मन्ही माय दिवाई मी आनि आठवनी,तुम्हले बलीप्रदा पाडवा न्या आभायभर सुभेच्छा
आज मन्ही मायनी गयरी याद येई रहायनी,अर्थात जेस्नीजेस्नी माय सरगले जाई बठेल शे त्या सगळासले मायनी याद येसच.
ती गई तैस्नी तशी तशी दिवाईच नही दिखनी.
दिवाईना आट दिन पयले,ती घर,वावर,दुसरानं वावर[मजूरीले जावानं]समाईसीन,दिवाईनी साफसफाई आसं सूरुज रहाये,इतलुसाबी खंड नयी पडे ना तिल्हे कटाया ये.
मन्हा कडे शेन गोया करानं काम रहाये.घरना ढोरेस्न नही पूरनं ते आथाईन तथाईन गोया करी लयनं पडे.सकायले बोंबाबोंब व्हये,जव्हय येन्ह शेन तठे,
आपल घरन शेन कोठे?
आशी मजा ये.
गायगोर्हानी बारसना पयले.
माटी,धाबा,टपरीनं घर,सारी,पोतारी,उडतीनी नेम्मन रची,भांडाकुंडा कल्हईवालासपासून कल्हई करी,धुईधाई यकदम सैनिकी पलटननामाईक नेम्मन जेस्नातेस्ना जागावर रचाई जायेत.
घर यकम सोनासारखं व्हयी जाये.
सकायले तिन वाजता उठे मन्ही माय म्हंजे ब्राम्हो मुहुर्तवर.
कोन्हलेच हात हलाईसनआनि गाया दिसन,आदळआपट करीसन, नही उठाळे.ती आनि तिन्ह काम भलं.आम्हना ताथ्या तेस्नाबी टाईमशीर म्हैस,गाय,बैलेस्ना गोठा साफ कराना,दुध काढानं काम तेस्नबी येवस्थित चालू रहाये.त्याबी आम्हले काई खाऊ खाऊ न करता बरोब्बर ,मौनधरी घोदा मारेत ,आम्ही जानता व्हयी पर्यंत ठिक होतं पन जानता व्हवा नंतर बिनसांगान मायबापले मदत करवो अशी तेस्ना मौनम्हाईन माल्हेतरी तेस्नी आमना[इच्छा]दिसे.
मी झावर पंघरी आख्खी जपान सोंग करु पन सेवटले मातर तेस्ना कस्ट दखी निदान मन्हातरी छातीम्हा कय ये.
मंगन बागेसकसी उठू,
मायना मांघे मांघे जाऊ,माडी काय करु सांग?
माय थोडाटाईम ढूकी बी नही देखे.माल्हे समजी जाये हाऊ नयी बोलता सुमड्या कोप[राग]शे मायना.
आख्खी छातीवर दगड ठीसन पुढे पुढे करु,शेवट माय ती मायच रहास.आयसत मायसत न नाटक करी मन्ही किव ये तिल्हे.बागेसकशी जोढे ले.
पाठवर,डोकावर,छातीवर हात फिराये.आम्हाये कोम्हाये.
एकच मगन तू,मन्ह मन जानसं.
कायी करु नको,आंगतोंड धोयं,
देवपूंजा कर,इरेस्ले पानी टाकी ये.[वीर देव..भावकीचं सामायिक मंदिर]
तुम्हले पटो ना पटो’माल्हे समजाले लागनं तसा हाऊ क्रम इकडे मंबईले येवालोंग कधीच नयी टयना.
मंग माय म्हने,आपले घर ,वटा,सारालेषआनि आंगनम्हा सडा टाकाले शेन कमी पडी ,लयी येसका?
गुरुजीस्नी आनि मायनी शेन आनान काम सांगरे सांग ,
की माल्हे वाटे मन्हा सारखा भागबल्ली कोन्हीच नही.
उड्यामारतच जाऊ.
टोपलंभर शेन लई येऊ.
सांगासारखं गंजस शे.
खरं सांगू तेम्हा गनज सोनं दपेल शे.
पन एकच सांगस,
खरी दिवाई आम्हना धाकलपनलेच व्हथी.
बिनसिकेल बायामानसे.
दिवाईना खरा आर्थ माहित नसतांना बी.
बरोब्बर सऊ दिन पायेत.
थयीना पानिनामाईक निरमय मन,स्वच्छ वातावरन,पित्तयना देवनागत टकाटक करेल घर.
आंगनम्हा सडा.
वाकडीतिकडी का व्हयेना रांगोई.
तुयसी वृंदावन.
गायगोर्हाना बारसले उपास.
वावरम्हा आडचाचले हाथवर पेरेल बाजरी,जवारी,मुंग,उडीदनाच सयपाक करे माय.
तोच खाऊत आम्ही पहाडाम्हाईन सुटेलनामाईक मिटक्या मारी.
गायना शिंगडास्ले धावना रंग.
गायवासरुना आंगवर धावना पंजा उमटेत.पूंजा व्हये.
धनतेरसले,वान्याबाम्हनस्ना धन आनि कुबेरनी पूंजा व्हये.
वान्या लोकं पानसुपारीले बलायेत.
बामन लोकेस्न कायीच नही कये.
पन भाहीर भेटनातका हासीखुषीम्हा बोलेत.
आम्हले आकाश ठेंगनं व्हये.
कारन बाम्हन म्हंजे भूदेव.पायलागो महाराज म्हनाये.भर रस्तावर साष्ट्टांग दंडवत घालूत.कायीच नयी वाटे.हायी आत्ते न्हींघन जात-पात-धरमन खुयी[खूळ].तव्हयसना धरम म्हंजे समजीनउमजीन तितला कुलाचार पायनं .आनि बाकीना ठिकाने बामन महाराजले बलावान.ना आस ना पेस ना संशय ना काय मन.
एखाद बामन नं पोरगं मन्हावरनं पिरीममुये भ्यातभ्यात घर ये.
सांगजो नको कोन्हले मगन बजाडीबजाडी सांगे.कव्हयमव्हय आंडानी भूर्जी चोरीदपी खाये मन्ही मायनी करेल.बाकीना टाईमले माय दिन ते खायी ले.
इत्ल आवडे,आखी मांगे.
भलता मस्त दिन व्हथात त्या.
नरकचतुर्दशीले,कानम्हा कोम्हट तेल.तेच आंगले चोपडाये.
हारभरान पिठ लाईसन फेनावर घसडीसन माय आम्हनं चुईचाई आंग धूई दे.आम्हना ताथ्यानीबी पाठ घसडी दे.गंमतम्हा म्हने बी,”चांगल आंग धुयी देस,मंग माल्हे गाया देवाले तुम्हले जोर येईन.आसंबी चाले बरं लूटूपूटून दोन्हीसम्हान.”मी म्हनू,कावं माडी आसं काय बोलस तू ताथ्याले?तू गुच्चूप बठरे,कये ना वये धुय्ये जाये.मी मंगन चिडीचूप व्हयी जावू. अशी मन्ही माय शंभर हत्तीस्न बय यी ,आस करी टाके ती आम्हले.ती ते काय,बाराबी काय,तेराबी मयना सदाफुलीसारखीच रहाये.
लक्ष्मी -पूजन आत्ते सूरु व्हयनं बयी राजाना घरम्हा.
तिसचाईस वरीसपासून
तो कुनबीना भाकड दिन रहाये.
पन वरन,भात,पुयी नही थे गोड शिय्या खावाले भेटेत.
खरा सन पाडवाले रहाये.
म्हंजे कार्तीक शुध्द प्रतिपदा.म्हंजे दिवाई नंतरना नयीन सालना पयला दिन.म्हंजेच बयी राजाले जिमिनम्हा गाडाना दिन.तो आजलोंग सर्वासम्हा उच्चा आनि संस्कारी आनि दुन्याना पोशिंदा आसिसन तो तव्हयपासून गाडायेलज से.निदान आज तरी सर्वास्नी प्रतिज्ञा करा तेल्हे वर काढानी.
“ईडा-पिडा जावो,बळीनं राज्य येवो”
ठयरावश्यात ते नक्की येईन
बलीप्रतिपदाले,आंगनम्हा शेनना बळीराजा निजाळेल.
अवती भवती रांगोयी.
हायदकुकू लाये मन्ही माय.
तांदुई आरपन करेत.
ईडा जावो पिडा जावो,
बळी राजान राज्य येवो,
बोटं मोडीसन कुईक काढे समदास्नी.
नंतर माय आम्हना बठास्ना कान फुकी दे.
माल्हे वाटसं ,कानना किडा झाडी दे.
भाऊबीज व्हईनी ते व्हयनी.
नहीते वरनभात ठयरेलच रहाये.
कित्लबी झाये तरी,
मन्हा मायनं,बापनं,दिवाईन्हा दिनम्हाबी वावरम्हा जावानं नही सुटे.
लोकलाजेस्तो निदान आर्धादिन वावरम्हा चक्कर टाकना पडे.
आसी सव दिननी दिवाई सरे.
वरीसभर कान,मन,डोकाम्हा झीरे.
बागेजकशी खोपडी यकादस ये.देव जागे करी तीभी चालनी जाये.
नाकदिवाईनी वाट दखाये.
कारन बाजरी दिवा,गुईम्हा शिजाळेल.दही नही थे ताकम्हा घालीसन खावाले भेटेत.
धाक
लपनना यादम्हा गडेल
मझिसु प्राचार्य मगन सुर्यवंशी-डोंबिवली.
दि.१४/११/२०२३..बलीप्रतिपदा..मंगयवार.
पातोंडा..अमळनेर..ह.मु.डोंबिवली प.
दिवाई आनि मन्ही माय