अहिराणी आखाजी कवीता गौराई
लेक गौराईना मिसे
तीन्हा माहेरले येस …
सालेसाल चार दिन
सण अखाजिले देस……….1
येस जसी पालखीम्हा
बंधू पायघड्या टाके…
जेठी मोठी भवजाई
तीन्हा पायव्हर वाके………2
भांदे आंगणमा हिंद्या
हिंद्या आभायमा जाये…
मारे जिमीनले लाथ
लाथ आभायले दाये………3
तीन्हा झोकाले रे देखी
निम थर-थर डोले…
झोकावर्नी गवराई
गाणं अखाजिले बोलें……..4
चुल्हा आनी भानसिन
रांधे आलोखीना घास…
सर्गाम्हाना पितरेस्ले
धाडे सानावाटे वास…….5
माय आनपूर्णा भरे
अखाजिले कोरी घल्ली…
पुंजे कबेलाना मेढ्या
हात जोडे भागबल्ली……6
पिप्पयना झाडखाले
पीसे पत्तासले डाव …
कोण जीके, कोण हारे
चर्चा करे अख्खं गांव……7
झाया पाठमोरा सण
उनं संकरले हासू…
माय माऊलीना डोया
दाये पपनीले आसू……8
कवी… प्रकाश जी पाटील (पिंगळवाडेकर)