अहिराणी कथा झिंगानाना
झिंगानाना ” ( एप्रिल फुल)
झिंगानाना एकलाच घरमा आराम करी राहिन्ता , रखमा साक भाजी लेवाना करता बजरमा जायेल व्हती , तवय कवाडनी कडी ना टकटक आवाज येस आनी झिंगानाना
कवाड उघडस… देखस ते काय झिंगानाना ना साला सुदाम येल -हास …..
सुदाम : काय पाव्हना … कसा सेतस तुम्हीन ?
झिंगानाना : काय नै सुदाम करमना फये भोगी राहिनु मी
सुदाम: काय व्हयन ? आणि जिजी कोठे जायेल से ?
झिंगानाना : ती ललिता पवार साक भाजी लेवाले जायेल
से बजारमा .
सुदाम: नेंबन बोला हो पाव्हना, जिजी ले ललिता पवार
काब म्हनी राहिनात तुम्हीन?
झिंगानाना : सुदाम ललिता पवार तरी बरी से , तुन्ही
जिजी नुस्ती कहर से रे कहर से …….
सुदाम: काय व्हयनं इतल, काय कहर कया मन्हा
जिजीनी ?
झिंगानाना : सुदाम दहा वरीस पाईन मी तिले सहन करी
राहिनु रे , साला मन्हा जीव से का जिवडा. तुन्हा
माय बापनी फसाडं रे माले.. फसाडं…
सुदाम: काय ? कसं काय फसाडं मन्हा बापनी तुम्हले ?
झिंगानाना : अरे रखमाले दोन बहिनी व्हत्यात हाई माले
मन्हं लगन होवा नंतर समजनं, माले फक्त
रखमालेच देखाडं, तुन्ह्या दोन्ही देखन्या चिकन्या
बहिनीस्ले दपाडी ठेवं घरमा , आनी इले समोर आन
मन्हा ……
सुदाम: त्यानामा काय व्हयनं मंग ?
झिंगानाना : तुन्ही दोन नंबर नी बहिन कितली मस्त आनी
सुदंर व्हती दिसाले… सडपातय जशी चवयीनी सेंग,
रंग भी कितला भुरा भुरा भस्सक व्हता तिन्हा ..माले
देखाडतात ते मी तिन्हासीज लगन करतु ना .हाई
ललिता पवार देखाडीस्नी फसाडं रे माले फसाडं …
( तेवढामा रखमा बजार करीस्नी येस आनी घरमा साला पाव्हना काय चावयी राहिनात हाई कान दिस्नी ऐकाले लागस .. )
सुदाम: पाव्हना तुम्हीनच जिजीले पसंत करी व्हतीना ,
मंग आते काब पसतावा करी राहिनात तुम्हीन?
झिंगानाना : कसानी पसंत पसंती सुदाम, अरे तुन्ही माय
आणि मन्ही माय दोन्ही मैत्रीनी निघन्यात आणि
जवय मी रखमाले देखाले गयतु तवय तुन्हा मायनी
मन्हा मायले नवुवारी लुगडं नेसाडं आनी तठेज घोय
व्हयना ,
सुदाम: कसाना घोय व्हयना पाव्हना , तुम्हीन काहीबी
चावयी राहिनात आते…..
झिंगानाना : अरे सुदाम ते नवुवारी लुगडं मन्ह कफन बनी
गय , मन्ही मायनी हेकाज धरा ” करसु ते हाईच
पोर करसु नै ते झिंगाले कुवाराच ठेवसु ”
सुदाम : पाव्हना हाई लुगडानी काय भानगड से आखो?
झिंगानाना : अरे मन्ही माय जुना चाल रितनी से , माय
मन्हे नवुवारी लुगडं नेसाडावर मी पोरले कसी
नापसंत करु , पोर कडला लोकेस्ले चालीरिती,
मानपान देनं माहित से .मन्ही माय कोनच ऐकान
नावच नै ले , त्या दोनसे रुपयाना चिंधडानी माले
बरबाद करी टाक , लगन करा नंतर मन्ह्या जिवनना
चिंधडा चिंधडा व्हई गयात सुदाम…..मी पार बरबाद
व्हई गऊ …..
( सुदामन ध्यान खिडकीमा जास , तो देखस की रखमा
जिजी बठ्ठ ऐकी राहिनी, सुदाम झिंगानानाले सांगाना प्रयत्न करस की रखमा जिजी ऐकी राहिनी अस पण झिंगानानाना ध्यान मा येस नै )
सुदाम: पाव्हना मन्ही जिजी…….
झिंगानाना : हवं रे सुदाम तुन्ही दोन नंबर नी जिजी मन्ही
बायको -हाती रे ….कितलं मस्त व्हई जात अस
व्हतं ते सुदाम…
सुदाम: पाव्हना मन्ही जिजी …….
झिंगानाना : तुन्ही जिजी मी घरमा उना का मन्हा खिसा
झामली झुमली बठ्ठा पैसा काढी लेसरे, आनी खर्चाले
पाच रुपडा देस माले , माले भी वाटस सुदाम मन्हाभी
खिसा भरेल राहो …. काम वरतुन येवावर मस्त देशी
दारूना अड्डावर जावो थोडीक पावशेर पावशेर टाकी
येवो …रोज कोंबडीन मटन खावो … पन नै रे मन्हं
नशीबच फुटेल से रे सुदाम…
सुदाम: पाव्हना मन्ही जिजी……..
झिंगानाना : हवं रे तुन्ही जिजी से ती रोज माले सेपुनी
भाजी आणि कांदानी पात खावाडस, लगनना पहिले
मी कसा वाघना मायक व्हतु रे कोंबडी ,मटन शिवाय
जेवण करु नै आनी आते सेपुनी भाजी आनी कांदानी
पात खाई खाई माले डेंडारन्या येवाले लागन्यात रे ,
तुन्हां जिजीनी माले वाघना बोकड्या करी टाका
सुदाम ……
सुदाम: पाव्हना मन्ही जिजी ……
झिंगानाना : तुन्हा जिजी बरोबर बाहेर फिराले जावानीभी
चोरी से माले सुदाम, ती बरोबर राहिनी का ” आठे
देखु नका , तठे देखु नका , हाई खाऊ नका ते
खाऊ नका , सुदाम नुस्ता सासुरवास से रे माले
नुस्ता सासुरवास से…….
सुदाम : पाव्हना जिजी….. जिजी…..
झिंगानाना : जिजी …जीजी काय करी राहिना कवय
पासुन तु , तिले काही दया माया नै से रे नुस्ती
हिव्वरना जातनी से ती …. कालदिन ती समोरली
वैनी मन्हासी चावयी राहिन्ती ” भावुजी तुम्हीन
कितला चांगला सेतस ” असी मन्ही राहिन्ती , आनी
आखो काहीतरी सांगाव व्हती , तुन्हा जिजीनी देखं
आनी माले घरमा बलाई लिधं …..
सुदाम: नै हो पाव्हना , जिजीनं काहीतरी काम व्हई
म्हनीस्नी तुम्हले घरमा बलावं व्हई जिजीनी ….
झिंगानाना : कसानं काम आनी कसान काय , तुन्हा माय
फोन उना व्हता तवय , मन्ही सासु बहिरी से तिले
फोन वर बोलेल काही ऐकु येस नै … तुन्हा जिजीले
सहन व्हयनं नै रे ती समोरली वैनी मन्हा बरोबर
बोलेल……
सुदाम: नै हो पाव्हना मन्हा आप्पा आजारी पडेल से हाई
सांगाले जिजीले फोन करा व्हता मन्हा मायनी …..
झिंगानाना : तुन्हा आप्पा भी तो से रे , जल्दी मराव नै तो
माले फसाडं रे तुन्हा आप्पानी, चिकन्या चिकन्या
पोरी घरमा दपाडी ठेव्यात आनी हाऊ छोटा हत्ती
मन्हा गयामा लटकाटी दिधा . …
सुदाम: जाऊ द्या पाव्हना जे व्हवानं होत ते व्हई गय आते
पसतावा करीस्नी काय व्होवावु से ……
झिंगानाना : सुदाम आत्मा कयकयस रे मन्हा , समोर
ताटमा बासुंदी, गुलाबजामुन पडेल व्हत ते झाकी
ठेवं आनी माले हाई आबंटढानं कढीन बोघनं नाक
दाबीस्नी पाज रे , जीव नुस्ता काल्यावाल्या कराले
लागस मन्हा जवय ती घरमा -हास ते …
सुदाम: पाव्हना तुम्हीन नेबंन बोला बर आते ….
झिंगानाना : अरे ती ललिता पवार घर नै से मन्हीस्नी
बोलता ई राहिन रे . ती घरमा -हास तवय ” तोंड
दाबीस्नी बुक्कीना मार ” -हास रे माले , मन्हा घरमा
माले तोंड उघाडानी चोरी से रे सुदाम. माले तु बोलु
दे, मन्ह मन हालकं करु दे सुदाम माले .
सुदाम: पाव्हना तुम्हीन आजना पेपर वाचा का ?
झिंगानाना : नै रे माले कोठे वाचता लिखता येस ….काय
बातमी से पेपरमा?
सुदाम: थांबा मी तुम्हले तुम्हनं आजनं रासी भविष्य
वाची देखाडस.
झिंगानाना : वाच बर काय लिखेल से मन्हा भविष्यमा
आज .
सुदाम: ” आज तुमची मागची पुढची सर्व कसर भरून
निघेल ” आस से तुम्हनं आजन भविष्य.
झिंगानाना : सुदाम काही समजन नै भो भविष्य काय
से ते ….?
सुदाम: थोडा दम धरा , भविष्य खर व्हवानी येय घरमाच
ई राहिनी
( झिंगानाना बागेचकरी मांगे वयीस्नी देखस, रखमा रागमा लालेलाल व्हईस्नी झिंगानाना कडे देखस, रखमाना आवसान देखीस्नी झिंगानानानी बोबडी वयी जास )
झिंगानाना : सुदामऽऽऽऽऽ , सुदाम ऽऽऽऽऽऽ माले कसतरी
व्हई राहिन रे , मन्हा जीव काल्यावाल्या करी
राहिना…. नल्डा कोरडा खट्टक पडी राहिना मन्हा ,
माले चक्कर ई राहिनात, मन्हा मेंदु उलटा गरगर
फिरी राहिना रे सुदाम…ऽऽऽऽऽ
रखमा : ( रागमा) मी ललिता पवार, मी छोटा हत्ती का
मी आंबटढाण कढी का ? कान नै नी धाम नै ,
गावभर उख्खल्डा झामलत फिरानं, दोन टाईम
फुक्कटनं चेंदाले बसस आनी मांगे मन्ह्या कुरापती
काढस, लाज नै शरम नै ….
( रखमा हातमा झाडु लिस्नी झिंगानानाना मांगे सुटस, नाना म्होरे आनी रखमा मांगे आनी सुदाम त्यास्ना मांगे असी पयापय सुरु व्हस)
झिंगानाना : आव रखमा ऐक ना , मी मजाक करी राहिन्तु
आव रखमा मी खोटं बोली राहिन्तु…..
( रखमा झाडुना एक फटका मारस, झिंगानाना आडाथट पडी जास , रखमाना हात चालुज -हास )
रखमा : तुले माय मरी आखो तुले ….
झिंगानाना : आव रखमा आवर ना आते , मी एप्रिल फुल
करी राहिन्तु तुले ….
रखमा : माले तुम्हीन येडी बीडी समजनात का ?
जानेवारी महिनामा तुम्हीन माले एप्रिल फुल करी
राहिनात …..
( झिंगानाना बेसुध व्हवानं नाटक करस आनी मजाना डोया फिराडस )
नितीन अहिरराव, धुय्ये
9096204875