यारे लेकरेस्वन तुम्ही जागर कराले अहिरानी मायनी पालखी घराले

यारे लेकरेस्वन तुम्ही जागर कराले अहिरानी मायनी पालखी घराले

राम राम मंडई, आरस्तोल करस तुमना बठ्ठास्ना, मंडई आते अहिराणी भाषा समाज माध्यमस्वर धूम करी हायनी.यान्हा गयरा हारिक वाटस, नवमाध्यम नी परचार परसार प्रसिद्धीनी प्रत्येक माणूस ले उपलब्धता करी दिन्ही. हायी न्यामी काम झाय, माध्यमक्रांतीमुये धाकला मोठा बठ्ठास्ले दारन्हें उघाडी दिन्हात. गाव खेडाम्हाना माणूस एक सॅकद म्हान जगभर पहुची जास, बस हायीच न्यामी संधी भाषा साहित्य, कला, संस्कृती ना जागर आख्खा जगम्हान करासाठे उपलब्ध व्हयेल थे, याच वहाती गंगाम्हान आपली भाषा में अस्तित्व मजबुत करानं शे.

मराठी भाषापेक्षा अहिराणी भाषा प्राचिन शे. यान्हा दाखला अहिराणी भाषिक अभ्यासक देथस, नाशिक ना पांडव लेणी म्हान सन २००० वरीस पहिले” क्षहरात वस निर्वस करस” आसा अहिर राजा शालिवाहन कायना शिलालेख थे. अहिर पुत्रसना नामोल्लेख पुराणग्रंथस्मा से. म्हनीन अहिराणी नं शब्दधन ने डबोले गयरंच जुने शे, ज्ञानेसरी म्हान गणच अहिरानी शब्दे शेतस, म्हणजे अहिरानी हायी एक प्राचिन भाषा से, हायी आपन मान्य करथस, मंग हायी भाषाले कोकणी, मराठवाडी, वैदर्भीय वा इतर भाषास्नागत मानपान काबर भेटस नही. यानं दुक बठ्ठास्ले वाटस,

शिनेमा, नाटक आनी इतर लोक माध्यम म्हाइन पुढे काबरं येथत नही. दोन कोटी लोकं अहिरानी बोलतस आसां अभ्यासकस्नेना अंदाज शे, मातर २०११ नी जणगननामा सोळा लाकच आकडा दिखी हायनात, यान्हं कारण शासन ना जणगनना फाम ना कालम म्हान भाषा अहिरानी मांडानी सोयच नहीं से. तरीपण तठे आपण भाषा अहिरानी लिखा आसं आवाहन अहिरानी भाषा ना जागर करणार्या साहित्य संस्था करी रायन्यात.

अहिराणी भाषानं लोकसाहित्य गयरं थे. पण ते लिखीत स्वरूपम्हान जास्तीत जास्त येवाले जोएजे. कृष्णा पाटील, डॉ. सयाजी पगार, डॉ. रमेश सूर्यवंशी, डॉ. म.सु, पगारे, डॉ.उषा सावंत यासारखा अहिराणी भाषाना अभ्यासक संशोधक यास्नी करेल शे, पण त्यान्हावी पुढे जाइसन ती डीजीटल माध्यम वर सर्च मा येणं गरज नं थे, आस बोली भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यास्नं म्हणणं शे. अहिराणी भाषाले भाषा ना दर्जा भेटासाठे बी आते लढा उभा कराना इचार अहिरानी साहित्यिक, संस्था कराले लागेल शेत.

मांगलाच वरीसले अहिरानी नं पहिले विश्व अहिरानी साहित्य संमेलन ऑनलाईन घडावानं शिवधनुष्य उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळनी उचलं, गणच देश इदेश म्हान अहिराणी भाषा ना जागर कया, मंडळनी २६, २७ नी २८ डिसेंबर २०२० ले ५ खंड नी २७ देशना अहिरानी भाषाना अहिर एक मजार करात. नी त्यासनी एक जुगमा कवळना ता. मालेगावना कान्हदेशी भूमिपुत्र महाराजा सयाजीराव गायकवाड यास्नी जयंती म्हणजे ११ मार्च हाऊ “जागतिक अहिराणी गौरव दिन” साजरा करान ठरायेल शे,

कान्हदेशी कला, संस्कृती, लोककला, लौककथा, लोकगीते, सन-उत्छाव, इतिहास, पुरान नी माहिती जगदुन्याम्हा पोचाडी, यान्ही दखल युनेस्को ना भाषा इभाग नी लिन्ही हायी अभिमान नी गोट घडनी. आतेलगुन पाच अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन झायात, माय बोली अहिराणीले कधी नहीं इतका चांगला दिन आते येल शेत, पण आते गरज शे ती नेमकी दिशानी, जय अहिरानी जय कान्हदेश..

लिखणार:- रमेश धनगर,
गिरड, ता. भडगाव.

यारे लेकरस्वन तुम्ही जागर कराले अहिरानी मायनी पालखी धराले कान्हानी शे वानी, मन्ही माय अहिरानी ज्ञानानीवी लीखी, ज्ञानेसरी म्हान अहिरानी

1 thought on “यारे लेकरेस्वन तुम्ही जागर कराले अहिरानी मायनी पालखी घराले”

Comments are closed.