सारंखेडा जत्रा मा घोडा देखाले लागी टॅक्स ?
सारंखेडा घोडा टॅक्स सारंगखेडानी जत्रामा दरसाल मोठा घोडा बजार भरस आशिया खंडना सर्वात मोठा बजार.यां जत्रामा 7/8 कोटीमा एक एक घोडा इकास.
म्हणजे mwb नी मर्सडीना ठाक लागतं नही. सादा माणसे असा घोडा इकत लेवू सकत नही. सादा लाख दोन लाखनं टर्ल(घोड) इकत ते लेवाई जाई पन मंग त्यांना खर्च? त्यांन खान पान थोप ठेवाले जराखा पैसा लागतंस का? कोणता नाऱ्याले हाऊ खर्च पुरवडाव से?हौसी करोडपती, अब्जोपतीज आसा घोडा लेवू सकस.
मंग आपीन जत्रामा जावो नकट नकट जिलोम्बी, छटाक छटाक भज्या खावोनी जत्राम्हानां घोडा, दखी लेवो. घर जाई गोधडी पंघरी जपी जावो.नी मंग तुमले आवडेल घोड सपनमां ई. त्यावर बठा नी गावभर तंगाडत बठा. तुमन पोट भरी गे का मंग घरनीबाई, पोरे यांसले बी एक एक चक्कर फिरावा.
टॅक्स बठाडी दीना
पन हाई सपन बी आते माग व्हई गे.कोणी तरी त्यावर 30 रुप्या टॅक्स बठाडी दीना. धाकलामा धाकल कुटुंम लिद तरी ते 4 लोक व्हतस. म्हणजे घोडा दखना व्हतीन ते एक कुटुंमले 120 रुप्या देना पडथीनं.
खाले देयल पोस्ट वाचा.
सारंगखेडा गराम पंचायत म्हणस आमीन हाऊ टॅक्स लायल नही. कोणता औरंगजेबनी खान्देसवर हाऊ जिजिया कर लावा? बहिष्कार टाका टॅक्सवर. एकजूट करी बंड करा.
