पहिरेल उगत ऱ्हास Khandeshi Ahirani language
पहिरेल उगत ऱ्हास
… नानाभाऊ माळी
दुपारलें जेवनांपहिलें (खावंलांनं पहिले) मी खाटलावर आंग टाकी पडेल व्हतु!बाहेर हुनी वार्गी सुटेल व्हती!गली आंगनंम्हा डोकंभुंजे उन पडेल व्हतं!दारसे निमनं निय्येगार झाड से!हुनी वार्गी झाडनां निय्या पांदडास्मझार घुसी जराखी थंडी व्हयीस्नी घरनी वसरीम्हा वरनावर भवडी ऱ्हायंती!मी वसरीम्हा खाटलं व्हडी टाकेल व्हतं!बाहेर उनन्हा चटका व्हता!गली म्हायीन हुनी वार्गी झाडलें फेऱ्या मारी नीट्टचं वसरीम्हा घुसी ऱ्हायंती!तठेंग हुगडा दारनम्हा घुसी ऱ्हायंती!दारनलें धडकीस्नी घरमाचं वरनावर तंनंगी, हुलकी ऱ्हायंती!हुपारालें नेम्मन दूर तथ तंगाडी ऱ्हायंती!
घरम्हा हुपारा-गदारा व्हयीस्नी भी जराख बरं वाटी ऱ्हायंत!तितलाम्हा घरम्हायीन बाईनां आवाज कानवर पडना, “उठाss वं!गरमा गरम भाकर व्हयेल से!चला जेवाले!…काव्हंss उठतंसं नयी का?काय सांगो माय या मानोस्लें!खाटलावरनी गादी खुंदी खुंदी निस्ती चिप्पट करी ठेयेलं से!खाटलांन्या दोऱ्या व्हडायी व्हडायी निस्ती झोयी करी ठेयेलं से!न्याहरी करीस्नी आलीगलीम्हा भवडी येवो!च्यार लोकेस्न आयको, आयकाडो!तठेंग यीस्नी खाटलं धरी गादी खुंदत बठो!आते याचं कामे सेतस तुम्हले!”
बाईनीं टीरिटीरी सुरू व्हयनी का थांबानं नाव लेत नयी!मी खटलावरतीन जमाया जुम्हाया देत, आंग झटकी उठनू!मोरीम्हा खाकर खुकर करी तोंड धोये!नल्लाम्हा बोटे घालीस्नी पानींन्या गुयीन्या मोरीम्हा फेक्यात!!आंगवरनीं कुडचील्हेचं वल्ला हात पुसी लिदात!बाईंनी मनंमव्हरे थाटी सरकायी ठी!जेवाले आम्ही दोनचं जन बठेल व्हतुत!थाटीम्हा जुवारीनां भुंजेलं पापड, मांगला वरीस्न चांगलं मुरायेलं लोंचं, काया बट्टानीं शेवगानीं शाक, बाजरीनीं भाकरी!कांदानीं मोथ्री फोडी ठेयेलं व्हती!तरीभी मन्हा नखरचखर जिवडालें जेवन करांनी इच्छा व्हयी नही ऱ्हायंतीं!थाटीमां शेवगानां काया बट्टानीं शाक वतेंल व्हतीं!फयफय पानिम्हा बाजरीनीं भाकर मोडीस्नी थाटी मनंमव्हरे सरकायेलं व्हतीं!मी पाची बोटेस्वरी काला चिवडी ऱ्हायंतू!🌹
मन्हा गयाम्हा आडकेल सबद तोंडे-व्हटे बाहेर उनात,” काय करो,तोंडले चवचं नयी से!तूं गंजज चांगलं करस पन जीभलें चव नई से नां!” बाई उज्जी उफडायी उठनी
, “तुम्हनी जीभ आते आवरी धरा जराखी!तरना ताठाम्हा तुम्हना जीभनी गंजज नखरा करेल सेतंस!कितीलं भी चांगलं जबून करो मरो,तुम्हन्या चवडाया वाढतचं ऱ्हातीस!नव्वी चवधव करनारी करी लयी या मंग!आन आते कोन चिचोरी येनार से तुम्हना मांगे?डोकावर धव्या बाले व्हयी ग्यातआते!डोयावर चष्मा तंनंगी ऱ्हायना!तोंडम्हानां दात हाली नाची ऱ्हायंनात!दातनां पिंजराम्हा धीरेस्करीं वार्गी घुस्सी ऱ्हायनी!वय निंघी चालनं या मानोस्न तरीभी मन्हा हातनीं चव लागी नही ऱ्हायनी!थोंडानं थाकडा चायीस वरीसफाइन तुम्हना पाठमांगे पयी ऱ्हायनू!आजून भी सोय उनी नही नां तुम्हले!”
घरम्हा आम्ही दोन्हीचं व्हतुत!तोंडन्हा भरगडाम्हा बाई निस्ती फुंदूक फुंदूक रडी सपाडी ऱ्हायंती!बाहेर गाजावाजा नको म्हणीसनी मी तोंडले कुस्टाय लायी ठेयेलं व्हतं!बाई खुशाल बिन भरननं आवूत हाकली ऱ्हायंती!बय लगीनलें चायीस वरीस व्हयी ग्यात!लगीन व्हयनं तव्हयं कशी मन्हमांगे मांगे पयेतं ऱ्हायनी!मी भी यंग्रट व्हतुनां तव्हयं!बाई आते चायीस वरीसन्ही कसेर काढी ऱ्हायंती!आधरताये माले आते तिन्मांगे तंगाडी ऱ्हायंतीं!नव्वी चवधव करनारी करी लयी या आसं म्हनी ऱ्हायंती!आन आते कोन येनार से तुम्हना मांगे?आखो काय काय बोल ऱ्हायंती ,’ डोकावर धव्या बाले व्हयेलं सेतस!डोयावर चष्मा तंनंगी ऱ्हायना!तोंडम्हानां दात हालाले लागी जायेलं सेतस!!या मानोसना उतार वयम्हा राजा चगी चालना वं माय!आजून भी सोय उनी नही नां तुम्हले!”अशा सबद झामली झामली बोली ऱ्हायंती!
आते घरमा मी डफड्या, तीं डफडी,दोन्हीचं व्हतूतं!पोरे सहेरम्हा जायेल सेतंस!धयडंपने नातू धल्ला-धल्लीनां खेवाना भांडा ऱ्हातसं!दूधवरनी साय ऱ्हातसं!त्या भी दिवाई-आखाजी, सण-पावनलें येतंस!माले सरकारी नवकरी व्हती!पोटले पेन्शन भेटी ऱ्हायनी!बाई दोन मेंगरा टाकस नि हायी घर तें घर पुंजस बठस!आते आधरताये माले तिन्मांगे तंन्गायी तंगाडी ऱ्हायनी!उन पडता पडता गुडीपाडा चालना ग्या!आते दखता दखता आखाजी यी जायी!शंकर पारबती यी जायी!खान्देशना बठ्ठास्थिनं मोठा सण आखाजी जोगे यी लागेल से!बाईंनी चटकाया उनम्हा वड्या, पापड, शिय्या,काटका, कुल्लाया,करत ऱ्हावो नां? पन नही!म्हनस कशी, “हातपाय चालेत तव्हयं करी टाकू!आते व्हत नयी मन्हावरी!तुम्हनी जीभ इतली चटोरी से तें मंग आते बठ्ठ तयार भेटस!पैसा देवो नि काय भी लयी येवो!”
बाई बोलूच देत नही हो!तरी भी मी तोंड उस्काडी बोलनू बरं का, “तून्हा हातले जी चव से नां तीं इकतना सार सामानलें नही से!!तू कर बरं!मी हात लावसू तुले!” बाई तव तव मखडी ऱ्हायंती!खरं सांगानीं गोठ आशी से का जवानीम्हा जोर करी लेवो!आते जोरजोरनां आवाज आयकतं ऱ्हावो!तरीभी बाई तोंड पियीस्नी बोलनीचं, “तुम्ही आनीं आते हातभार लावश्यात!जिंदगी चालनी गयी तव्हयं काय नही!आते मन्ही इकाले बठेलं सेतस तुम्ही!” बाई झटका मारत मोरिंगमं भांडा घसा -धवाले जाय बठनी!
मी इचार करी ऱ्हायंतू,’मानोसन्हा हातपाय चांगला ऱ्हातसं तवपावूत मज्याम्हा जगी लेवो सालं!मव्हरे हात पाय थकावर मज्या चालनी जास!हाडके ढिल्ला व्हयी जातंस!गाडानीं कंगणी उतरालें लागी जास!वय वाढत ऱ्हास!घरमा येरायेरवर यी, हासी खुशी कज्या करी मज्या लेत ऱ्हावो!बोलत ऱ्हावो!मंग कोनजोडे बोलशात? भितडांसंगे?आते पयता घोडाल्हे भाव ऱ्हास!घोडं पयत ऱ्हास तवलुंग चांगलं ऱ्हास!थकेल मांगे पडी जास!थकेलन्ही भी ज्यास्तीं चवडाया करो नही!हासी खुसी जगी लेवो!थकेलनीं आपलं बोनस आयुष्य मज्याम्हा जगी लेवो!मित्र, नातागोता, आंडोर, जवाई,आंडरी, व्हवा, नातरे, आंगे पांगेनां,शेजार पाजार, सक्खा परका,गाव गल्लीनांसंगे हासी खुसी मनजोगत जगी लेवो!मी मोरिंगम दखी ऱ्हायंतू!बाई या वयम्हा भी जीव लायी भांडा घसी ऱ्हायंती!मन्हा डोयांमा टचकन पानी उन!खरचं तीं से म्हनीस्नी मी से!आम्हलें येरायेरना आधार से!म्हणीस्नी आम्ही आनंदम्हा जगी ऱ्हायनूत!तिखट, खारट, आंबट, गोड बठ्ठ न्यामीन ऱ्हास!चव लेत
ऱ्हावो!आपन बठ्ठास्नी चव लेत ऱ्हावो!आते आपुन दिन मावयतागंम जायी ऱ्हायनूत!बठ्ठ आठेचं ऱ्हायी जायी!जीव एकलाचं चालना जायी!आपलं पहिरेलं उगत ऱ्हायी!
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
***************************
… नानाभाऊ माळी
(मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे)
ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८
मो.नं -९९२३०७६५००
दिनांक-१९ एप्रिल २०२५
