त्यांन्हा हात मुडी गये पडना अहिराणी कथा

त्यांन्हा हात मुडी गये पडना अहिराणी कथा

त्यांन्हा हात मुडी गये पडना!
      
नानाभाऊ माळी

खंडू दिनभर आथा तथा गावभर भवडतं ऱ्हाये!काम गर्जे जावू द्या पन बिनकामनां फुकटना सल्ला देत ऱ्हाये!घरनं फद्यानं काम नयी ऱ्हाये,नि दिनभर सवूड भी नयी ऱ्हाये!त्यान्हा कामना चपाटा,उरक दखी गावनां लोके त्याले आक्सी बलायेतं!गरामपंचायतम्हा डोकं लावाले,तलाठी हाफिसम्हा डोकं खावाले,कंटोलम्हा काय उन काय नयी हायी चवकसी कराले आन गफला दखाले जात ऱ्हाये!दूध डेअरी सोसायटीम्हा आडी हुभी नजर टाकालें आक्सी जात ऱ्हाये!

लोकेस्ना कामें व्हयेतं!त्यानं घरनां आराया मारेत,’ निस्ता घर घाल्या धंदा करी ऱ्हायंना हावू!वावर-मयाम्हा जाये पीक पानी डोयालें दिखाये!घरनं करत नयी!दिनभर लोकेस्ना उंम्ब्रटें पुंजत बठस!तथ पीकम्हा गवत माती ऱ्हायनं!हावू सोता भुक्या ठोकलायी आनी आम्हले भी भुक्या मारीं टाकी!’

पुढारपनं चांगलं भी ऱ्हास नि वांग्ल भी ऱ्हास!ज्याले जमस त्यालेचं जमस!लोके डोकावर धरी नाची भागतंस,व्हझ जड व्हयन का दंनंकनं आदयी फेकी देतंस!मव्हरे वाह वाह करतस,मांगेतून गाया टिकाडतसं!आंगे जावानं ऱ्हास पन लामेनन्हा रस्ता दखाडतसं!कोना व्हट आनी कोना दात दखो?कोना तोंडले कुस्टाय थोडी लायेलं ऱ्हासं!खंडू मातर लोकेस्ना कामगर्जे पयी ऱ्हायंता!कुल्लाल्हे पाय लायी पयी ऱ्हायंता!वारा वांदन व्हयी पयी ऱ्हायंता!यांनंत्यांनं काम लयी पयी ऱ्हायंता!धव्वी कुडची घाली पयी ऱ्हायंता!

खंडूवर काही मतलबी चाफल्या डोकेबाज निस्ता गुर्रगुर्र चावू चावू करेत!त्यास्ना पोटवर पाय दि खंडू चाली ऱ्हायंता!दुसरास्न चांगलं काम यास्ना पोटम्हा बयत ऱ्हाये!यास्लें कोनी खावंलालें,चाटालें दिध का खुश ऱ्हायेतं!पन चगयालें हाडूक नयी भेटना का निस्त आंगवर यी गुरगूर करेत!भुकतं ऱ्हायेतं!एखादा टाइमलें पोटरी दखी दात गाडू गाडू करेतं!आशा रंगन्हा मानसे नेम्मन हालकी वडांग दखी पाय ठेवतसं!

गावमां धर्म्या,पंड्या,भट्या या भलता जयकुट्या व्हतात!खंडूलें जानी बूजी तरास देत ऱ्हायेतं!त्या आध्रमीं, बाट्टोड लोकेस्फाइन गुच्चूप पैसा उपाडी कामे करेत!लोके पैसा उकायी करी देत ऱ्हायेतं!खंडू मातर सोतानंघरनी खुडा लायी कोल्ली भाकर खायीस्नी दुसरास्ना कामे करत भवडे!पन त्या पप्पी धोत्रास्लें खंडूनं उज्जी जबून लागे!खंडूनं काम दखी लोके खुश व्हतात!गाव खुश व्हतं!त्या जयकुट्या-बयकुट्या दुःखी व्हतात!त्यास्न खावलानं तोंड बंद व्हयी गयतं!चाफलालें सापडे नही खंडू नावतीन डफडं वाजत बठेत!

गंजज सावा या खोडाय टुक्कारस्नी आंधरं-उजायें दखी,खंडूलें गाठी घोंगडीम्हा गुंढायीस्नी ठोकानां पलान करा व्हता!हार टाईमले मोडा पडी जाये!त्यास्न नशीबच गांडू व्हतं!खंडूनां संगेमांगे कोनंतरी सावलींमायेक हुभचं ऱ्हाये!या हात चोयी घोंगडी दपाडत,दपतं फिरेतं!धर्म्या,पंड्या,भट्यानां पोटम्हा तवंतवं आगीन व्हये!रात अंधारं साथ दे नयी!जीव्वर इस्नी इसड्याफोक गाया देतं, हात चोयेत आपापला घरेघर निंघी जायेतं!

धर्म्या,पंड्या आनी भट्या लोकेस्फायीन बुर्ची लेयेलं पैसास्मा मज्या मारत बठेतं!हरामनां पैसा कायतोंड्यास्ना खिसाम्हा टिके नही!खंडू लोकेस्ना शाकम्हानी डबुकडी व्हती!डबुकडी काढागुंता गंजज सावा डाव टाका पन हातलें काय लागी नयी ऱ्हायंत!बाट्टोडस्फान हाटली,दारू दरफडालें पैसा ऱ्हायेतं तव्हयं मज्या मारी लेयेत!खिसा खाली व्हयना का खंडू नावतीन तोंड ठोकेतं!आते ते या कायमुख्यास्नी उज्जी जीव्वरं यी जायेलं व्हती!

फुकट्यास्लें फुकटम्हा खावंलालें भेटनं का मज्या ऱ्हास!लोकेस्न्या मुंड्या मोडालें भेटनं का हाद्या-कुद्या मारतंस!खंडूनीं मातर बठ्ठास्ना पोटवर पाय देयेलं व्हता!त्या फुकटनं खायी खायी भलता इत्रायी जायेल व्हतात!तिन्ही फुकट्या-बाट्टोडस्नी एक दिन पक्का बेत रची ठेवा!खंडूलें घोंगडीम्हा गुंढायी आंगन्हा हाडकें मोडानं ठरावं!ठोकीस्नी रातनां अंधारम्हा गुच्चूप पयी जावानं आसं ठरनं!झेडीपी सायन्हा मांगलदार हुभा ऱ्हायी या तिन्हीस्नी पक्का बेत रची लिधा!रातले खंडू अंधारं उजाये पार करी घर येत ऱ्हाये!

आक्सी पायेत ठेवाम्हा त्यास्ना पक्क ध्यानमा यी जायेलं व्हतं!हाय हेरना आंगे लाईट खांबवरनां गुलुब उडी जायेल व्हता!तठे कायकुट अंधारं ऱ्हाये!दुरलोंग अंधारं ऱ्हाये!नेम्मन तठेचं खंडूलें सापडायी कुंमंचाडानं ठरनं!

दिन माव्वीस्नी एक कल्लाक व्हयी जायेल व्हता!आंधारं पडी जायेल व्हतं!ठरेलं बेत परमाने धर्म्या आनी पंड्या त्या जागावर जायी बठेल व्हतात!भट्या आजून येल नयी व्हता!त्यान्ही वाट दखत दोन्हीजन कोपराम्हा जायी बठेल व्हतात!एक कल्लाक व्हयी ग्या तरी भट्यानां पत्ता नही व्हता!आखेर दोन्हीमिस्नी पलानिंग पक्क करं!पंड्या त्यानंघरतून घोंगडी लयेल व्हता!धर्म्या शिंगाडे लयेल व्हता!रात चान्न्या चमकी ऱ्हायंत्यात!नवू वाजाना सुमार व्हयना व्हयी!खंडूनां काय तपास नयी व्हता!कोनी येनार जानारस्ना सासूल लागी नयी ऱ्हायंता!

पंड्या आनी धर्म्या कटास्नी गुलुब उडेल खांबनां जोगे जमाया देत हुभा व्हतात!चोरी दपी हुभा व्हतात!घोंगडी आन शिंगाडे तथ कोपराम्हा दपाडी ठेयेल व्हतं!एकदम काय व्हयन कायजून!अंधारंभुसूक व्हयी गयंत!पुरा गांवनीं लाईन चालनी गयती!आंधाराम्हा कोनीचं येरायेरलें दिखी नयी ऱ्हायंत!तितलाम्हा दुरतीन कानवर सासूल लाग्ना व्हता!

हेट्याथून कोनंतरी यी ऱ्हायंतं!दोन्ही एकदम गुच्चूप व्हयी ग्यात!जो यी ऱ्हायंता त्यान्हा चपलास्ना आवाज यी ऱ्हायंता!जोगे जोगे यी ऱ्हायंता तश्या आवाज वाढी ऱ्हायंता!अंधाराम्हा त्यास्नी पक्की खात्री व्हयी गयती,’से नई से हावू खंडूचं यी ऱ्हायंना व्हयी!दोन्हीजन कोपराम्हा गुच्चूप घोंगडी आनी शिंगाडे धरी हुभा व्हतात!पुरी तयारी करी हुभा व्हतात!

अंधाराम्हा समोरथून जो कोनी आंगे आंगे उना,तशा दोन्हीस्नी चपाटा करी त्यांवर घोंगडी टाकी गुंढायी दिन्ही!तॊ घोंगडी झटक्यास करे!धर्म्या आनी पंड्या चलाखीम्हा व्हतात!त्याले पक्की घोंगडी गुंढायीस्नी अंधाराम्हाचं ठोकनं लावं!त्यानं आंगवर शिंगाडे पडी ऱ्हायंतं!गुद्धाभी बठी ऱ्हायंतात!घोंगडीम्हानां जोर जोरम्हा आल्लायी ऱ्हायंता!जीव काढी आराया मारीं ऱ्हायंता,’ओ बापरे!ओ माडी!मारू नका रें भडवास्वन!

ओ गधडीस्नाव्हन!सोडा रें!मी भट्या से ना रें रान्नास्वन!’ भट्या लल्हायी लल्हायी बोंबमारी ऱ्हायंता!भट्यानां आवाज कानवर पडताचं पंड्या आनी धर्म्यानीं त्याले बमंकाडानं थांबाडं!त्यानंआंगवरनी घोंगडी काढी!आंगवर शिंगाडयांना चांगलाचं टकोरा बठेल व्हता!

मार खायी आंग सुजी जायेल व्हतं!भट्यानं नसेनस आंग दुःखी ऱ्हायंत!भट्या जीव काढी बोंबली ऱ्हायंता ,’बयनां येडी मथीस्ना!बाट्टोड! तुम्हले आक्कल हुशारी से का नयी रें?माले मन्हबाप आथा येऊ नयी दि ऱ्हायंता!लाईट जाता खेपे मी आथा पयत सुटनू!बयनां उचकेल गांन्नास्ना खंड्यालें सोडी मन्हा हाडके मोडी टाकात तुम्ही!’

भट्या जख्मी व्हयी जायेल व्हता!अंधाराम्हा रंगत नई दिखी ऱ्हायंतं! आंगवर चांगलाचं शिंगड्याना टकोरा बठेल व्हता!पंड्या,धर्म्या गपमारी चूप हुभा व्हतात!तितलाम्हा लाईट यी लाग्नी!आंधारं पयी गे!उजाये दिखताचं तिन्हीजन चमकायी उठनात!तिन्हीस्ना धंगडा लोकेस्लें माहीती व्हतातं!आज खंडूवर काय गेम करनार सेतं तें?हलका काने लोकेस्लें समजी जायेल व्हतं!

लाईटना उजायाम्हा या तिन्हीस्ना आवते भवते लोके गोया व्हयेलं व्हतात!त्यास्मा खंडू भी व्हता!लोकेस्नी यांस्ना चांगलाचं काया गोरा रंग दखी लिधा!खंडूलें ठोकानां डाव त्यास्नावरचं उल्टी गयता!त्यास्ना हात त्यास्नाचं गये पडना व्हता!लोके दखीस्नी तिन्हीस्लें थर्क भरायी गयतं!चांगलाचं पाटा फिरना व्हता तिन्हीस्नी बठ्ठा लोकेस्लें श्याजूकनांगतं ऱ्हावानी गव्हायी देवावर मोक्या सुटनात!नाक कापेल नकटा,शेपूट घालीस्नी घरेघर तरफडनात!
       

नानाभाऊ माळी
(मु.पो.ता. शिंदखेडा,जि.धुळे)
हल्ली मु.हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
        ७५८८२२९५४६
दिनांक-११ ऑक्टोबर २०२४