काने लागी,त्यान्ह घर फुटी Ahirani

काने लागी,त्यान्ह घर फुटी Ahirani

काने लागी,त्यान्ह घर फुटी
नानाभाऊ माळी Ahirani

            तुयसाबाई यायींनंन्हा गावलें जायेलं व्हती!खरं सांगो तें धाकली आंडेर पुष्पान्हघर जायेल व्हती!पोरनां लगीनलें पाचऐक वरीस व्हयी ग्यातं व्हतीन!नात नातरे घर आंगनम्हा खेवालें लागीं ग्यात तरी भी तुयसाबाईलें आसं पुष्पांघर एखादी रात भी ऱ्हावांलें भेटनं नयी व्हतं!यां वखतलें याहीनन्हाचं फोन येल व्हता,
              ”तुयसाबाई तुम्ही सवूड काढी यीं जावा माय!घर-वावर आक्सी कुत्रानंमांयेक लागेल ऱ्हास तुमन्हा मांगे!..’मयामां कोथमेर हुभी से,नि मेथी निंघी ऱ्हायनी!गाय जनेल से!वासरूलें कोन पाजी?’आसं लकडीलें मकडी कारन सांगू नका आते!तुम्हना मांगे लागेल गोमडांलें काही दिन मांगे सोडीस्नी या!आयरी आयरी कितला दिन आयरी ग्यात! ‘आते कांदा हुभा शेत!पानी कोन भरी?’आसं धुटकनं काढू नका तुयसाबाई!एकदोन दिनम्हा रातनीं लक्सझंरीमां बसा!रातले जपीस्नी घोरत यां!सक्कायं पाह्यरामां पुनालें यीं भिडश्यात!आनी येता येता लोंचं टाकेलं व्हयी तें बरणीम्हा भरी लयीज्यात!तुमन्हा हातनां लोंचालें आल्लग चव ऱ्हास माय!एकदम फुट्र फुट्र लागस!” खेडागावम्हा मोके चोके ऱ्हावांनी आदत ऱ्हास!खेडानं जगनं,न्यारचं ऱ्हास!जिवले आंननं देत ऱ्हास!ज्यानं त्यान्हा दारम्हा आवर-सावर करी का गफ गफाडा मारत बठो!

     सहेरन्ह बठ्ठ चित्तर इचित्र ऱ्हास!आवल-चावल ऱ्हास!जो तो ज्यानं त्यान्हा दुन्याम्हा ऱ्हास!बठ्ठा आपलीच गुर्मीम्हा ऱ्हातंस!रगेल फुगेल आपलाचं नांदम्हा ऱ्हातंस!

            पुनान्ही याहीनन्हा कायेजतून आग्रोह व्हता!चार आठ दिन ऱ्हावालें बलायेल व्हतं!आंडेर पुष्पान्ह सासर तसं शिंनंखडानं पन सासरा पुनालेंचं नवकरी व्हतातं!तठेचं चंदननगरलें मोठं घर-दार भांदी ऱ्हावालें व्हतात!

तुयसाबाई पूनालें गयी!चांगली आठ दिन ऱ्हायनी!याहीन्हा घरभारनां बठ्ठा रंग ढंग डोयाघायी दखातं!आलनं-खारं दखं!वागनं -बोलनं दखं!आते तुयसाबाई जीव गुदमरालें लाग्ना व्हता!गावलें नींघू-नींघू,पवू-पवू करीं ऱ्हायंती!पायम्हा चटकन चपला घालो नीं गावनी एसटी सापडावों आसं व्हयी गयतं!गावलें कव्हयं भिडसू आसं व्हयी गयतं!तथा पुष्पानं बापना एक दोन फोन भी उंथातं!आथी याहीनं नींघू नयी दि ऱ्हायंती!नातं-गोतं भलतं नाजूक ऱ्हास!सांगता-बोलता येत नही!मांगे बिनकामनं आंडेरंलें,पुष्पालें तरास नको, आसं वाटी ऱ्हायंत!गप मारी चूप ऱ्हावानं व्हतं!आते खरंच तुयीसाबाईलें ऱ्हावांना कटाया येल व्हता!जीव किद्रेलंनां मायेक व्हयी गयतां!गावलें मोके ऱ्हावांनीं सवय!पुनालें याही-बाहीननां घर, मान-मर्यादाम्हा ऱ्हानं पडस!खरचं आते मूक्ल गू्यंचट व्हयी गयतं!जल्दी घरना बाहेर पाय काढो आशी व्हयी गयतं!

एक दिन बठ्ठ घरभार दूर तथा भोसरीले,साखरपुडालें जायेल व्हतं!पुष्पा आन तुयसाबाई,दोन्ही माय-आंडरी घर व्हत्यात!तुयीसाबाईनीं आठ दिनन्हा चांगलाचं आनभव लेयेलं व्हता!बठ्ठास्ना रंग-ढंग,सभाव माहीती व्हयनां व्हता!इतला दिन फाइन पुष्पांजोगे मोके-चोके आसं बोलनं व्हयन नयी व्हतं!पोर तिनं तिन्हा कामम्हा ऱ्हाये!आखों आक्सी मव्हरे याहीनंनीं मांजेरनीं नजेर ऱ्हाये!घरनीं मंडई भोसरीलें नींघनातं!त्यास्नी दारना बाहेर पाय टाकताचं!तुयसाबाईनीं डोकावर ठेयेलं व्हझं खाली ठेवं!हायसं वाटनं!चक्कीनां पट्टा कसा गरगर फिरस तशी तुयसाबाईनं तोंड सुटनं नां!आयकनारी एखली पुष्पाचं व्हती!मायनीं आंडेरंनां जोगे भात्यानीं गाठ सोडी!भांदेल तोंड मोके-चोके सोडी दिन्ह,

“पुष्पे!काय कुच्चर घर से वं तुन्ह?बाहेर ग्यात तें साधं इचारं भी नई माले!संगे इशात का काय?रीत
लह्यनंचं नई से बरं!मी कोठे मांगे लागी ऱ्हायंतू? या आठ दिनम्हा चांगलीचं परचुती वूनी बरं माले!”
पुष्पा बोलनी,”काय वं माडी! काय व्हयन इतलं?”
तुयसाबाई,”पुष्पे,तुनंसासू निस्ती गोड बोली नीं ढोपर सोली वं माय!चांगली खनखन कुदायी से!कितली कितली मखडसं दख नां!ऱ्हास कसी?जशी काय पुनाम्हाच पयदा व्हयेलं से!झिपाट्या मोक्या सोडी ठायकीचं मखडंस!ठगाडी से वं माय!बीन लगामन्ही घोडी से तूनंसासू!सासरा इतला कसा सज्जन आनी आलनं वरनांगत सेतंस कोन जानें?त्या या थयथय घोडीलें व्हडी धरतंस नई का? आवरतंस नई?” मायन बोलनं आयकी पुष्पा बोलनी, “माडी,तुले काय लेन देनं से पन?काय चाव्वी ऱ्हायनी तू?मन्ह घरनांस्लें नाचू दे,नइतेंगं कुदु दे!खेडं आनी सहेरम्हा आंतर ऱ्हास माडी!मी कसी व्हतु गावलें?लंगा पोलकाम्हाचं व्हतु नां?तुम्ही बाहेर धाडं-शिकाडं!आते मी धाकल्पनीं तिचं पुष्पा से का सांग बरं?”

दिनभर माय-आंडेरं बोली ऱ्हायंत्यात! तुयसाबाई जराखी नरमनी व्हती!पन पुष्पानीं सासुले नाया पाडानं काय सोडं नयी,’पुष्पे तू आते मालेंचं शिकाडं!मानोस्नी नमीगमी ऱ्हावों!समायी-सुमायी ऱ्हावों!तूनं सासू आपलीचं ढोलगी वाजत ऱ्हास!भलती चत्री से बरं!नीट ऱ्हाय वं माय!मी तुन्ही सग्गी माय से!अलकर-बलंकर सांगावू नही!कव्हयं तिन्हा शिंगडावर उचली घरबाहेर फेकी दि सांगता येतं नई!तू भी चत्री व्हय!”
पुष्पा जोरमा खिजायीपन्नी,’माडी!माले काही भी शिकाडू नको!मी काय दुध पेती से का!आनी कोन येनार से वाटा पाडालें?कितला आंडोर सेतंस त्यास्लें?एकचं से नां?मंग तू आशी उल्ट सुलट काबरं शिकाडी ऱ्हायनी? तुयीसाबाई पडेल सबद उचलाले लाग्नी,’मी काय शिकाडी ऱ्हायनू? दुन्याम्हा जे दिखी ऱ्हायन तें बोलनू!”
तुयसाबाईलें मझारमाच रोखीस्नी पुष्पा बोलनी,’माडी तू माले जलंम दिन्हा!शिकाडी सवारी लगीन लायी दिन्ह!मी दुसरा गोतम्हा चालनी गवू!तू जशा सवसार करा,तशाच सवसार मी करी दखाडंसु!माय बाप आनी सासू सासरानं नाव कमायी दखाडंसु!या मानसे जीवले जीव देनारा सेतंस!मी भी त्यास्नागुंता जीव देवालें मांगे वसरावू नयी!मन्हा कानम्हा कोनं वारं जावावू नयी!तू भी माले शिकाडू नको!”
तितलाम्हा दार ठोकानां आवाज उना!दरवाजा हुघाडा!पुष्पान्हा नवरा,सासू -सासरा दारम्हा हुभा व्हतात!दिन माव्वी जायेल व्हता!घरमा येताच पुष्पानं सासुनी आनेल मोठी पलास्टिक पिसोडीम्हायीन साडी काढी!तुयसाबाईनां हात देत बोलनी,” तुयसाबाई साडी दखा!आवडनी नयी व्हनारं तें बदली आंनंसूत!” साडी हुघाडी दखताचं तुयसाबाईनां गालनं कमय इतलं मोठ्ठ फुलन का इचारता सोय नयी!दुसरा दिन चांगल्या खापरन्ह्या पुऱ्या, खीर, रसी, भात, कुल्लाया, भज्या कऱ्यात!रसिम्हा वरतीन निंबू पियी वरपी वरपी रसी पिदी!रातनी लक्सझरी गाडीम्हा बसाडालें पुष्पानीं सासू सोता गयी!रातनी लक्सझरी सुरू व्हयनी तशी तुयीसाबाई जपम्हा आशी काय घोरत ऱ्हायनी!आंगे पांगेनां सीटवरन्हास्नी कानम्हा हात रूमालन्हा बोया घाला व्हयी!
     
नानाभाऊ माळी Ahirani
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)
हल्ली मुक्काम-हडपसर,पुणे

दिनांक-०१ऑक्टोबर २०२४