काय लयना व्हता संगे तू? ahirani shayari on life
काय लयना व्हता संगे तू?
(मन्ही हिंदी “क्या लाया था साथ रे बंदे!” ह्या कईतानंअहिरानीम्हा भाषांतर आन चालबी तीच)
काय लयना व्हता संगे तू ? काय आठीन ल्हई जासी रे?
एखलाच ऊना व्हता आठे तू, एखलाच निंघी जासी रे!!
माय-बापनी तुले जल्म दिन्हा, व्हाडेलाईसन मोठा कया!
तन मनखाल कर सेवा त्येस्नी’ सिधा स्वर्गम्हा जासी रे!!
आजला-आजली, चुलता-चुलती, मामा-मामी, भाऊ-बहिनी!
ह्यासले जर जीव लावसी ते, जीवनभर सुकना र्हासी रे!!
बायको-पोर्हे नैत साधा-भोया, धन-दौलतवर त्यास्ना डोया!
मोह-मायाना जंजायम्हा तू, काना-बाना व्हई जासी रे!!
देव नही सापडस दगडेस्म्हा, र्हात नही तो मंदिरम्हाबी
देख तुन्हा मनम्हा ढुकीसन, तठे देव खरा दिखी जाई रे
येवोत कितल्या आपदा-बिपदा, हिम्मत बिलकूल हारु नको तू!
कितलंबी येवो संकट भारी, फटकाम्हा ते टई जाई रे
संगत धर तू सद्विचारनी, सोबत सोड दुर्विचारनी!
सत्कर्म जर करसी सदा तू, जल्म सफल व्हुई जाई रे!!
शिवाजी साळुंके,’किरन’
हल्ली मुक्काम- C/of गणेश साळुंके,
“शिव श्रेष्ठ कॉलनी”, अशोकनगर,
फासीना डोंगरजोगे, नासिक.