पेन्शन्न टेन्शन ahirani language sentences
आजना टापिकनं नाव (याने की टयटल!)
पेन्शन्न टेन्शन!
नमस्कार भावड्यासहोन आन समद्या लाडक्या बहिनीसहोन
हाऊ मह्यनाम्हा पेन्शनर डे मनाडाना रिवाज से आसं आयकाम्हा से! याम्हा खरं काय आन खोटं काय से, ते देवच जाने!
पन, त्येले मुद्दानं कारन आसं से, का हावू मह्यना सरताच मव्हरेना मह्यना जानेवारीना येस आन मंगन नईन वरीस लागी जास! आम्हले पेन्शनवाला भावड्यासले, बहिनीसले आन त्येसना वारसदार आडानच्योट, उडानटप्पू, आईतखाऊ (माफ करज्यात गड्यासहोन! काही वारसदार पोर्हे, चांगलाबी र्हातंस बर का ‘सब घोडे बारा टके’ नई धरो),
पन ह्या कायदेशीर पेन्शन धारकसले आन वारसदारंसले हावू मह्यना सराना पह्यलेच ते *हयात पत्र* ब्यांकाम्हा जमा करी देनंच पडंस, नै ते पुढना महिनानी पेन्शन भेटाव नई आसा धाक दाईसन निस्ता घाबराई टाकतंस हो आम्हले त्या ब्यांकावाला सायेब लोके! आम्हले आकरा मह्यनासलगून काहीज तरास बिरास नई देतंस, पन लागता नव्हेंबरफाईन त्या हयातपत्राना जो तगादा लाई देतंस का नई ते काही ईच्यारुच नका!
दाहा बारा वरीसपह्यले आम्हले जठीन पेन्शन लागू व्हये त्या गावनी ब्यांकाम्हा नई ते त्या जिल्हाना ट्रेझरी हाफीसम्हा जाईसनी हयातपत्रावर रितसर सई करनी पडे, तोंड दखाडनं पडे, का मीच खरा पेन्सनधारक से म्हनीसन!
पन त्या करोना महामारीना दोन तीन वरीसना पह्यलेसफाईन ती आॕनलाईननी भल्ती मज्यानी सोय व्हुई जायेल से भो आते, म्हनीसन आम्हना पेन्शनवालासनं जराक टेन्शन* कमी व्हई जायेल से!
मातंर, समाजम्हझार, नातेवाईकेसम्हा आन ज्या गावना आम्हीन कायमना रैवासी सेतंस ना त्या गावगवतरना लोके मातर आम्हले जरा येगळीच नजेरखाल दखतंस, त्या आम्हले तसा चक्रायेलनामायेक काब्र दखतस यालेबी आनेक कारने सेतंस! आज मी त्येन्हावरच तुम्हनासंगे बोलनार से!
चला ते आफेन आते *पेन्शन्न टेन्शन* या मुद्दाले सुर्वात करुत!
शंभर टक्कासपैकी ऐंशी नव्वद टक्का लोकेसनं आसं मत से का आम्हले जी पेन्शन भेटंस ना, ती फुकटम्हा भेटंस, आसं समजीसन त्या (बिनडोक) लोके जधय आम्हले बोलतंस का, *’आप्पा! तुम्हनी ते वज्जी मज्या से हो! मस्तपैकी घरम्हा बठल्या बठल्या (हारामनी) पेन्शन खावानं आन बिन्धास जीवन कठानं!
हाऊ जो बठ्ठा गोंधय से ना, त्याले निरानाम काही म्हन्ता काहीज आर्थ नई, आन कसाना आधारबी नई! त्याम्हा काहीज तथ्यबित्थ्य म्हनश्यात ते कवडीनं बी नई से.
त्येन्हासाठे तुम्हले मी मन्हावरथीनच सम्दं पटाडी सांगस! पन, जराखं ध्यान दीसनी आयका हं!
दखा मी ३१ डिसेंबर २००५ रोजे वयमानखाल आठ्ठावन वरीस पूरा व्हताच रिटायर व्हयनू. आख्खी टोटल लाई ते ३९ वरीस सव महिना आन पाच दिवसनी नौकरी करीसनी मी रिटायर झावू. जधय मी रिटायर व्हयनू तधय जर मी मन्ही पेन्शन जर का ईकी नई नस्ती, ते माले दरमह्यनाले दाहा हाजारनावरच पेन्शन भेटनी आस्ती, पन भूतेक फॕमिलीपेन्शन ल्हेनारा लोके आपले खूप ज्यास्ती पेन्शन नको म्हनीसन थोडीतरी पेन्शन ईकतंसच, त्या हिसोबखाल माले ६७००/००रु. (सवहाजार सातसे रु.) पह्यले सुरुम्हा पेन्शन लागू पडनी.
पुढे जसजसी म्हागाई व्हाडनी तसतसी मन्ही पेन्शनबी व्हाडत गई! हाऊ भाग येगळा. आज माले रिटायर व्हईसन बरोब्बर ईस (२०) वरीस पूरा व्हई र्हायनात. आठलगून ते तुम्हले नीटनेम्मन समजीच ग्ये आसी, से ना?
आते पुढना खास म्हनजे मेन मुद्दा कडे ध्यान दिवूत आपेन. तो मुद्दा आसा की, मी सरकारले जी पेन्शन ईकेल से ती जर का मी ब्यांकाम्हा फिक्स डिपाजिट करतू ते आजतारीख लगून ती कितली व्हाडती आसा ईच्यार करा. मी जी पेन्शन सरकारले ईकी ती दहा लाखना आसपास व्हती. आते ब्यांकाना फिक्सडिपॉजिटना हिसोबखाल त्या पैसा कित्ला व्हतात हाऊ हिसोब काढूत.
मी जर २००५ या साले ब्यांकाम्हा दहा लाख फिक्सडिपॉजिट करेल र्हातात ते सात वरीसनंतर म्हन्जी २०१२ सालले त्या ईस लाख (२० लाख रु.) व्हई जातात, बरबर से? आन आखो मव्हरेना सात वरीसम्हा म्हन्जे २०१९ म्हा त्याच वीस लाख रुपयासना बरोबर च्याईस लाख (४० लाख रु.) व्हई जातात से ना? आते त्याच च्याईस लाखना आज २०२४ लगून कमीत ते कमी सत्तर लाख व्हई जातात, शे का नई? पन भावड्यासहोन आतेलगून माले जी पेन्शन भेटेल से, ती पुरीपाठी तीस लाख लगूनबी आझून भिडेल नै से, आन लोकेसले वाटंस का ह्या हारामनी पेन्शन खातंस! सांगा आते हाऊ न्याव कथा ल्ही जावाना? तसं जर दखाले गये ते आम्हनाच पैसा सरकारनी दाबी धरेल सेतंस! हाई ते तुम्हले पटीच जायेल आसी!
भावड्यासहोन !
आते ईत्तर लोकेसनामायेक तुमीनबी *ऊचली जीब आन दीधी टाऊले लाई*, आसं नका करज्यात! बोला नै करश्यातना आसी गल्लत?
आरे! दादासहोन आम्हना पेन्शनधारकसले जर का हाई पेन्शन्ना आसरा नई र्हाता ते आम्हले जगनं मुसकील व्हई जातं!
आम्हनी पेन्शनवर गावलोकेसना ते सोडाच सोडा आम्हना खटलासना लोकेसनाबी डोया र्हातंसच र्हातंस! उधारवाडी देवो ना, ते ज्यासले उसना पासना देवो, ते तो पैसा सालोगनती वापस नै करतंस लोके! आखो वर म्हन्तस कसा? *’काय आप्पा! ईतली पेन्शन आसीसनी कसाले टेन्शन ल्हेतंस तुमीन? जाऊ द्या ना! फुकाऊ द्या तथं! आहो! ज्यासनाफाईन नई भेटनात परत पैसा ते, त्या पुनाईन मांघतीन का तुम्हनाफान? जाऊ द्या! बुडनात ते बुडनात!
भावड्यासहोन!
आरे! माले साधं बीडी काडीनंबी यसंन नै से रे दादा. आख्खी हायात गई पन आसा फालतूना येडाचाया कराले नै आवडनं माले! मन्हा मनम्हा ते कधी कधी आसा ईच्यार येतंस, का जर हाई पेन्शन नई र्हाती, ते मन्हा हाल कुत्रासनामायेकच व्हई जातात! त्या कुत्रासले तरी भाकर तुकडा भेटी जास, पन मन्ह कसं भागतं? कोन पोसतं माले?
आते हाई एकच समाधान से का माले पेन्शन से म्हनीसन टेन्शन नै से!
आते आखीर सेवटना आखो एक महत्वाना मुद्दावर बोलीसनी थांबस!
पेन्शन कोनले देवो आन कोनले नई!
मन्हा ईच्यारपरमाने समदा खासदार आन आमदारेसले आजिबात पेन्शन नई देवाले जोयजेल. लाडकी बहीन ना मायेक लाडका खासदारेसले आन लाडका आमदारेसलेच पेन्शन देवो, ते बी समदी चवकसी करीकुरीसनच देवो!
ज्येसनी आख्खी जींदगी लोकेसन्या मुंड्या मोडीसनी वरकमाई खादी, दुन्याभरना भ्रष्टाचार कया आसी, त्यासले एक शिवराईबी पेन्शन देवाले नको जोयजेल! याव्हर कय मत से तुम्हनं?
भावड्यासहोन थांबस मी आते!
हां! हाऊ लेख तुम्हले आवडना तरी माले कयाडज्यात आन जरका नै आवडना व्हई तरीबी कयाडज्यात, पन या उप्पर आम्हना पेन्शनधारकेसनी टिंगल टवाई नका करज्यात, कारन आम्हले ह्या पेन्शन्ना पाह्यरे पह्यलेच गनंज टेन्शन से! मायन्यान भो कधी तुम्हनी सप्पेत!
तुम्हनाच! ahirani language sentences
शिवाजीआप्पा साळुंके,
च्याईसपरकारना नाये आन त्यासम्हा र्हानारा लोकेसनं गाव च्याईसगाव, जि. पेन्शनधारकेसवर जयन्हारा लोकेसना, जयगाव.