वास्तव ahirani shayari on life
रसिक वाचक आग्रहास्तव
वास्तव
हाऊ मना तो मना
सगा सोयरा भाऊ बंध मना
पोटले पाटा पायले घट्या
जीवना बहू हाल याना
याना साठी त्याना साठी
एकटाच हाऊ धावत राहीना
मनी बायको मना पोऱ्या
याले भलता पुळका त्यांस्ना
व्हत नव्हथं घरदारणं सर्वासले हाऊ देत वना
पोटले तुकडा आंगणा कपडा
जलमंभर जुनाच याना
यानं घेऊ त्याले देऊ
जलमंभर देतच वना
हयात घाली बांध कोरामा
भाऊ बंदकीमा राडा याना
वऊ यानी पोऱ्या याना
नात नातू जवाई याना
ठीयेल कमाई बापजादानी
सर्वासले हाऊ वाटी ऊना
मोहमायाना जंजाळमा दाणधरमं नही याना
मनी बायको मना पोऱ्या लेकीबाळीसमा जीव याना
वना कोरोना कुणी ढुकेना
जिवना बहु हाल याना
आंगले कपडा पोटले तुकडा
ववा बेटया कुणी देईना
मसणवटीमा जीव याना अर्धावर जळत राहीना
नही आग्या नही खांद्या
पानी देवाले कोण ऊना
नही मांडी नही ऊशी
दाळ शिधा नही शेवटना
याना मढानी राख सावडाले
गावगाडाना कोण वना
गावगाडाकार साहेबरावतात्या नंदन ताहाराबादकर नाशिक