उना दिवायीना सण दिवाळी अहिराणी कवीता
दिवायी
**************************
**************************
उना दिवायीना सण
संगे त्यान्हं धनगोत…
गाय गोऱ्हानी बारस
पुंजे दिवासंगे जोत……….1
बारसना माग काढी
पाय तेरसनी ठेवा…
धन पुंजाले बसनी
तील्हे तेजोरीना हेवा……….2
नरक्याना चावदस
कसा र्हाईन तो मांघे…
सांगे फेडा रे इटाय
धवा उटनाम्हा आंगे………..3
लक्सुमिले नारायण
हात जोडीसन पुंजे…
वात लागताच दिवा
खाले आंधाराले बुंजे……….4
उखल्लाना कडेखांदे
दिवा का बं भारी भरे…
फेडे उखल्लाना पांग
वऱ्हे उजाये आथरे……….5
दिवायीना पाडवानी
बळी जमीनम्हा गाडा…
बुट्या बेंगननी त्येंले
भेस बदलाई नाडा……….6
उना पाडवा नजिक
धाक बहीणना पोटे…
बीज भाऊले ओवाये
मोडे कानव्हर बोटे………7
**************************
कवी.. प्रकाश जी पाटील
पिंगळवाडेकर…………………….
====================
सर्व मान्यवरांना दिवाळीच्या
मंगलमय शुभेच्छा….
