आखाजी
आज आखाजी से म्हणजे खान्देशनं नवं साल से आज. अक्षय तृतीया म्हणजे ज्यांना क्षय व्हतं नही तो सण, त्या सणनं पून. संस्कृतमां क्ष ऱ्हासं त्या जागावर प्राकृतमां ख वापरतस. जसं द्राक्षले दराखा, नक्षत्रले नखीतर. तस अक्षयनं आखाजी से. मराठी बोलीमां आखिती म्हणतस, गुजराथी बोलीमां आखात्री म्हणतस, तस अहिराणी नी आदिवाशी भाषामा आखाजी म्हणतंस.
आखाजी म्हणजे त्रेता युगनी सुरवात. म्हणीसन त्रेता युगमां नवं साल आखिजीले सुरु व्हय. तिज पद्धत खान्देशमां से आपलं नवंसाल आखाजिले सुरु व्हस. त्यामा बठा करार मदार आखाजीं तें आखाजी आसा हिसाब ठेवतस.
मराठीमां ज्याले बलुत म्हणतंस त्याले अहिराणी भाषामां गव्हाई म्हणतंस. सालदारनं साल आखाजी तें आखाजी ऱ्हास. गव्हाईदार, मोटकरी, न्हाई, सुतार, लव्हार, सोनार, सिपा, चमार, धोबी हाई बठ आखाजी तें आखाजी ऱ्हाये. गावना शेनना मक्ता बी आखाजी तें आखाजी ऱ्हास. त्यांना लिलाव बी आखाजीले ऱ्हासं.
सर्वात महत्वानी गोठ म्हणजे हाऊ गौराईना सन से. आखाजीले गौरांई माहेरमां यस. खान्देश गौरांईनं माहेर से. त्या निमित खाल, घरेघर गौरांया बठतीस. आंडरी माहेरमां येतीस. या आंडरी त्याज गौरांया सेत. वैशाग बीज ले जवाई संकर गौराईले लेवले यस. त्यारोज त्यांना पहिला पावनचार करतस. त्यामा सिया, दुध, तुप, साखर, सांजऱ्या, लाडू, असं जेवन ऱ्हास. वैशाग तिजनी आखाजी. या रोज खापर वरनी पुरन पुई, आंबाना रस, रशी भात, बठ तयन मयन ऱ्हास.
आजज पित्तरपाटाना गत आगारीना सन बी से. आगारी टकातस, घरना देवबाले निवद दावतस . नी शक्य झाय तें सोयराले बलाई त्याले पित्तर बनाडी जेवाडतस. देवना पुढे पानी भरीसन लाल कोरी घागर, त्यावर पानीना लोटा, त्यावर डांगर नही तें आंबा पुजतस. मंग बठ घर एक माझार बठीसन जेवतस.
दुपार फाईन दोन गावन्या शिव वर दोन्ही गावन्या पोरी टिपरा खेतीस, झगडा करतीस. नी मंग दुसरा दिन गौरांई संकर नदीवर जाई बेयाडतस. संकर माटीना ऱ्हास त्याले पानीमां सोडी देतंस नी गौरांई लाकूडनी से तें तिले घर लई जातंस. आठे आखाजी सरस. माहेरमां येयल एक एक पोरं माहेर सोडी सासरे न्हिगी जातीस नी त्यासन्या रिकाम्या जागा बागी बागी व्हवा भरी काढतीस.
आखाजी म्हणजे माहेरमा येयल आंडरिसन दांगोड. झोका, फुगड्या, गाना, नाच, टिपरा. गाना तें गनज सेत पनं एक गानं भारी से.
आथा आंबा तथा आंबा कैरी झोका खाय वं
या गानावर नी डेरग यावर सकाय निस्ताईवार बोलसू.
बापू हटकर
खान्देशी आखाजी
आखाजी भाग दुसरा
मूळ गाण आस से तें मंडई,आथा आंबा तथा आंबा कैरी झोका खाय वं!च्याईसगावले 24/25 मार्च 2000 साल मां अखिल भारतीय अहिराणी संमेलन भरेल व्हतं. अध्यक्ष प्रा डॉ रमेश सूर्यवंशी व्हतात. उदघाटक अरुणभाई गुजराथी नी समारोपले व्हतात, आंमयनेरना आमदार स्व गुलाबराव बापू पाटील. तिन्ही बी अहिराणीना दिग्ज व्हतात. सुभाष नाना अहिरे या अहिराणींना ध्यास लेनार साहित्यिक टेजवर व्हतात. या संमेलनमां मी बैजबरीमां घुसनू. माले तें कांय कोनी वयखे नही.
सुभाष नाना आहिरे यांस्नी आयोजकसले सांगी सवरी माले कविता म्हणाले परवानगी भेटाडी दिनी. मी एक काविता स्वरचित म्हणी दाई.
जीं कर्णना जन्मनी अहिराणी कथा व्हती. दुसरं आखाजीन हाई गाण म्हन नी त्यांना आर्थ उलगडा करी दावा.
अहिरे नानाले तु खूप आवडन. पब्लिक बी खूष व्हई गयी. त्या जवयबी त्यासना बुध्यानी मांता कथाकथन सादर करेत तठे हांई गान त्यांना आर्थ त्या सांगेत. त्या बरोबरज नाना मन नावं बी सांगेत. त्यासना वयंबा पुस्तकंमां हाई गान नी मना नावना उल्लेख त्यास्नी करेल से. तें चला आते मूळ गाना कडे जाऊत. काही लोक, काही कसाले जास्तीत जास्ती लोक असाज म्हणतंस,
आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं!
चूक से हाई. याले चांगला आर्थ नही. काही भागमा
उच्चा आंबा ढग पातळा कैरी झोका खाय वं l
हाऊ बी अपभ्रश से. म्हणजे चूक से. तों सबद असा सेत,
आथा आंबा तथा आंबा कैरी झोका खाय वं
किंवा
उच्चा आंबा डप्पा कैरी कैरी झोका खाय वं
दोनीसना आर्थ बी एकज से
तें मूळ गांनानी सुरवात कशी बी करा.
आथा आंबा तथा आंबा कैरी झोका खाय वं
हाई करा किंवा,
उच्चा आंबा डप्पा कैरी, कैरी झोका खाय वं
आंबान झाड म्हणजे कुटुंब, त्या कुटुंबना पोरे म्हणजे आंबा. पोरं म्हणजे कैरी. तें हाई कैरी म्हणजे अल्लड पोरं से. ती गावभर मस्त हासत खेत फिरस. पन तीनाकडे वाकडी नजर करी दखानी कोनी हिम्मत नही, का कीं, दोन वाघ सारखा भाऊ तीना मांगे पुढे उभा सेत. आथा आंबा तथा आंबा मधमां कैरी सुरक्षित से. किंवा वाघ सारखा भाऊंनी बहीनंना डोकावर छत्र छाया से उच्चा आंबा डप्पा कैरी, भाऊंनी सावलीमां बहीन सुरक्षित से.
कैरी तुटनी खडक फुटना झूई झूई पानी व्हाय वं
एक रोज बहीनन लगीन धराई गे. म्हणजे ती त्या कुटुंब फाईन तुटी पडनी. सासरे गई. तों प्रसंग इतला दुःखद व्हता कीं ज्यांन दगडनं काईज व्हई त्यांना बी डोया म्हाईनं पानीन्या धारा लागण्यात.
झूई झूई पानी व्हाय तठे रतन धोबी धोय वं
सासरे जावावर त्या पोरले माहेर, माय, बाप भाऊ, बहीन, सई यांस्नी याद येस नी त्या टाइमले तीना बी डोया म्हाईन झूई झूई पानी व्हास. तठे रतन धोबी धोन धोस. हाऊ रतन धोबी कोण से? त्या पोरनं मन से. तिले रतन सारख्या गोड आठणी येतीस नी मंग हाई धोबी रुपी मन बाल पन फाईन तें सासरे न्हिगी उनी तवलोंगन्या आठणी काढस. बठ याद रुपी माहेरनं धोन धोस.
रतन धोबी धोय तठे कसाना बजार वं?
त्या यादस्मा एक याद हणजे गावना बजार. त्या बजारमां माय कडे झिन्ग (हट्ट) लाईसनी मायले पाहिजे ती वस्तू ती लेवालेज लावस. त्या बजारमां कांय मांडेल से?
रतन धोबी धोय तठे कल्लाना बजार वं l
माय माले कल्ला ली ठेवजो बंधुना हाते दी धाडजो l
त्या माहेरना बजारमां कल्ला, तोडा, बाईना बठा साज इकत भेटस. मंग ती पोरं मायले निरोप धाडस, माडी मना करता कल्ला ली ठेवजो नी जवय बंधू भेटाले ई तंवय माले दी धाडजो. असा प्रकारे कल्ला ना जागावर, तोडा, गोट, पटल्या, येल्या दंच्या , दंडवरनं कड, चिंताग, हार, एकदानी, बाया बगड्या, नथ, अंगठी, बजूबंद असा बठा दागीनासन एक एक करी नावे लेओ.
बापू हटकर
आखाजी
आखाजी
आज आखाजी से म्हणजे खान्देशनं नवं साल से आज. अक्षय तृतीया म्हणजे ज्यांना क्षय व्हतं नही तो सण, त्या सणनं पून. संस्कृतमां क्ष ऱ्हासं त्या जागावर प्राकृतमां ख वापरतस. जसं द्राक्षले दराखा, नक्षत्रले नखीतर. तस अक्षयनं आखाजी से. मराठी बोलीमां आखिती म्हणतस, गुजराथी बोलीमां आखात्री म्हणतस, तस अहिराणी नी आदिवाशी भाषामा आखाजी म्हणतंस.
आखाजी म्हणजे त्रेता युगनी सुरवात. म्हणीसन त्रेता युगमां नवं साल आखिजीले सुरु व्हय. तिज पद्धत खान्देशमां से आपलं नवंसाल आखाजिले सुरु व्हस. त्यामा बठा करार मदार आखाजीं तें आखाजी आसा हिसाब ठेवतस.
मराठीमां ज्याले बलुत म्हणतंस त्याले अहिराणी भाषामां गव्हाई म्हणतंस. सालदारनं साल आखाजी तें आखाजी ऱ्हास. गव्हाईदार, मोटकरी, न्हाई, सुतार, लव्हार, सोनार, सिपा, चमार, धोबी हाई बठ आखाजी तें आखाजी ऱ्हाये. गावना शेनना मक्ता बी आखाजी तें आखाजी ऱ्हास. त्यांना लिलाव बी आखाजीले ऱ्हासं.
सर्वात महत्वानी गोठ म्हणजे हाऊ गौराईना सन से. आखाजीले गौरांई माहेरमां यस. खान्देश गौरांईनं माहेर से. त्या निमित खाल, घरेघर गौरांया बठतीस. आंडरी माहेरमां येतीस. या आंडरी त्याज गौरांया सेत. वैशाग बीज ले जवाई संकर गौराईले लेवले यस. त्यारोज त्यांना पहिला पावनचार करतस. त्यामा सिया, दुध, तुप, साखर, सांजऱ्या, लाडू, असं जेवन ऱ्हास. वैशाग तिजनी आखाजी. या रोज खापर वरनी पुरन पुई, आंबाना रस, रशी भात, बठ तयन मयन ऱ्हास.
आजज पित्तरपाटाना गत आगारीना सन बी से. आगारी टकातस, घरना देवबाले निवद दावतस . नी शक्य झाय तें सोयराले बलाई त्याले पित्तर बनाडी जेवाडतस. देवना पुढे पानी भरीसन लाल कोरी घागर, त्यावर पानीना लोटा, त्यावर डांगर नही तें आंबा पुजतस. मंग बठ घर एक माझार बठीसन जेवतस.
दुपार फाईन दोन गावन्या शिव वर दोन्ही गावन्या पोरी टिपरा खेतीस, झगडा करतीस. नी मंग दुसरा दिन गौरांई संकर नदीवर जाई बेयाडतस. संकर माटीना ऱ्हास त्याले पानीमां सोडी देतंस नी गौरांई लाकूडनी से तें तिले घर लई जातंस. आठे आखाजी सरस. माहेरमां येयल एक एक पोरं माहेर सोडी सासरे न्हिगी जातीस नी त्यासन्या रिकाम्या जागा बागी बागी व्हवा भरी काढतीस.
आखाजी म्हणजे माहेरमा येयल आंडरिसन दांगोड. झोका, फुगड्या, गाना, नाच, टिपरा. गाना तें गनज सेत पनं एक गानं भारी से.
आथा आंबा तथा आंबा कैरी झोका खाय वं l
या गानावर नी डेरग यावर सकाय निस्ताईवार बोलसू.
बापूसाहेब हटकर