रामराम आदरणीय मंडई बोरीस नी सती अहिल्यादेवी यात्रोत्सवास 9 फेब्रूवारी पाईन चालू व्हयी रायनी.
कमीतकमी तीन आठवडा चालणारी जत्राले लाखो भाविक दर्शनले येतीन. खान्देशामा प्रसीद्ध सती अहिल्यादेवी मंदीरामा बाराही महिना दर्शन व नवसफेडाले भाविकसनी गर्दी राहस.हायी जत्रा गावणच नही ते आजुबाजूला खेडासमा ,चैतन्य,वैभव न प्रतिक से, त एक सांस्कृतिक उत्सव, सणच राहस.
जत्रान टाईमले दिवाळी न गत घरेसले रंगरंगोटी,भांडा झावरी-गोधड्या धोतस हाई गावामाच नही ते आजूबाना खेडासवर पण करतस, कारण तो एक सणच राहस.
जत्रा मा शेतकरी राजा ले लागणार बठ्ठ साहित्य राहस ,भोयर,कुर्हाड,पांभेर,कयक,ईय्या-खूरपे असा आणि इतर बठ्ठ्या वस्तू राहतस,जत्रा न खासीयत लाकूड ना बैलगाडी
खावान हालवाई दुकान,बाया सन नट्टापटा न साहित्य न दुकान , संसार ले लागणार्या वस्तू पायणा,मौतकाकूवा, रातले तमाशा,राहस.
जत्राना दिन मायना तगराव (रथ) नी मिरवणूक निंघस,गावामानाच नहीं ते आजूबाना खेडासवर ना पण तगतराव येतस
जत्राले पाये येणारा भावीक जास्त प्रमाण राहतस ,संध्याकायले भाविक सना करता प्रसाद म्हणिन पीठल-भाकरी करतस.
जत्रा न करता एस.टी महामंडळ कडतीन जादा गाड्या सोडेल राहतीस धुळे, शिरपूर, शिंदखेडा,साक्री,शहादा, दोंडाईचा,असा आणि इतर डेपो माईन गाड्या राहतीस,तसस जत्रामा ना धंदेवाईक,दुकान करता चोवीस तास पाणी, आणि विजपूरवठा नी सोय करेल राहस जत्रा न टाईमले गावमा आणि आजूबाजूना खेडासवर सण न वातावरण राहस .
बोला सतीमाय कि जय
देवरे नरेंद्र बोरीस धुळे
जय सती माता की जय हो, आम्ही विरदेल ग्रामस्थांन कडून आपला जय जयकार हो