भावड्यासहोन रामराम, नमस्कार! ahirani language sentences in marathi

भावड्यासहोन रामराम, नमस्कार! ahirani language sentences in marathi

भावड्यासहोन रामराम, नमस्कार!

आव्हढा रामपाह्यराम्हा ह्या शिवाजीआप्पाले काय येडाचाया, उपरती का काय म्हन्तस ती सुचनी व्हई बरं? आसं तुम्हले वाटनं साजिचकच से, तुमीन माले भले नावबोट ठेवाश्यात तरी चाली, पन आज मन्हा मनम्हातली भडास काढाबिचूक माले चईनच नई पडाव आव्हढं बाकी खरं हं! कालदिन मन्ही आस्तुरीनी मन्हासाठे हाफूस आंबासना आमरस बनाडी ठेयेल व्हता, पन रातले माले तव्हढी भूक नई व्हती म्हनीसन तो रस तसाच फ्रीजम्हा पडेल से.

सकाय उठताखेपेज तोंडबिंड धोईसनी त्या आमरसनी मस्त मिटक्या मारी मारी मज्जा ल्हिसू म्हन्त पन, आते तो ईच्यार बाजूले ठी सनी पह्यले दादासाहेब किसनराव जोरवेकर यासना वाढदिवसवर लिखसू मंगज त्या आमरसनी चव आन बाकीन्या भानगडीसकडे दखसू आसा पक्का ईच्यार करीसनी लिखाले बठनू गड्यासहोन!

ahirani language sentences
ahirani language sentences


कालदिन महाराष्ट्र दिन, कामगार दिन आन आपला च्याईसगावना आपला दैनिक ग्रामस्थ ह्या पेपरना संपादक, मालक, चालक आश्या समद्यान समद्या जबाबदा-या कोन्ही मदत भेटनी ते बरं, नै भेटनी ते बरं, ते वझं एखलानाच खांदावर उखलीसन आन व्हाईसनी ल्ही जान्हारा यायम्हा आठरा आठरा तास काम करन्हारा, एकखांबी तंबू, निर्भीड पत्रकार, टाकई प्र. चा.

ह्या गावना माजी सरपंच, मोठा जेठा सामाजिक कार्यकर्ता, परीट समाजना महाराष्ट्र राज्यम्हातला सोताले आर्थिक खार लाईसन जीवनं रान करी करी जोरबन काम करन्हारा आन एकज नई ते ना-या ना-या गनज संघटनासना एक खराखाती सक्रीय, सच्चा, कुशल  समाजसेवक आपला किसनराव ह्या नावले सोभीन आसा आवतारी पुरुस माले कालदिन दखावना आसं म्हनापरीस ह्या कलियुगम्हानबी शिरीक्रिष्ननामायेक हारहुन्नरी, बहुआयामी, हरफनमौला एक चमत्कारी आवलियानं माले जवयथीन दर्सन घडनं आसच मी म्हनसू!


आध्यात्मिक भाश्याम्हा बोलानं झायं ते मी मव्हरे जाईसनी आसं म्हनसू का माले एक युगपुरुसना साक्षात्कार झाया! मायन्यान भो! आजना जमानाम्हा आन ते बी आपला आवते भवते हाजारो संकटे तोंड वासिसनी मव्हरे हुबा र्हाईसनी येले खाऊ का तेले खाऊ! येले गीवू का त्येले गीवू! आसा दुव्वाड ईच्यारना दैतेसनासंगे दोन हात करीसनी ती कुस्ती मंगन राजकीय र्हावो, सामाजिक र्हावो, शैक्षनिक र्हावो पत्रकारिता करताना येन्हारी भानगडीसनी र्हावो का सोताना आंगवर चाल करी येयेल भयानक कर्करोग सारखा जीवल्हेना आजार र्रावो काहीबी र्हावो!

ह्या समदा जंजायसस्म्हाईन सई सलामत भायेर पडी दाखाडन्हारा, आव्हढच नै ते साक्षात त्या यमराजालेबी नाया पाडन्हारा, ह्या ऊतारवयम्हाबी दरोज चार किलोमीटर पायेपाये चालन्हारा, सव किलोमीटर सायकलींग करन्हारा, आव्हढच नई ते आर्धाकलाकलगून थंडागार पानीम्हा नित्यनेम झेपन्हारा हावू आधुनिक युगना कान्हा न्या ह्या समद्या क्रीस्नलिला दखी आयकीसन मी ते वज्जी सकताई गवू! ह्या आवलियाम्हा ढुकी ढाकी दखता दखता त्येन्हा भगतच व्हई गवू!


हावू किसनराव जोरवेकर नावना देवमानूस माले मनफाईन भूज आवडना हाई मी आज तुम्हनाजोडे कबूल कयंस! आन त्येसना बाहत्तरावा वाढदिवसले माले हाजर र्हाता वनं म्हनीसनी मी सोताले खूप खूप धन्य समजस! बैजू! आजलगून मी घरम्हातला, यार दोस्तारेसना आन मोठ मोठा पुढारीसना शेकडो वाढदिवस दखेल आस्तीन पन कालदिसना  दादासाहेब किसनराव जोरवेकर यासना वाढदिवसना आगदी घरगुति, साधासुधाच हो, पन डोयासनं पारनं फिटीजाई आसा धडाकेबाज, भव्यदिव्य आसा मोठ मोठा सबदेसलेबी लाजाडन्हारा वाढदिवस मन्ही आख्खी जींनगानीम्हान पह्यलीसवाच दखा मी!

मन्ही सासरवाडी बोराडी आसल्यामुये मन्हा लगीनफाईनच माले तठला *व्यंकटराव रंधे साहेब* यासना परिचय व्हयना, तईनफाईन दरटाईमले मी त्येसले भेटाले त्येसना घर जाईसनी त्येसना पायेसवर डोकं ठीवू.  विदर्भाम्हातला मन्हा वरोरा ह्या गावले *बाबा आमटे* यासले भेटाले त्या *आनंदवन* ले येयेल व्हतात, तधय मी त्येसले मन्हा घर ल्ही गयन्थू. आव्हढा मोठा मानूस खान्देसना गाडगेबाबानी पायधूय मन्हा घरले लागताच मन्ह घर पवथीर व्हई गयन्थं!

राष्ट्रसंत गाडगे महाराज यासनाबाबतम्हा मन्हासारखानी काही बोलनं लिखनं म्हंजी समिंदरम्हा चुई भरी टाकाजोगी बात से! त्यासना तत्वापरमाने वागन्हारा, त्यासना सामाजिक, शैक्षनिक कार्य करन्हारा खान्देसना गाडगे बाबा स्व व्यंकटराव रंधे (रणधीर) साहेब यासना पाठोपाठ ज्या मानूसनी खान्देसना माटीम्हा आपला सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षिनिक आसी चौफेर सेवा करता करता निडरपने, बेडरपने खमठोकीसनी पत्रकारिता करता करता जो एक आदर्श निर्मान करीसनी आनेक पत्रकार घडावात हाई कालदिन डोयाहाजूर दखीआयकीसनी मी ते त्यासवर फिदाच गवू! मनम्हान मनम्हान मी त्येसवर जीवच ववाई टाका!

कितलं जबरदस्त आगत-स्वागत कयं त्यासना चाहतासनी, दोस्तारेसनी, नातलगेसनी काही ईच्यारुच नका! एकदम नंबर एक! कोठे नावबोट ठेवाले रत्तीभरबी जागा नई दखायनी! आसा जंगी वाढदिवस झाया कालदिसना!


आपला आह्यरानीम्हान एक म्हन से, ज्येनी माय मरी तोज रडी!

ज्येन्हं गाडं फसी तोच उपाडी!!
हाई म्हन ह्या च्याईसगाव नगरीना आस्सल समाजसेवकले, जेठा मोठा पत्रकारले तंतोतंत लागू पडंस. आज भलाई दादासाहेब किसनराव जोरवेकर यासना आवते भवते गनज मोठा गोतावया व्हई पन हाऊ गोतावया बये बयेज गोया नई व्हयना बर का? त्यान्हासाठे दादासाहेब किसनराव जोरवेकर यासनी सोतानं फसेल गाडं सईसलामत भायेर काढासाठे आपली आख्खी जीनगानी डाववर लाई दिन्ही.

एकरुपया मजुरी करताना, मिलम्हा काम करताना, कामगारेसन्या समस्या मांडीसनी संप, आंदोलने करीसनी नवकरीनी आन जीवनी फिकीर न करता न्यायनी बाजू मांडीसनी समोरनासले कोर्ट कचेरीम्हाबी चित्ताधडक पाडीसनी खरानी जीत आन खोटानी वाट लाई दाखाडानी जीद पुरी करीसनी वैरीसना वैरपनलेबी पुरीसन उरन्हारा ह्या क्रांतिकारक समाजसेवकले, निडर पत्रकारले, सत्यवादी महापुरुसले साथ संगत देताना भगवान शिवशंकरले साकडं घाली घाली नवस बोली बोली रातदिन त्येसना आजारपनम्हा सेवाभावखाल सेवा करन्हारी मन्ही बहीनले आरस्तोल करंस आन आम्हना पाव्हनासले शंभर वरीसनं उदंड आयुरारोग्य लाभो आसी त्या देवबाले (तो खरोखरंच व्हई ते)  दोन्ही हात जोडीसनी रावनाई करंस आन थांबस!

तुम्हनाच!

शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसगाव, जि. जयगाव.