाऊ भोजनना मान फकस्त भाऊबंदलेच ऱ्हास. इतर लोकेस करता अलग वाढनं पडस, भाऊ बंद भोजन करा वर हात कोठे बी धोना नई पडतस. तर त्याना करता घरमा एक खड्ड खणनं पडस. त्यामाचा हात धोना पडतस. त्याले समींदर म्हंतस. हेतू हाऊ शे मायना परसाद भोजन खावावर हात थोयेल पानी वलांडाले नको म्हनीसन एक जागेच बठ्ठासनी हात धोवानी रित शे. मंग रातले डांग डुबलीना तालवर रातभर बाया गाना म्हंतस. त्या गाना पारंपारिक ऱ्हातस. कोनी रचेल शेत त्याना कोठेच थांग पत्ता लागत नई. पन गाना भलता गोड आनी अर्थपूरन् शेत हाई मातर गोट खरी. मानसे पन नाचतस फुगड्या खेयतस. रातभर डांग डुबलीना तालवर गाना म्हननं चालु ऱ्हास. दुसरा दिन कानबाई ले निरोप देवानी ये येस. कानबाईना मुक्काम देड दिवस फकस्त. दुसरा दिन आरती पूजा करीसन सवासिन बाया डोकावर कानबाई ले डांग डुबलीना तालवर वाजत गाजत ईसर्जन कराले लई जातस. काई काई बायासना ते डोया भरी येतस… “जावू नको, जावू नको, जावू नको जावू नको…
कानबाई माय तू जावू नको, देड दिवस ते राहयनी तू, जावानी घाई करू नको,” असा गाना म्हंतस…
कानबाई चालनी गंगेवरी माय चालनी गंगेवरी… साखर पेरत चालनी वं माय… साखर पेरत चालनी…” असा निरोप कानबाईले देतस, वाट लावतस, बायासना डोया भरी येस…
कारन देड दिवस म्हा ती बठ्ठासले एक करीसन रडाईसन चालनी जास . तिना मुयेच पीक पानी चांगल येस . संकट पयी जास . वावरेसमा पीक पानी चांगलं व्हस . माय कानबाईना आशिर्वाद खाल आख्खा संकटे पयी जातस ‘ रोगराई व्हत नई .
आनंदी आनंद पसरेल ऱ्हास तो केवय कानबाई ना आशिर्वाद मुयेच ‘ म्हनीसन सरावन ह्या पवितर महिनामा कानबाई नी स्थापना करतस. देड दिवस ऱ्हास आख्खा भाऊबंदसले गोड करी जास .
कितला रमी जातस त्या ? हाई बठ्ठी किरपा त्या कानबाईनी मायनी.बरं तर भाऊ आनी बहिनीसहोन कशी वाटनी ” आम्हना घरनी कानबाई ” बरं मंग येस मी …
राम … राम … I
विश्राम बिरारी ‘ धुळे .