आखाड गटारी उनी हो ahirani language sentences in marathi
आखाड गटारी उनी हो
नानाभाऊ माळी
आषाढ सुरू से!आखाड सुरू से!गटारी अमावश्या कितलाक दिन शे आशी!!दिप अमावस्यानं नाव गटाराम्हा लोयनारस्नी खराब करी टाकेल से!…….आज माले नवा सख्यानां फोन उंथा!धुर्ते धुर्ते वयख पायेख व्हयेल व्हती!गोडांब्यालें मानसे गुइचिटिंग वाटतंस!तार जुडी जास!धागालें धागा शिवाइ जास!हायी नातं रंगतन्हा भाऊ भाऊथीनभी जोगे यी जास!त्या भाऊना धागा हिरदम्हा शिवाइ जायेल व्हता!तो भी मैतर जोडेल सखा!खुशीम्हा मोबाईलवर फोन करी नियुतं दि ऱ्हायंता,’नानाभो बय बठ्ठा आखाडं चालना ग्या भो!आते कितलाक दिन बाकी सेतंस?मोजीस्नी सव-सात दिन ऱ्हायना व्हतीन!!लोयानां दिन भी जोडेचं यी ऱ्हायना!गटारी आतेफाइन दगडे टाकी तुंबेंलं दिखी ऱ्हायन्यात!लोके तुंबेल गटारम्हा लोयलाय करांनी मज्या लेतंस!वरीसम्हा तो एकच दिन भेट्स!बठ्ठ शिनभागडं निंघी जास हो!आपुन गटारम्हा लोया इतला गया-गुजरेलभी नही सेतंस म्हनां!…!’
मित्र त्यान्हत्यान्ही गाडी हाकली- ढकली-भकली ऱ्हायंता!सोतानं ढुंमक सोताचं वाजी ऱ्हायंता!त्यानंत्यानां तूनतून वाजी ऱ्हायंता! माले बोलानी वाटचं उनी नही!एखलाच उराय आवूत हाकली ऱ्हायंता!कशा बोली ऱ्हायंता,’…मव्हरे आखो सरावन लाग्ना का बठ्ठ बन व्हयी जायी नानाभो!तव्हयं नाव काढानं भी पाप ऱ्हास!बरं तें जाऊ दे..आयतवारनां दिन खरबेल बट्टानां बेत करेल से भो!!बोघनाम्हा उकयता बट्टाम्हा निस्त्या बोट्या खाले-वर उस्मयी -उस्मयी वर इतीन!दुपारले पक्क येवानं बरं!आखो तथानंवाटे जावानां बेत व्हयी तें भी सांग भो!तुले गुगलवर मॅपवर पत्ता धाडी दिसू!ध्यानमा ठेव बर भो?याद करी येवानं से.. आयतवार दुपारलें!’ जीवाननीं मन्हा बोलानी वाटचं दखी नही!न्युतं दि मोक्या व्हयी ग्या आनी मोबाईल कट करी टाका!
काय सांगो आते या आखाडलें! गुच्चूपं,मुगामुगा निंघी जावो नां?पन नही,वचक्यामायेक येस,दर वरीसल्हे नाचाडी-नुचाडी धुत्रूमं हुभ करी चालना जास!चांगला शानलाशूनला भी वार्गीन्ह झाड व्हयी नाचतंस!खावलागुंता पुरा पानीम्हा पडी जायेल ऱ्हातंस!त्यास्ना डोकाम्हा एकचं ऱ्हास,’सरावन फाइन नवराती पावूत आपली चटोरी जीभडीलें चव भेटावू नही!निस्त आलन मचक घासघूस खानं पडी!’ सरावन जशा जोगेजोगे आंगेआंगे येतं जास तशा गंजज खाऊगुल्या बावचायी जातंस!
आते आखाड(आषाढ)चालू से!पानी पडी जायेल से!जीव कटायी जायेल से!जीभ निस्ती रवरव-खवखव करी ऱ्हायनी!तोंडलेभी निक्खार पानी सुटेल से!झनझनीत मसाला टाकेल, डोयास्लें तर्रीबाज दिखी आसं खावूशी वाटी ऱ्हायन….आखाडम्हा येरायरन्हा सगासायीस्लें,आंगे पांगेनां खल्ली नातं जोडेल मित्रास्लें,जीव भावन्हा लोकेस्लें आखाडं खावाले बलायी ल्हेतसं!आखाड तिखा ऱ्हास!गोडभी ऱ्हास!गंजज खावू गुल्ल्यास्ना, खावू गुल्ल्यास्ले न्यूतावर न्यूता ऱ्हातसं!बोट्या सोट्या खावलागुंता पाय नेम्मन तथाचं पयतं ऱ्हातसं!
सरावनम्हा बोटी बर्बट बट्टालें अध्यात्मिक श्रद्धानं मोठ्ठ कुस्टायें लायेलं ऱ्हास!मनन्हा कुस्टायालें उलट्या सुलट्या डब्बल टिब्बल लॅचन्ह्या किल्ल्या फिरायेल ऱ्हातीस!मानोस पक्का देवधानी व्हयी जायेल ऱ्हास!रात-दिन आंगम्हा देवपन घुसी जास!पन त्याचं उचडेलनाड्या मंग आखाडम्हा चगी जातंस!
पवतीर महिना सरावनम्हा मानुस सुध्द बोलस, चांगलं बोलस,वागस!गंध जे से तें बठ्ठ टायत ऱ्हास!गंधा इचार आनी मानसे इसडाफोक वास भी सहीन करतसं नही!सरावनफाइन दिवाई पावूतं उलटा सुलटा रस्ते पाय जावावूच नही!मंग दोन-तीन महिनाचं रस्तावर चालो का?बाकींना आठ महिना चकारी उतरी जायेल सारखा काब्र वागस ?बोटी चोखाशिवाय ऱ्हातं नही!सरावनम्हा निक्खार निरक व्हयी पयतंस,वागतंस,चालतंस!आंगेन्हा घरम्हा खुडमिर्ची फयफय फोन्नीनां खकांना सुटेल व्हयी तठेभी त्यास्लें बोटीन्हा सक यी जास!मंग तोंड सुटेलनां मायेक उस्मयी उस्मयी, बोटे दखाडी बोलत ऱ्हावों!
सरावनम्हा शाजूकनां मायेक सोतालें वरणभात्या समजनारा आराया मारी म्हंतंस कशा,’बय बयखी ग्यात हो लोके!देव धरमभी पायतस नही!बट्ठी चव-ढव सोडी दयेल से!कसला खकांना सोडेल से कायंजून!कितला जुग नाकपुड्या दाबी धरी मानोस?निस्ता गंधा वास सुटी ऱ्हायना!तथायीन सोडेल वास आम्हना घरम्हा यी ऱ्हायना,आथा तथा बठ्ठा घरम्हा सुटी ऱ्हायना!बह्य सरावननां उपास तापासभी दखतंस नही, पायतंस नही..इतला चगी जायेल सेतंस हो लोके!’ यांन्हा जिवडा का त्या उकयेलं बट्टाम्हा आडकी जायेल ऱ्हास का काय काय जाने!
दुसरास्ना कानफडा झोडनारा मानोस, सोता सरावनन्हा पहिलेंग आखाड गाजाडस,हायी कोनले सांगावू नही!जीभल्या चाटी चाटी पाची बोटेस्वरी कुचकरी भलका सोताना मुसडामा घालस!बोटी बोटीस्वर ताव मारतं ऱ्हास!थाटीम्हानी एकेक बोटी नेम्मन दोन बोटेस्वरी उखली, मुस्सडाम्हा ढकली!चोखी चाखी चायी चुयी भुगा करीं खायी!मनन्ही आमन्या फिट्स तवपावूतं वर्पि वर्पि हानस!दखानां इतलं खायीस्नी भी त्यान्ही ढूक त्याम्हाचं ऱ्हास!जीव पुरा गरावतं नही का?त्या बोटी टाकेल खरबेल बट्टाम्हा पाची बोटे बुचकाडी बुचकाडी वर्पि वर्पि हांनंस नि दुसराले नाव ठेवस!
आते सरता आखाड(आषाढ)सुरू से!गटारी तोंडवर से!कोंबडा,बकरा इकनारा दुकाने जथाबन तथा फुली जायेल सेतंस!तीन महिना मन मारी ऱ्हानं पडसं!मंग तें आतेच तोंड निव्वायी लेवानी गडबड सुरू से!सरावनन्ही बट्ठी कसेरं आतेच काढी लेवानी से!!फाफलायेंलं फाफली जायेल सेतंस!बोटी खावागुंता पानीम्हा पडी जायेल सेतंस!…माले मातर मन्हा मित्रांना फोन येल से!काल्दीन आयतवारनां दिन जेवाले जानं से!तो मन्ही वाट दखाले नको म्हनंशीन लवकर नींघनं से!
भाऊनी बट्ठी तयारी करी ठेयेलं से!कितला किलो मटन लागी तें भी ठरेलं से!मी वैयंजींस्लें गुच्चूप फोन करी सांगेल से!हायी बातमी सक्रेट ठेवानं सांगेल से!त्यानंमव्हरे बोट्यास्नी थाटी सरकायीस्नी मनमव्हरे डबुकडीस्नी थाटी येणार से!बाजरीनीं भाकर मोडी बामकाडी, कुमचाडी जेवनार से!मनंसारखा ना खात्या देवले जेवानं नियुतं से!माले कयबन भूक लागेल से नि कटबन जेवनारभी से!तो बोटी बोटी चाफली खायी!मी डबुकडी खानार से!दोन्ही थाट्या आंगे आंगे मांडेलं ऱ्हातीन!मी डबुकडीस्न बट्ट बाजरीनी भाकर मोडी,वर्पि वर्पि हांनंसू!तो मन्ही थाटीगंम डोयातानी दखी!मी डोया मिचकायी त्यांगम दखसू!मैत्री जगाडानी से!तो लोयलोय लोयी,आखाड जागाडी!मी पानी मांगांडी,आखाड जगाड सूं!मव्हरे सरावन से, आतेच लोयी खायी लेनं से!मंग देवधानीलें लागी मान पाक करनं से!
नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-१९ जुलै २०२५
1 thought on “आखाड गटारी उनी हो ahirani language sentences in marathi”
Comments are closed.