काका हासी ऱ्हायंतातं अहिराणी कथा

काका हासी ऱ्हायंतातं अहिराणी कथा

काका हासी ऱ्हायंतातं

नानाभाऊ माळी
मोठमाय वट्टावर बठी गहू पाखडी ऱ्हायंती!इकत लेयेंल गहूस्मा मुकल्या काचोया व्हत्यात!पहिले मोठमायनां डोयावर चष्मा नही व्हता,पन जुवारी,गहू पाखडी पाखडी चष्मा लागी जायेल व्हता!हातमा सुपडं खाले-वर व्हयी ऱ्हायंत!घोई घोयी वरवरन्या काचोया गोया करी आंगेचं टाकी ऱ्हायंती!मोठमायनं पाखडनं सुरूचं व्हतं!सुपडं हाली डुली ऱ्हायंत!गहून्या काचोया आल्लंगं निंघी ऱ्हायंत्यांत!तितलाम्हा वरना गल्लीनां गुलाब तात्यानां आंडोर राजू पयेत उना!पयेत येवामुये निखार हाफी ऱ्हायंता!दम लागी हाफी ऱ्हायंता!राजू बोलना,’मोठमाय!वों मोठमाय काका कोठे ग्यात?’ सुपडांगम ध्यान देतचं मोठमाय बोलनी,’काबरं रें भो?आन इतलं घोड बनी काबर हाफी ऱ्हायना?’ निरोप दिस्नी राजुले अर्जंट निंघी जानं व्हतं!

मोठमाय काचोया काढाम्हा दंग व्हती!सूपडांगमं नजर लायी गहू पाखडी ऱ्हायंती!राजू काकूंयीदी करीस्नी बोलना,’वों मोठमाय सांगनां?कता सेत काका?’ मोठमायनी त्यांगम दखं सुदिक नही!तथा घरम्हा बोट दखाडी, कपायवर आठ्या पाडी बोलनी,’त्या काय,बोटेस्वरी वावर वखरी ऱ्हायनातं मांगलादारें!दुसरं काय काम नयी?

काम नयी माय काय करू…..!’ राजूनी आथतथ दख!त्याले वावर दिखी नयी ऱ्हायंत?मोठमायना सबद त्याले कयना नही!त्यांना डोकाम्हा काय उतरनं नयी!डोकं खाजत आखों बोलना,’मोठमाय,कोतं वावर वखरी ऱ्हायनात काका?आठे तें तुम्हनं घर से!वावर नयी दिखी ऱ्हायनं?’ मोठमायनी हासी दिन्ह!सुपडं खाले ठेवं!राजुले जोगे बलावं!मांगलदारंना गंम बोट दखाडतं बोलनी,’त्या दख तथा!हातमा मोबाईल धरी,बोटेस्वरी आते मेथीनी भाजी निवडी-चिवडी ऱ्हायनात!मधमा खुरपी ऱ्हायनात!

कसं तें समजी,तूंच सांग बरं?कव्हयं मव्हयं खालतीन वर पावूत बोटे फिरावतं ऱ्हातसं!जशी काय वक्खरं नाडी वखरी ऱ्हायनात!राजू दख तथ!दख तू कितला जोरमा मेथीनी जुडी उखली उखली फेकी ऱ्हायनात!सध्या तूनंकाकानं वावर मोबाईल व्हयी जायेलं से भो!सध्या त्यास्न चलिंदर काय ठिक दिखत नयी माले!वावरम्हा काय पिकी ऱ्हायन,त्यानंगंम ध्यान देवानं सोडी पुरा मोबाईलनां नांदिक व्हयी जायेल सेतंस!तूनंकाका त्या मोबाईलम्हा दखी दखी कव्हयं मव्हयं एकलाचं हासतसं!कव्हयं मव्हयं लळी देतसं!त्यास्ना हावू खे दिनभर चालू ऱ्हास!मी दिनभर त्यास्ना खेय दखत ऱ्हास!माले तें वाटस तूनंकाका जल्दी येडा व्हयी जातीन!’

राजू नीटचं घरम्हा घूस्ना!लांबसडक येंल धरी नींघना!एक एक गाया वलांडी मांगलदारे भिडना!एकदम भूतनांगत काकांसमोर जायी हुभा ऱ्हायना!काका खाटवर बठेलं व्हतात!डोया फाडी फाडी मोबाईल चिवडी ऱ्हायंतात!आंगे कोन येल से का नयी,सासूल भी नयी व्हता!राजूनी  काकानां खांद्यालें हात लायी हालायी दख!काका एकदम भेमकायी ग्यात!आंगे राजू हुभा व्हता!काका भेमकायीस्नी बोलनात,’देवनी तुले काही डोक्स बिक्स देयेलं से का नयी?आक्कल से का तुले!आरे बांगा भेमकायी गवू नां मी!’ राजूलें थांबालें टाइम नयी व्हता!राजू खकारीस्नी बोलना,’काका मन बापनी तुम्हले निरोप देयेलं से!तुम्हना वावरम्हा ढोरेस्न गव्हार घुसी जायेल से!हुभा मक्कीस्मा घुसी पाटा पडी ऱ्हायना!आतेनां आते तुम्हले वावरम्हा बलायेंल से!’

काका एकदम खव्वीस्नी,लालेलाल व्हयी ग्यात!रागनांभरे मोबाईलनां बटनें बंद करात!घरना कोपराम्हायीन कयक काढ!ढोरेस्ना गव्हारा वालालें गाया टिकाडत वावरनां गंम पयेत सुटनात!मांगे मांगे राजू भी पयी ऱ्हायंता!कव्हयं राजू मव्हरे तें काका मांगे आसं पयनं सुरू व्हतं!कव्हयं काका मव्हरे तें राजू मांगे ऱ्हायें!पयेंता पयेंता काकांना खिसाम्हा ट्रिंगट्रिंग, ट्रिंगट्रिंग आवाज यी ऱ्हायंता!कुडचिना छातडानां खिसाम्हा मोबाईल वाजी ऱ्हायंता!एक हातम्हा कयक, दुसरा हातमां धोतरनां पंधा व्हता!पयता पयता हातम्हायीन धोतरन्हा पंधा सुटी ग्या!कुडचिना वरलां खिसाम्हायीन मोबाईल काडानां आनी धोतरम्हा पाय आडकानां घाव एकच व्हयी ग्या!

काका एकदम जीमीनवर उफटा सुफटा जायी पडात!मोबाईलं भी दूर जायी पडा!राजूनी मांगे फिरी दख!काका आडा तिडा व्हयी जमीनवर पडेल व्हतात!काकानं घुडघा सोलायी जायेल व्हतांत!घुडघानी वाटीवर जायी पडा व्हतात!राजूनी काकांना हातमा मोबाईल दिधा!घुडघा रंगतेभोम व्हयी जायेल व्हतांत!राजू सगरलें लायी निय्येगार उगेल घावटीनां पाला तोडी लयना!तॊ झाडापाला चोई चायी रस निपयी काकानां घुडघावर टाका!उज्जी चरका मारी ऱ्हायंत!काका त्या चरकानी अगीनमुये जागावरचं आराया मारी ऱ्हायंता!उठता यी नई ऱ्हायंत तरी राजूनी काकालें उठाडी हुभ कर!हातमा आखों कयक दिन्ह!

काकानी मोबाईलम्हा कोना फोन येल व्हता तें दख!फोन नेम्मन राजुना बापनां व्हता,गुलाब तात्यानां फोन येल व्हता!ल्हवं ल्हवं चालाना नांदम्हा,धोतरम्हा पाय आडकी पडा! त्या गडबडम्हा फोन उखलायना नही व्हता!मोबाईल लायी दखा!तथायीन गुलाब तात्या बोली ऱ्हायंतात,’ ढोरेस्लें दूर तथा पडीतनागंम हाकली उनू!गव्हारक्या तांनक्यालें भी गाया टिकाड्यात!भय उज्जी पट्यारा से हो तॊ बाट्टोड!हुभा मक्कीस्मा गाई-म्हैसी घुसेल व्हत्यात!त्यास्लें हाकली उनू!आते वावरम्हा येवू नका तुम्हीन!’

काकानां जीव तयतयी ऱ्हायंता!घुडघ न्यारं उसडायी जायेल व्हतं!’घर जावो का वावरम्हा?’ या इचारमां व्हतातं!गुलाब तात्या बोलावर,घरनां गंम नींघना व्हतात,तितलाम्हा फोन वाजालें लाग्ना!उखलंतां बरोबर कानावर आवाज पडना, मोठमाय बोली ऱ्हायंती ,’दुफार व्हय गयी!भवडी भुवडी नीटचं घर या आते!मेंगरं ऱ्हादेंल से!लोसन टाकी, शेंगदाना वाटी,चांगलं तिख करेल से!तुम्हनं आवडतं करेल से!तथा मोबाईलन्हा नांदम्हा घर आनी जेवन इसरू नका!ज्यास्तीं मोबाईलम्हा बोटे घाली खुरपे चालावू नका..!’आयकता आयकता फोन कट व्हयी गयता!काकानं डोकं भारी हाली जायेल व्हतं!भितडावर डोकं ठोको का काय, आसं व्हयी जायेलं व्हतं!राजुले दखी जोर सुटना!कोनावर तरी राग काढी हालकं व्हनं व्हतं!बोलनात,’दख रें राज्या,तुंनमोठमाय काय बोंबली ऱ्हायनी तें!तू दख्यात नां मन्ह्या फजिता!घर,वावर,तुंनमोठमाय या बठ्ठाजन मीस्नी मन्ह घुडघ फोडता फोडता पाट सोली टाकतीन!आठे मी पाय व्हडी चाली ऱ्हायनू नी तथी तिले मज्याक सूची ऱ्हायनी!’

राजू काकानां हात धरी  चाली ऱ्हायंता!त्याले भी मज्याक सुचनी,’ काका!मोठमाय बोलनी त्याम्हा काहीतरी दम से बरं का!तुम्हनां मोबाईलनां फंदमुये कितला घोटाया व्हयी ग्यातं व्हतीन!एक हातमा मोबाईल,दुसरा हातम्हा कयक!ल्हवं ल्हवं पयांमुये धोतरम्हा पाय आडकी पडी ग्यात!घुडघ फुटी रंगत व्हायी ऱ्हायन!धोतरभी रंगतन्ह भरेलं से!आते मोठमाय घरम्हा ली का नयी तुम्हलें?’ काका बोलनारं तितंलाम्हा गल्लीन्हा दूर कोपरांगमं नजर गयी!मोठमाय वाट दखत हुभी व्हती!काकांना अवतार दखी तठेंग पयेत सुटनी!जोगे इस्नी काकांना अवतार दखी तोंड ठोकाले लाग्नी,’काय व्हयन वं तुम्हले!बठ्ठ घुडघ फुटी जायेल दिखस!काय लाग्न घुडघालें?एवढा गुमसुम काब्र सेतंस?’ काकानां व्हटम्हाना सबद नींघी नयी ऱ्हायंतात!राजूनी मव्हरे यीस्नी बठ्ठा घडेल परसंग सांगा नि पयत त्यानंघर चालना ग्या!

मोठमाय काकानां हात धरी धीरे धीरे घरमा लयी गयी!तिनं हाते गुडघालें जख्मी मलम लावा!काका हुं नई ना चू नयी व्हतात!निस्ता गुमसुम व्हतात!मोठमाय लाडे लाडे बोलनी,’तुमन्ह मुक्स बांधेल तोंड चांगलं दिखत नयी माय माले!तोंड उस्कटी दोन सबद बोला जराखं!पाहिजे तें राग काढी गाया टिकाडा माले!सहीन नई व्हतं व्हयी तें  मोबाईलम्हा बोटे चिवडत बठा पन व्हट खालेवर करी जराखं हासी द्या तुम्ही!तुम्ही आसं चांगला दिखतंस नयी!’ काकानं गुडघ उज्जी ठनंकी ऱ्हायंत!मोठमायना आग्रोह खातर काकानां व्हट धीरे धीरे उस्कटी आल्लग व्हयी ऱ्हायंतात!मोठमाय नजर लायी दखी ऱ्हायंती!काका हासी ऱ्हायंतातं!मोठमाय खुश व्हयी हासी ऱ्हायंती!काका घुडघालें लागेल इसरी गयतांत!

नानाभाऊ माळी
मु.पो.ता.शिंदखेडा,जि.धुळे
(ह.मु.हडपसर,पुणे-४११०२८)
मो.नं-९९२३०७६५००
         ७५८८२२९५४६
दिनांक-२४ ऑक्टोबर २०२४