बैल व्हयी गाड व्हडी ऱ्हायंता
🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
**********************
… नानाभाऊ माळी
राज्या १२वीम्हा शिकी ऱ्हायंता! दिनमावतलें शिकवनींलें जायी ऱ्हायंता!जाता जाता त्यांनबापले च्या लयी जायी ऱ्हायंता!बजारम्हाचं त्यांनबाप जिभो च्यार चाकी गाडीवर कांदा, बटाटा, निय्या मिर्च्या, गड्डा कोबी, फुलवर इकाले बठेलं ऱ्हाये!इस्टूलवर बठीस्नी दिनभर इक्रा चालू ऱ्हाये!तराजूनं तागडं वर खाले व्हत ऱ्हाये!गिऱ्हाइके येत जात ऱ्हायेतं! शिकवनीलें जाता जाता,रोज दिनमावतलें जिभोनंगुंता राज्या च्या लयी जाये!त्यांनंमाय इस्टीलन्हा धाकल्सा डबाम्हा च्या दि धाडे!जिभो उज्जी च्यान्हा तलपी व्हता!दिनभर गिऱ्हाइके दखी दखी जीव कटायी जाये!आराया मारी मारी थकी जाये! तोंड दुखालें लागजाये!तल्पी जिभोन्ही हाटेलम्हायीनं एखादा कप च्या इकत ली पी लेवो नां? पन नही!.. नेम्मन घरतीनचं च्या मांगांडी पेत ऱ्हाये!घरनी आस्सल खरबेल दूधन्ही च्या ऱ्हाये!हाटेलंन्हा मयकां पटक च्या तोंडले चव दि कां बरं!निस्त फयफय पानी ऱ्हाये!बाईनं हातनी च्या जिभोनां गयाम्हा नेम्मन धीरे धीरे उतरत ऱ्हाये!सुमन च्या डबकाले नको म्हनीस्नी इस्टीलन्हा डबाम्हा टाकी नेम्मन झाकन दाबीस्नी बसाडी दि धाडे!राज्यानंहाते डबा वाट लायी दे!धाकलसा डबाम्हा च्यान्ही गरम वाफ कोंडायी,डबानं झाकन पटकनी नींघे नही!

जिभो भाजी मंडईम्हाचं गाडींजोगे खाले गोंट टाकी बठनां!नेम्मन पाय फैलायीस्नी बठना व्हता!दोन्ही तय पायस्मझार जोर लायी डबा दाबी धरेल व्हता!वरथून दोन्ही हातस्वरी,बोटेस्वरी,नखें लायी झाकन हुगाडी ऱ्हायंता!जसा डबा तिरपा तारपा व्हयनां!झाकन भस्कन हुगडनं!गरमागरम च्या जिभोननां पायस्वर सांडांयी गयथा!जिभो जोरम्हा लल्हायी उठना व्हता!तयतयत बोली उठनां ,’ओ बापरे,भुंजायनू रें!बयजू आंन्नाडूमथीनी बाई!राज्या,तूनंमायलें आक्कल हुशारी से का नही रें?बय पाय बाफायी ग्यातनां!’
राज्यानं उत्तर ठरेलं व्हतं,’दादा तुम्हीचं इचारा मनंमायलें!’ आसं बोलीस्नी शिकवनीगंम ढागेंढागं पयत सुटना व्हता!जिभो मनम्हा नं मनम्हा चुरमयी-चारमयी गप बठना व्हता!इचार करता करता गरम च्या व्हटले लायी पेवाले लाग्ना!तितलाम्हा तोंडलें निक्खार चटका बठावर जिभो आखो हासहुस करी उज्जी बोंबलालें लाग्ना व्हता,’बह्य व्हट भुंजायनां रें बाप!काय करू यां सुमीलें?’ ते आयकी बजारम्हा आंगेपांगेंन्ह्या खेसरन्ह्या वचक्या धयड्या,माय मावल्या व्हत्यात!हासीस्नी खेसर करालें लागन्यात!जिजाबाई बोलनींच,’येरायेर मुचूक भागत नही नीं बोटे मोडा शिवाय चालत नही!अहो दांडगा!जिभो, तुम्हले सुमनन्ही याद उनी का काय हो डंग्रा? नेम्मन च्याम्हा व्हट बाफायना नां? ‘ जिभो निस्ता हासहुस करी ऱ्हायंता!काय करी?लाज वाटी आपला मुगामुगा बठना व्हता!जिभोनीं खेसरम्हा बोलती बंद व्हय गयती!गंजजं बोलनं व्हतं पन जीभल्हे दातवरी आवरी धरेल व्हती!जीभ आवरायी ती जीभ कशी?तोंड उस्कटी जीभ बाहेर पडनीचं व्हती!जिभोनीं हासानं उस्न कातडं व्हडी धीरेस्करी बोलनां व्हता,’वयंजीं काय खेसर करतस तुम्ही भी कायंजून!च्यान्ही मन्हा व्हट बाफी टाकात!’ खेसर करी बठ्ठया वचक्या हासी ऱ्हायंत्यात!तितलाम्हा तागडाम्हा गड्डाकोबी टाकिस्नी गिऱ्हाईक इचारी ऱ्हायंत,’ जिभो, कोबी काय पावशेर से रें भो?’ जिभोनं ठरेल उत्तर व्हतं,’इसल्हे पावसेर, तिसनां आर्धा किलो!’ गिऱ्हाईक मुगामुगा पैसा दिस्नी मव्हरे निंघी गयंता!
दरोज बजारम्हा दिनमावातले उज्जी गर्दी ऱ्हास!जथीबन तथी निस्ती कलकल सुरू ऱ्हास!कलंकल ऱ्हाये!त्या दिनभी गर्दी व्हती!इकनारस्नी आराया मारी मारी कान बहिऱ्या करी टाकेलं व्हतात!’चला,चला बटाटा ल्या!दहालें पावशेर,पंचवीसलें किलो!’ तितलंम्हा तथायीन दुसरा जोर जोरम्हा आराया मारी बलायी ऱ्हायंता ,’फुकट!फुकट!बटाटा फुकट!ल्या इस रुप्यालें किलो!नव्वा ताजा बटाटा सस्तामां मस्त!इस रुप्यालें किलो!इस रुप्यालें किलो!’ गिऱ्हाईक तथ पयी दखी ऱ्हायंत! निय्याजरत बटाटा नजरे पडावर तोंड पियेतं आखो पंचवीसवालांगंम फिरी चांगला बटाटा ली ऱ्हायंतात!
बजार…पोटनं, व्हटनं काही जानत नही!कायेज, भावना जानत नही!खर्दी-इक्रीनां बजार येव्हारनां व्हता!त्याले वल्ला दय दुय नही व्हता!वस्तू इक्रीनां येव्हारम्हा कायेज भिंजात नही!सगा-सोयरा लागत नही!नाता गोतानां लागत नही!तठे बिनजीवन्हा वस्तू इक्रीन्हा येव्हार व्हता!वस्तून्ह मोल करी इकान्ह व्हतं!खर्दी-इक्रीन्हा खेयम्हा आक्खा बजार बुडी जायेल व्हता!भाजी मंडयी रंगी जायेल व्हती!कायेजन्हा खोल दल्लापावूतं सबद भिडी नही ऱ्हायंतात!कोनल्हे आप्रुक वाटी नयी ऱ्हायंत!एक हातसे देना, दुसरे हातसे लेना व्हतं!
जिभो भाज्या इकिंटूकी घर व्हडी ऱ्हायंता!मशीन बनी कटबन राबी ऱ्हायंता!जिभो वल्ल कायेज घरमा ठीस्नी येव्हारनीं दुन्याम्हा राबी ऱ्हायंता!काम पूजा व्हती!कर्म इठ्ठल व्हता!पोट भुके व्हतं!दरोज दिन उगताच च्यांरचाकी ढकलगाडीवर भाज्या इकी ऱ्हायंता!सकायना नऊ ते रातना नऊ वाजापावूतं तागडं हातम्हा ऱ्हाये!वजन काटा सक्कायलें गाडीवर माल भरी गल्ल्यास्मझार भवडीस्नी बजारम्हा भिडी जाये!बीन वयख नि दुन्याम्हा वयख धुंडी ऱ्हायंता!इक्रा करी रातले घर येवावर आयसत मायसत दोन बलका खादात नि घरनी वसरीम्हा अंथरूनवर आडाधट पडनां व्हता!जपम्हा मांगलं आठे नही, पुल्ल माहीत नही व्हतं!आते राबी ऱ्हायंता ते सत व्हतं!सवसारन्ही नाव पानिम्हा सोडेल व्हती!नवरा बायको,पोऱ्या बठ्ठा नाववर बठी नींघेलं व्हतात!कर्मान्हा साफ्टा गोया करान्ह चालू व्हतं!नातंगोतं पहिरी,उगानी वाट दखत जिभो भाज्या इकीटुकी जगी ऱ्हायंता!सवसारन्हा बैल व्हयी गाड व्हडी ऱ्हायंता!
🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
****************************
…. नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे.
(ह.मु हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-०५ मार्च २०२५