पप्पा! माले हावा घाल! ahirani language sentences

पप्पा! माले हावा घाल! ahirani language sentences

पप्पा! माले हावा घाल!

भावड्यासहोन नमस्कार!

सध्या जथा दखो तथा लगनेसना धुमधडाका सुरु से! आज कोन्ही हायद ते सकाय कोन्ह लगीन! कोन्ही हायदले जावो आन कोन्हा लगीनले जावो, मालेगावले जावो का नासिक जावो बहे! आठेजावो का तठे जावो कोठे जावो? घरम्हा आठ धा मुय पत्रिका ई पडेल्या सेतीस, काय करो आन काय नई आसा ईच्यरम्हा डोकं फिरी जावाले करंस पन एक बरं से का तुम्हनी मावसीना सल्ला आसा आडचीनना येय वखतले भलताज कामे येस मायन्यान भो!

ahirani language sentences
ahirani language sentences

तिन्हा हिसाबखाल ल्हिनं का मन्हा जीवले आजिबात घोर नई र्हास! तुमीन म्हनश्यात का हाई तुम्हनी मावशी आसी कितलीक डोकेबाज से? खेसर गम्मतनी बात सोडी द्या हो तथी! पन, तिन्ही आक्कल हुशारी जरा ध्यानम्हा ते ल्ह्या. ती का नई तिन्हा म्हाहेरना आन मन्हा सगासाईसम्हा नेम्मन वाटा पाडीपुडीसनी जवयजवय समदाच लगनेसना बजेट चेवचतरायवार बठाडस तेन्हामुये लगनेसले कसकाय जाता ई यान्ही माले आजिबात कायजी नई वाटंस. बिलकुल नो टेन्शन, आन लगनले जावासाठे मी सोतालेच मनम्हाना मनम्हान म्हनंस अटेन्शन प्लीज!ती नेमकं काय करंस म्हाईत से का?

ज्या आंगे पांगेना लगने सेतंसना तठे मन्हा बरोबर मोटरसायकलवर यायम्हा दोन नै ते कधय कधय तीन तीन लगनेसनी टाई अटेंड करीकुरीसनी आन टाक मिक वाजाडीबिजाडीसनी दुफारलगून मोकी व्हई जास. मातर हारेक लगीनम्हा दोन दोन बल्का माराबिचूक नई र्हास बर का! बैजू!

तिन्ह ते पोट से का मोट से कोन जाने? ज्या दूरना म्हन्जे लांब आंतरवर्हना लगने र्हातंस तठे आम्हना ज्या नातेवाईक जान्हार र्हातंस त्येसना तपास तुपास काढीकुढीसन त्यासना संगेमंगेज आहेर धाडी देस, नै ते पैसा तरी वाजाडी देस.


हाई पैसा वाजाडानीबी गम्मत वज्जी भारी से तिन्ही! ज्या सगासाईसनी आम्हना पोर्हे पोर्हीसना काई नातलगेसना लगीनम्हा पैसा वाजाडेल व्हथीन,  आन आहेर-मिहेर धाडेल व्हई तठेच ती पैसा वाजाडंस नै ते आहेर-मिहेर धाडंस! त्याबी कसा हिशोबशीर धाडस दखा, ज्यासनी एकशे एक वाजाडा व्हतीन त्यासले एकशे आकरा नै ते एकशे एकवीस, नै ते एकशे एक्कावन आसा व्हाढताच पैसा वाजाडंस ती! “तू आसी काबरं करस?” आसं जर मी तिले  ईच्यारं, ते ती माले सपरवट सांगस का, “माले तुम्हना भाऊबनेसनी ईज्जत उतारानी व्हती, म्हनीसनी मी आसा पद्धतखाल आन पद्धतसीर पैसा वाजाडात का पुढना टाईमले त्यासले ईच्यारज करना पडी.

मारे सांगतंस का आम्हनाकडे ईतला परतन जिमिन से, हेर से, मया से, ईतला कापूस निंघना, तितला कांदा व्हयना, पाच टन टरबूज ईकायनात! आस्या मारे मोठमोठ्या फुसक्या बढाया मारतंस, आन तुम्हना ज्या भाऊबनसले दोन दोन तीन तीन लाख लगून पगार से त्या मुसडतान्या ते भूज नालायक सेतंस! तुम्हना त्या छत्रपती संभाजीनगरना चुलत भाऊ मारे चार चाकी गाडीम्हा मिरावत फिरसना? पन, आपली चिंगीना लगीनम्हा त्या मरीजायजोनी कितला रुपया वाजाडात म्हाईत से का तुम्हले? आहो त्या भामटानी निस्ता कोरा कारा एक्कावन रुपयाज वाजाडात एक्कावन!” हाई सांगताना तिन्ही ज्या काही गाया दिन्ह्यात त्या मालेच दिनथ्यात हाई मातर तुमीन ईतर कोनले सांगज्यात नका हां!


मव्हरे तिन्ही सांगं का, “तुम्हना नातागोतासम्हातला काही काही बारबोड्या ते नेमका टाक वाजाडाना वखत एकशे एकज रुपया वाजाडतंस! त्याम्हाबी वर्हना एक रुपया कमीच र्हास बारे!”


ज्यास्नी आम्हना सगासाईसन्हा लगनेसम्हा काहीज नै देयेल व्हई त्येसले ते ती एक शिवराईबी फेकी नई हानंस!


ते भावड्यासहोन आसी गम्मत से आम्हना गृहमंत्रालयनी आन तुम्हनी मावसीनी! मी ते हाऊ फारमुला आख्खा खान्देसम्हातला भावड्यासनी लागू करो आसच समदासले सांगसू! याव्हर तुम्हनं मत काय से? मातर ह्या फारमुलाम्हा मन्हा खिसाले दरसाले कमीत ते कमी धा बारा हाजारनी च्योट बठसंच बठंस, पन त्येले मन्हा नाविलाज से.

आपीन कोन्हाकडथून काही ल्हेतस, तसं ते सवाईखाल परतबी कराले जोयजेल! नई का?आम्हनी होममिनिस्टरना राजकारनम्हा जर मी डोकं घालं ते मन्हा काय हाल व्हतीन हाई तुम्हले नई सांगेलच बरं! माले तुमीन भर जिवानीम्हा दखतात ना, ते नवलच करतात!

मन्हा डोकावर खूप दाट बाले व्हतात तव्हय. आम्हना शेजारनी ती शैला ते मन्हा त्या कायाभोर आन दाट बालेसनी दिवानीच व्हती! तस तसा मी बी मनम्हान मनम्हा मन्हा त्या बालेसवर भू भारी भरु, पन आज मन्हा डोकावर्न्हा बाले पह्यली सिकेल पोरगाबी सहेज मोजी काढी! मन्हा नातू ते वन टू फाईन हंन्ड्रेड लगून मन्हाज टक्कलवरना केसे मोजीसनी पाढा सिकना, औंदा ते तो बाराव्हीम्हा गया!


आते ह्या लगनेसम्हा ज्या वर्हाडी आन वर्हाडनी येतीस त्येसना तो चट्टा-मट्टा, ते नटनं मुरडनं, सजनं सवरनं, तो शरारा गरारा धरीसनी एखांदी हिरोईनलेबी जमाव नई आसा झटका झुटका देत रॕम्पवर लाईव्ह शो करेलना मायेक मस्तपैकी आशा लचकतीस मुरडतीस का बस दखन्हारा निस्ता दखतच र्राई जास! चांगला चांगलासना कलेजा खलासच व्हुई जावाले कर्रस! तरी पन मी याले बाईसनं नैसर्गिक वागनंच म्हनसू. हाई देवबाप्पानी तिसले देयेल नैसर्गिक देनगीज से! तुम्हनापैकी ज्यासना लग्ने व्हई जायेल शेतंस त्येसले पोर्ही दखाले जाताना बिना मेकपन्या पोर्ही कोन्ही तरी दखाड्यात का? नै ना! मंग विषय संपना!


आरे भावड्यासहोन !
ह्या आया-बह्यनी, माय-मावल्या आन पोर्ही-सोरीसनी गोट सांगाले आख्खा दिवस आन आख्खी रातबी पुराव नई, म्हनीसन मी आते मेन टॉपीकवर येस!
परोनदिन एक लगीनम्हा एक कडे आया बाया आन एक कडे मानसे बठेल व्हतात, बठेल कसाले हुबाच व्हतात आसच म्हननं पडी.

लगीन मंगन ते कोन्ताका समाजनं र्हावो तठना मांडोम्हा जथा दखो तथा बायासनाच गलका दखाले आयकाले भेटी तुम्हले! तठेज काही धाकल्ला पोर्हे नाची कुदी र्हायन्थात. नवरदेव नवरीना फॕशनेबल कपडास्ना मायेक नारा नारा रंगन्या रंगी बेरंगी शेरवान्या, कोट, टाय, नेहरु शर्ट, पंजाबी ड्रेस, पॕन्ट शर्ट, काठियावाडी घागरा मिगरा घालीसनी येरायेरनासंगे मस्त्या करी र्हायन्थात. तवसाम्हा मन्ह ध्यान एक चार पाच वरीसना पोरगाकडे गयं.

हाऊ गडी मस्तपैकी खुर्ची वर नाना पाटेकर स्टाईलम्हा बठीसनी नाकना फ्रीजम्हा तयार व्हयेल पिव्व्य, पिव्व्यधम्मक आईसस्क्रीम आपला बोटेसना चमचासवरी काढत जाये आन लगेलग तोंडम्हा घालत जाये. माले पह्यले पह्यले ते खरच नई वाटे पन त्येले तसं करताना मी पाच सवदार देखल्यावर मातर मन्ही पक्की खात्री पटी गई! लगन मंडपना मांघे आखो एक नईनंच खेय चाली र्हायन्था, पाच सव धाकल्ला धाकल्ला पोर्हे तठे ज्या पद्धतखाल सू सू करी र्हायन्थात ती स्टाईलबी दखालाईकच व्हती.

कोन्ही धार त्या लगीन मंडपना पर्दालगून ते कोन्ही येरम येरनी धारनी संगेज वाराम्हाना वाराम्हाज धारासनी टक्कर टक्कर लाई र्हायन्थात.

आनकोन्ही धार कितली उच्ची जास आसी तठे जसी काय पैजच लागेल व्हती जानू! एक बरं झायं का लगीनले आखो बराज येळ बाकी व्हता, त्येन्हामुये ह्या बालवीर पथकना हाऊ हैरत अंगेज कारनामा काई कोन्हा ध्यानम्हाच नई वना! नै ते, त्या  बठ्ठानबठ्ठा आसा कुमचाडाई जातात का नई, यान्हा काही आंदाजच नई करता येस!

काही पोर्हेसनी नवरी नवरदेव येवाना पह्यलेज हातम्हातल्या आक्षदा येरा येरना डोकासवर काई आंगवर फेकनं लाई दिन्थं. तथा एक झनना आंगनम्हा गाय भांदेल व्हती ती गाय जोडथीन एक धाकुलसी पोर बागे बागे जाई र्हायन्थी. ती त्या गायले आसी आचानक हुबी दखीसनी घाबरी गई आन लागनी रडाले. बरं रडनी ते रडनी वर रडता रडता ती गायकडे दखीसन बडबड कराले लागनी. “मी मन्ही मम्मीले सांगसू तुन्ह नाव.

हां तू माले मारु नको दख बर! हां!” तथा एक कडे एक दोन आडीच वरीसना पोरगा खुर्चीवर राजाना मायेक वटम्हा बठीसनी मोबाईलम्हा कार्टून दखाम्हा पूरा गुंगाई जायेल व्हता. त्येन्ह ध्यान निस्त कार्टूनवरज व्हतं. त्या ठिकाने पंखाबिंखा नई व्हता.

भर दुफारनी येळ व्हती. भयान गदारा व्हई र्हायन्ता म्हनीसन त्यान्हा पप्पा सोताले आपला रुमालवरी वारा घाली र्हायन्था.

कार्टून दखता दखता आपलेबी गदारा हुई र्हायना आनि आपला पप्पा मातर माले वारा न घालता सोतालेच वारा घाली र्हायना हाई गोट त्या टिभड्याना ध्यानम्हा येताच तो त्यान्हा पप्पाले बोलना, पप्पा! माले हावा घाल! त्या आवढासा लेकरुना त्या सब्दे आझून मन्हा कानम्हा रुंजी घाली र्हायन्हात! पप्पा! माले वारा घाल! त्यान्हा तो पप्पाबी सोताले काई आपला पो-याले वारा घालाले लागना.

तधय नकयतच मन्हा मनम्हा ईच्यार वना, यालेच म्हनतंस मईतिकर्तव्यता!
माले हावा घाल! घाल माले वारा!
बैजू! लग्नेसम्हा बी काय काय गमतीजमती दखा आयकाले भेटतीस! कव्हढं मोठं तत्वग्यान शिकाले भेटंस नई का?

बरं भावड्यासहोन! ठेवंस आते!
भेटूत पुनाईन आसाच एखांदा लगीनयाव्हम्हा!

तुम्हनाज!

शिवाजीआप्पा साळुंके,
हल्ली मुक्काम- शिरपूर, जि. धुये.