ahirani boli bhasha अहिराणी माय चालनी बडोदा-पुणे

अहिराणीमाय चालनी बडोदा-पुणे ahirani boli bhasha

काय बेसुमार उन से उंडायांनं!बठ्ठा झाडेस्वर बठेल चिडा-चुडा ते एकदम गुमसुम व्हयेलं दिखी ऱ्हायनात!झाडन्ह एक भी पांट हाली नई ऱ्हायनं!उनन्ही गर्मी चांगलीचं झामलायी ऱ्हायनी!वावरे चौम्हेर नागरेलं दिखी ऱ्हायनातं!ढेकायां


उनघायी आंघोय करी ऱ्हायनात!काल्दीन गुडीपाडा व्हता!दारेदार टोकरेस्वर हुभी गुडी दिखी ऱ्हायंती!गोड धोडनां न्यामिना वास नाक तोंडलें पुऱ्या दखाडी ऱ्हायंता!रसी भात दखाडी ऱ्हायंता!कुल्लाया दखाडी ऱ्हायंता!खापर-चुल्हा डोयालें दिखी ऱ्हायंतात!गुढीवर नव्व कापड डोयालें दिखी ऱ्हायंतं!शालिवाहन राजांनी काल गणनां सुरु कयी तो दिन व्हता!साडेतीन मुहर्ताम्हानं एक मुहूर्त गुडीपाडवालें म्हतसं!अश्या शुभ दिनल्हे आनंद कितला मोठा व्हता, काय सांगू तुम्हलें!

अहिराणी गोष्ट
अहिराणी गोष्ट



परोनंदिन गुडीपाडानं दिन अहिराणी मायन्हा एक जागल्या,पालखीना भोई,आक्सी आंगवर सेवा ल्हेलं से, अश्या सेवकरी आपला घर उंथात!मी भलता भागबल्ली समजी ऱ्हायंतू!मारोतीनी राजा श्रीराम यास्नी सेवा करागुंता आंगलें शेंदूर फासी ल्हेलं व्हत!सेवा करी ऱ्हायंतात!काही कर्मठ साधू आंगल्हे भस्म लायी फिरतंस!

तर ह्या अहिराणी मायना भोईनीं पायलें भवरा भांदी ल्हेलं से!नाव प्रख्यात से!ज्या पीएच.डी, डी लिट.सारख्या शिक्षण साठानीं आखरी पायरी सेतं!इतला दांडगा शिकेल-सवरेल प्रोफेसर आपला झोपडीलें पाय लावालें उंथात!मन्ही कुडन्ही झोपडी दुन्याथीन शिरीमंत व्हयी गयी थी!काल्दीन आदरणीय डॉ.बापूराव देसाई सर आपला घर येल व्हतात!

आदरणीय डॉक्टर बापूसाहेब देसाई सरस्नी जिंदगी अहिराणी मायंगुंता पक्की भांदी ल्हेलं से!या जागलकस्नी आते मोठ्ठ काम हातम्हा ल्हेलं से!अहिराणी मायगुंता ज्याज्या पालखीना भोईस्नी योगदान देयेल से त्या बठ्ठास्लें एक पंधाम्हा भांदी एक मोठ्ठ काम हातम्हा ल्हेलं से!… आदरणीय बापूसाहेब यास्नी…


अहिराणी लोकसहित्याचा इतिहास व साहित्य विविध प्रकार!’  या नावन्हा ग्रंथ लिखी ऱ्हायनात!हाऊ ग्रंथ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आनी महाराजा सयाजीराव गायकवाड वडोदरा विद्यापीठनां एम ए  भाग-२ अभ्यासक्रमलें लागी ऱ्हायना!

अहिराणी मायन्हा आगाजा व्हयी

ऱ्हायना!जागलक्या जागी-लिखी सेवा करी ऱ्हायनात!ज्यास्नी ज्यास्नी अहिराणीम्हा लिखेलं-पूसेल से!त्या बठ्ठा जागलकरीस्नी आपलं साहित्य, साहित्यकृती,अहिराणी सेवा,योगदान जे काही व्हयी ते बठ्ठ आदरणीय डॉक्टर बापूसाहेब देसाई सरस्लें धाडी दिज्यात!

त्या ग्रंथम्हा त्यात्या लेखक, कवी, आनी योगदान देनारास्न नाव येनार से!आपली अहिराणी भाषा आखो च्यार दुन्याम्हा उठी दिखी!दोन कोटीथुन मुकला भाऊंभन सेतस!कायेजनां बोल कायेजथुन वर येतंस!आपले बठ्ठा भाऊभनस्लें अभिमान से!

आपुन वावर, घर, खये, करतं करतं नागरटीम्हा उन्हनां चटका आनी घाम गायेत ऱ्हानूतं!हेरनं पानी लांगी, सारंगी करतं करतं तन-मन निय्येगार करत ऱ्हायनूत!गावना रस्ता वावरन्हा बांधलें लागी मव्हरे जात ऱ्हायना!तठेंग खेडा-पाडा करतं सहेरलें जात ऱ्हायना!आपलं नव जग दखत जिंदगीनां आर्थ धुंडतं ऱ्हायनूतं!या धुंडेलं आनभवनां साफटा मुकला संगयेतं ऱ्हायना!कोना मनम्हा ऱ्हायनं!कोना व्हटवर उन!कोनी लिखी काढ!

कोनी गायनं कर!कोनी पवाडा करा!कोनी तमासा करा!कोनी आखाजी-कानबाईनां गाना लिखातं!कोनी बठ्ठा जोजार लिखा!असा लिखेल जोजारन्ह साहित्य तयार व्हयन!त्यान्ह मोजमाप व्हवा गुंता!साहित्यिक घटनाम्हा नोंद व्हवागुंता आपलं लिखेल, गायेलं, संग्रो करेल साहित्य आदरणीय डॉ बापूसाहेब देसाई सरसले धाडी द्या!अहिराणी साहित्यानां इतिहासम्हा आपलं एक नाव यी जायी!

आपली भाषा आपला प्राण से!आपलं कायेज से!आपुन जित्ता सेत त्या अहिराणी मायनां सुवासवर!आपला जिंदगीलें न्याव देवागुंता,जलमदेती मायन्हा पसारा जग दुन्यापावूत
पहूचाडावूत!
डॉ.देसाई सरस्ना मो.नं- ९३७३१६४६६८ से

नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा, जि.धूळे)
ह.मु.हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-११ एप्रिल २०२४