दसरा सन मोठा
. . . ” दसरा सन मोठा ” . मंडई ‘ आज दसरा शे . तुमीन म्हंशात मी काय नवीन सांगी ऱ्हायनु का ? तर अश्विन शुद्ध दशमी ना दिन ” दसरा ” हाऊ सन येस . अश्विन महिनाना पहिला दिन पासून ते नऊ दिन लोंग नवरात्र ना नऊ दिन आनी दहावा दिन हाऊ दसरा हाऊ सन ऱ्हास . याले आपुन विजया दशमी पन म्हंतस . . . ” दसरा सन मोठा नई आनंदा ले तोटा ” हाऊ दसरा पराक्रमना ‘ वीर पुरुषेसना ‘ सरस्वती पूजनना ‘ व शस्त्र पूजन ना ऱ्हास . दसरा ह्या सननी परंपरा भलती जुनी शे . साडे तीन मुहूर्तापैकी एक सन म्हंजी दसरा बरं ! प्रभु रामचंद्र म्हने याच दिन रावण या राक्षस राजावर स्वारी कराले गयथात तठे राम विजयी झायात म्हनीसन हाऊ सन साजरा करतस. असं मी नई म्हनस पुरानमा जे मी वाचेल शे ते लिखं भाउसहोन . आनी . पांडव जवय अज्ञातवासमा गयथात तवय त्यासनी आपला शस्त्रे तलवारी भाला ‘ धनुष्यबाण जे काही व्हई ते शमी ना झाड ना खोड मा बठ्ठा लपाडी दिथांत आनी अज्ञातवास त्यासना जवय संपना तवय त्या शस्त्र त्या शमीना झाड म्हाईन काढीसन आपला ताबामा लिदात आनी त्या शमीना झाडनी त्यासनी पुंजा बी कयी व्हती . तोच हाऊ दसरा ना दिन बरं ! शिवाजी महाराजेसनी प्रताप गड किल्लावर भवानी मायना उत्सोनी सुरवात याच दिन कई व्हती म्हने . व शत्रुवर स्वारी याच दिन कई व्हती तो दिवस म्हंजी दसरा ..! महिषासुर राक्षस ना वधना हाऊ दिवस . बये त्यानी बी कथा पुरानमा वाचाले भेटस. महिषासूर नावना राक्षस व्हता त्याले तिन्ही लोकेसवर विजय मिळावाना व्हता . त्यानी पन करेल व्हता . आपुन आकाश ‘ पाताळ ‘ स्वर्ग ‘ देवलोक ‘ मानव यासनावर आपलं राज्य राही म्हनीसनी त्यानी ब्रहमदेव ले प्रसन्न करा करता वन मा तपश्चर्या कई . १२ वर्ष जंगलमा तो तपश्चर्या कराले बठना व्हता . ऊन देखे नई ‘ ना पानी ‘ ना थंडी उपाशी तापाशी बारा वर्ष त्यानी तप कये . बारा वर्षा नंतर ब्रह्मदेव त्यानावर प्रसन्न झायात . आनी बोल काय तरास शे तुले ? काय जोयजे तुले ? ” राक्षस ते ठराईसनच येल व्हता . तो बोलना ” कोनी ही या पृथ्वीतलावर देव ‘ दानव ‘ मानव ‘ माले मारूच शकनार नईत असा पक्का वर द्या . ब्रम्हदेवनी तथास्तू म्हनी दिन नी मंग काय जीवाननी पृथ्वीतलावर जाईसन ऋषी ‘ मुनी ‘ मानव देव यासले त्रास देवाले लागना . भट्टा देव भयभीत व्हई ग्यात महादेव कडे ग्यात . मंग दुर्गा देवीले सर्वा देवस्नी शक्ती दिनी . शस्त्र दिनात ‘ ताकद दिनी. नऊ दिन लोंग त्या राक्षसमा आनी दुर्गा देवीमा घनघोर युद्ध झाये . सर्व ऋषी मुनी पह्यलेच भयभीत व्हयेल व्हतात . लपीसन त्या नऊ दिन युद्ध दखत व्हतात . पन दुगादेवी नी आखिरमा त्या महिषासूर राक्षसना वध कया .. तो विजय मियना म्हनीसन विजया दशमी नईते दसरा हाऊ सन त्या दिनपाईन साजरा करतस. नऊ दिन दुर्गा मातानी पुंजा कई नी दहावा दिन देवीनी राक्षसना वध कया . म्हनीसन नऊ दिन आपन घट बसाडतस देवीनी पुजा करतस. पन आपटा सना पानले त्या दिन मातर सोनानं मोल भेटस. त्याना मांगे बी पुरानमा एक कथा शे . बराच वरीस पूर्वी ” वरतंतू ” नावाना महान ऋषी व्हतात . त्यासना जंगलमा एक आश्रम व्हता . आश्रममा बराच पोरे त्यासना कडे व्हतात . वरतंतू ऋषी त्यासले ज्ञानदान देवानं काम करेत . बराच मोठा शिष्यवर्ग व्हता . वेदाभ्यास ‘ शास्त्राभ्यास ना अभ्यास त्या बठ्ठा पोरे करेत . एक . दिन एक शिष्य नी वरतंतु गुरु ले प्रश्न इचारा . ” गुरुजी तुमीन आमले एव्हढ ज्ञान दिनं ‘ हुश्शार कये शहानं कये ‘ पन आमले असं वाटस त्या बदलामा तुमले काही गुरु दक्षिना देवाले जोयजे असं आम्हले मनोमन वाटी राहयनं .. ” ” गुरूसनी ऐकी लिनं त्यावर गुरु बोलनात . ” बाल कौत्सा … त्या शिष्या नं नाव कौत्स व्हतं . ‘ कौत्सा ‘ काय येडाना मायेक तु प्रश्न कया म्हने . आर येडा तुम्ही हुश्शार झायात ज्ञानी झायात हाईच मना साठे मोठी गोट शे हाईच मनी खरी गुरुदक्षिणा … पन तो शिष्य कौत्स काही ऐकाले तयार नई व्हता . मंग गुरु बोलनात ” तुना आग्रोहच व्हई ते १४ कोटी सुवर्ण मोहरा माले दे . बोल दिशी ? ” हाई ऐकीसन बये शिष्य येडाना मायेक कराले लागना . पन तो हुश्शार व्हता तो राजा रघुराज कडे ग्या . पन झाये काय राजानी नुकताच विश्वयज्ञ कया व्हता . म्हनीसन राजाना खजिना रिकामा व्हई जायेल व्हता . राजानी त्याले तीन दिन थांबानं सांग . ” तु असं कर गड्या ‘ तीन दिन नंतर राजवाडामा ये ” मग राजानी काय कये माहित शे का ‘ त्यानी इंद्रावर स्वारी करानं ठरावं . इंद्राले रघुराजाना पराक्रम माहित व्हता इंद्रा नी कुबेर ले हाई हकिकत सांगी . इंद्रानी काय कये मंग आपटा न्या झाडे सना पानेसन्या सोनाना नाणा बनाडात . ती जसा पाऊस पडस ना ‘ तसाच त्या आपटाना पानेवरी बनाडेल नाणासना पाऊस पाडा . कौत्स त्या सुवर्ण मुद्रा लईसन वरतंतु ऋषी कडे लई ग्या . आनी हाई गुरु दक्षिना ल्या म्हनीसन इनंती कई . पन ऋषी नी राजाले त्या सुवर्ण मुद्रा परत क्यात . राजानी आपटासन्या पानेसनी बनायेल सोनासन्या मुद्रा आपटाना झाड खाले ठीसन लोकेसले त्या लूटाना सांगात . लोकेसनी आपटासना पानेसन्या सोनान्या मुद्रा लुट्यात . आनी त्या वृक्षानी पुंजा बी कई . त्या दिन पाईन आपटाना पानेसले सोनानं मोल येल शे . म्हनीसन त्या दिन लोके सोनं लुटतस आनी आपटाना झाडनी पूजा करतस. खरं तर दुर्गा देवीनी महिषासूर राक्षसना वध या दिन कया .. प्रभु रामचंद्रसनी रावणवर विजय मिळावा ‘ पांडवेसनी आपला शस्त्र आपटाना झाडना खोबणीमा लपाडा व्हतात ज्या दिन काढा त्या दिन त्या शस्त्रास नी पूंजा कई . तो दसरा ना दिन म्हनीसन असा या पुरान कथामा देल शे म्हनीसन फार प्राचीन काय पासून आपुन दसरा हाऊ सन साजरा करतस. बरं मंग मंडई … ” दसरा सन मोठा ‘ नाही आनंदाले तोटा ” बरं तर मंडई , . . . एस मंग ‘ राम राम विश्राम बिरारी ‘ धुळे . 9552074343 ……