ahirani bhasha words खुशाली न पत्र
खुशाली न पत्र.
नाव ले दोन ओळीसन पत्र पण त्या आपुलकी ना शांतता,कष्टमय पण सुखमय काळ मा” पत्र”खुप महत्वान व्हत.
माणूस माणूस ले दुरथीन बी जोडणार व्हत.त्या काळमा ख्याली खुशाली विचारान,दुख सुख विचारान दुरदेशी राहणार आपला मानूसना काळजी लेनार मनले धिवसा देणार साधन व्हत “पत्र”.
सासुरवाशीन पोर ले, बाहेर गाव शिकणारा पोरेसले, नोकरीसाठी बाहेर गावले जायेल पोरगा ना मायबाप सले कितला आधार र्हाये पत्र ना.
पोस्टमन उना का बठ्या बाया इचारेत पोस्ट मन दादा मन पत्र उन का.
पत्र देणारा पोस्ट मन दादा बठाससाठे जिव्हाळा ना आपुलकी ना माणूस र्हाये.
खुशालीन पत्रामा
पाऊस पाणी कसा शे…
आम्हीनी कड चांगला शे…
अस इचारेल र्हाये.घरम्हातला बठा वडीलधारी मंडळीसले मानपान ना नमस्कार व धाकला मंडळी सले आशिर्वाद या पत्र मा देयेल र्हायेत.
भाऊ न बहीण ले खुशाली न पत्र त्यामा माय बाप न तब्येत नी खुशाली सांगेत.
सर्वात जिव्हाळा निर्माण पत्र फौज मा बाँर्डरवर ड्युटी करणार जीवान न र्हाये.त्याना घरना लोकेसले या जिव्हाळान पत्र ना वज्जी वाट दखनी पडे.
शातंतामय सुखमय असणारा जुना काळना” पत्र “हाई मोठ माणसे जोडाण व सुख दुःख मा माणूस सले माणूस जोडान माध्यम व्हत .
एखादा लांब गावना माणूस ले मरण नी खबर “तार”धाडीसन पोहचाडणी पडे.तार बी आते “फोन ट्रंकाँल ” येवानंतर बंद व्हयी गयी.
आते हाई खुशाली न दोन ओळन लाबंना माणसेसले गोडीथून बांधी ठेवान पोस्टान पत्र हाई फोन , मोबाईल ,कँम्प्युटर ना युग मा उतरती कळा ले लागन.या आधुनिक युग मा धीरे धीरे हाई “खुशाली न पत्र “लुप्त व्हयी र्हायन यानी मोठी खंत वाटस.
आते आपण फक्त एखादी आपली तक्रार मंत्री, शासकीय अधिकारी, पंतप्रधान, राष्ट्रपती यासले देवासाठे काही थोडा फार लोके या पोस्टाना पत्र ना उपयोग करतस.
पोस्टमन दादा लयणार हाई धाकला पोरेसन प्रेमथून म्हणणार “मामान पत्र “म्हणा,कि “खुशाली ल पत्र “म्हणा जुन्या काळन्या सुखद आठवणी सन पत्र खरच आपला जीवनम्हाईन हद्दपार व्हयी गय .यानी खरच मनले रूखरूख शे.
लिखणार सौ गितांजली कोळी .खान्देशनी सामाजिक कार्यकर्ती धुळे.2/6/2019
