अहिराणी कवी सुनील पाटील सर
अहिराणी कवी सुनील पाटील सर
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
************************
… नानाभाऊ माळी
इचारन्ह गासोडं सोडी वाटत ऱ्हावो!मानव समाजल्हे मोक्या चोक्या सत्यान्हा आरसा दखाडतं ऱ्हावो!रंजेल गांजेल शेतकरीनं जगनं दखाडतं ऱ्हावो!धुर्ते धुर्ते लेखनीतून नेम्मन डोया हुघाडतं ऱ्हावो!या कामे ज्या करतस त्यास्ले कवी, लेखक म्हतंस!आनभव इचारन्ह भालकुत कोनले आवडो नं आवडो पन वाटत ऱ्हावानं काम कवी, लेखक करत ऱ्हातसं!नव्वा डोया देवानं काम करत ऱ्हातसं!खान्देश अहिराणी आनी मराठी कवी सुनील पाटील सर नेम्मन उजाये दखाडानं काम करी ऱ्हायनात!शेतकरीनं जगनं कितलं कठीन ऱ्हास ते आपली कवितातून दखाडी ऱ्हायनात!
कोण सेतंस त्या…..
मी मांगे पयत ऱ्हायनू
मव्हरे मव्हरे जानारस्न
…. हिरद चोरी लयनू!🌹
खोल खोल हेरना त्या
ठाक वर लयी येतंस
ग्यानन्ह गासोडं भांधेलं
कवी संगे लयी जातंस !🌹
डोया हुघाडेलं जिंदगी
दूर मव्हरे पयत ऱ्हास
अंधाराम्हा वात बयेस
उजाये दखाडतं ऱ्हास!🌹
घर वावर सुख दुःखनीं
शेतकरीनीं जिंदगी ऱ्हास
हुभं वावर वखरी काढो
खरी मर्दानंगी ऱ्हास!🌹
त्या दिन सनवार व्हता!गणपती बाप्पा चतुर्थीनां दिन व्हता!घरेघर,गावेगाव गणपती बसाडानी धामधूम व्हती!धाकला मोठा मार्केटम्हा गच्ची गर्दी व्हती!उभा ऱ्हावाले जागा नई व्हती!मार्केटलें गणपती सजावटनं नवनव सामान येल से!इतलं सामान दखी जीव निव्वायी गयता!न्यारी न्यारी डिझाईननीं सजावटम्हा गणपती बाप्पा सजी सुजी दिखी ऱ्हायंता!सजावटन्हा खर्च कितला भी ऱ्हावो, तरी भी सजावट कमी पडी ऱ्हायंती !न्यारी न्यारी सजावट दखी डोयानीं भूक भागी ऱ्हायंती!सनवारफाइन ११ दिन पावूत गणपती बाप्पानां उत्सव सुरू व्हयी जायेल से!डोया, कान, हिरद बठ्ठ भक्तस्नी गणपती बाप्पाले व्हायेलं से!गणपती बाप्पा बुद्धीन्हा देव से!सतबुद्धीन्हा देव से!शुभ कार्यांनी सुरवात गणपती बाप्पान्ह नाव ल्हीस्नी व्हयेलं ऱ्हास!त्याचं दिन बुद्धी देवनां संगे खान्देश कवीनं दर्शन व्हयनं!
त्या सनवारनां दिन बुद्धीदेव गणपती बाप्पालें बसाडानी धामधूमम्हा चाली ऱ्हायंती!त्या धामधूमम्हा मन्हा मोबाईल टिरिंग टिरिंग खनकी ऱ्हायंता!खिसाम्हाईन मोबाईल काढी दखा!मोबाईलम्हा नाव दिखनं व्हतं ‘सुनील पाटील!’…. नाव दखताचं मी हारके भरायी गयथु!एकदम साधा मानोस!गालवर वाढेल धाकली कायी धव्वी दाढी!आर्ध-मर्ध धव्वे डोकं व्हयेलं!त्या डोकाम्हा जित्त, वास्तव, जगनं बठेल!कवी मन बठेलं!नव निव्वायन्ह लिखणारा सुनील पाटील सर घर, वावर, निसर्ग, शेतकरी, पीक पानी, खेती लेखनीम्हा भरी मव्हरे जायी ऱ्हा यनातं!समाजलें अस्सल चित्तर दखाडी ऱ्हायनात!खेती आते सोफी नयी!राब राब राबनारन्ही खेती से!तरीभी शेतकरी भुक्या से आसं दुःख मांडणारा या खान्देश कवींना फोन येवावर खरचं हारके भरायी गयथू!त्या बोलनात, ‘नानाभाऊ राम राम!मी हिंजवडीले येल से पाव्हनाकडे!चार वाजापावूत तुमन्हा घर यी ऱ्हायनूतं!’🌹
हिरदन्हा सद्गुनी मानसे आक्सी सप्पनम्हा यी भेटतसं!एकाएक गयाभेट करी निंघी जातंस!आपुन आपला मनलें समजाडी लेवो!आपन म्हनो ‘जावू द्या,सप्पन व्हतं’! पन तिचं हिरदन्ही व्यक्ती साक्षात भेटनीं ते त्याले काय म्हनों मंग?…दूधम्हा साखर!!!का साखरम्हा दूध!का शिखरनम्हा दूध!!तुम्ही काय भी म्हना!पन तो आनंनं दुन्याथून भारी ऱ्हास!🌹
सुनील पाटील सर आनी त्यास्ना पाव्हना देवेंद्र(लोटन)पाटील सर ४-३० लें बरोब्बर घर उनात!कवी, लेखक भावनिक ऱ्हातसं,आसं म्हंतंस!दुसरास्लें जीव लायी आदर्श जीवनन्हा नेम्मन पुरावा देत ऱ्हातसं!त्या तिसरा पहारलें उनात!आम्ही खल्ली याय बुडापावूत गप्पा सप्प्पा मारत बठनूत!मैत्रीन्हा धागा आखों पक्का व्हतं ग्या!सुनील पाटील सर शेतकरी सेतंस!थेट नागरटी फाइन ते पिकं काढा पावूतंन्ह्या गप्पा व्हयन्यात!त्या बोली ऱ्हायंतात!मी आयकी ऱ्हायंतू! ‘शेतकरी जगन्हा पोसिंदा ऱ्हास!लहिरी हवामानन्हा पायरे बठ्ठ गणित बिघडी जास!खेती,पीकपानी, बी बिवारं, मजुरी,हावू कवितानां आनी साहित्यान्हा विषय खोलवर लिखाले जोईजे!’ शेतकरीन्ह दुःख कवितान्हा इशय व्हयी ऱ्हायना!शेतकरीनं वास्तव दुःख मांडणारा शेतकरी कवी घर उनात!आम्हनी धल्ली मायना पाय पडनात!१०१वरीसन्ही मायनी गये लायी आशीर्वाद दिन्हात!भेट कव्हयं सांगी येतं नयी!एकाएक व्हयी जास!
सनवारनां दिन गणपती बाप्पा वाजत गाजत घरें घर यी ऱ्हायंतात!कवी सुनील पाटील सर त्याचं दिन उंथात!अस्सल अहिराणी कवीतानां खजिना खोली ऱ्हायंतात!जशी काय वावरन्हा मेरवर बठी,मोक्या चोक्या पाय पसरी निय्यीगार खेतीवर बोल्या सोडी
ऱ्हायंतुत!आम्ही घर,वावरनीं कविताम्हा रंगी जायेलं व्हतुत!
ज्यांस्नी याद उंथी त्या देवना मायेक साक्षात भेटालें येल व्हतात!!असा हावू देव माणूस!४०-४२ किलोमीटर दूरथीन भेटालें उंथात!काही मानसे देवमुखे भेटत ऱ्हातसं! हिरदम्हा सद्गुनन्ही धाकल्सी पिसोडी लयी फिरत ऱ्हातसं!या सद्गुनी पिसोडीना धनी शहादा तालूकाम्हा निमगूळ गांवना आंगेनां सेतंस!आंगे पांगे तापी माय व्हायी ऱ्हायनी!निय्या वावरेस्मा निय्ये पानी व्हायी ऱ्हायनं!तेचं लेखनीम्हा उतरी ऱ्हायनं!आशा साक्षात्कारी देवकवी हडपसरलें घर उनात!आम्ही भागबल्ली सेतंस!देव अवतारी कवी मनसारखा भक्तलें भेटालें उंथात!त्यास्ना देवपनम्हा मी इघरी ऱ्हायंतू!इघरी इघरी एकजीव व्हयी ऱ्हायंतू!
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
***************************
… नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)
ह.मु. हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
७५८८२२९५४६
दिनांक-१३ सप्टेंबर २०२४
nanabhaumali.blogspot.com