पाव्हना ताक हाने अहिराणी गोष्ट
॥ पाव्हना ताक हाने ॥
———©MKभामरेबापु
(स्वतःच्या पोटाला चिमटा देत पाहुण्याला पाहुणचार देणार्या खान्देशच्या अतिथी देवोः भव संस्कृतीची माझ्या मायबोली अहिराणी भाषेतली गोष्ट)
भल्ता नदारीना सौसार व्हता हो…
पन तरीबी घर येयेल पाहुनाले पाहुनच्यार करानी आमनी खान्देशनी संस्कृती भल्ती न्यामी व्हती.
आमना आग्रो ईतला मनफाईन र्हाये की ईच्यारु नका.
उधार ऊसनवार करीसन ,सोयता भुक्या र्हाईसन पावनाले पोटभर जेवु घालेत.
त्या जमानामा वरण भात,खिचडी बी पाहुणचार र्हाये.
भरेल घर र्हाये,घरमा धाकला मोठा १०/१५ जण र्हायेत.
बठ्ठास्ना करता वरण भात आनी खिचडी कराले पैसा नही र्हायेत.मंग पावनापुरता चांगलं पक्वान बने. अशी जेमतेम सातासात र्हाये,
बठ्ठास्ले ते पुरे नही,मंग घरनास्ले एकेक वाढाज भेटे.पन पावनाले आग्रो करी करी पोटभर खावाडेत.
आज खिचडी व्हवा से,आसं मायनी सांगं की आमले भल्ता आनन व्हये.
“माडी,पोटभर खिचडी भेटी का खावाले?”
आसं ईचारुत.
ती एकज वाढा भेटे म्हनीसन आम्ही भाकरना बरोबर खिचडी लाई लाई खावुत.
पाव्हणापै येयेत तवय त्यास्ना पुरतीच खिचडी र्हाये,
तसच दुधनं बी व्हतं.
पाव्हना ना पुरतं दुध लयेत.पावनाले दुध नि
पाव्हना ना बरोबर ज्या २/३ जण जेवेत त्यास्ले मंग ताक वाढेत.
एकदाव एक घरमा पावना उना.
नदारी मुये त्या बाईनी पावना पुरतं दुध आनं.
आणि ताटे वाढात भो.
बै पन गंमत व्हयनी,त्या बाईनी घाई गर्दीमा दुध ऐवजी ताकनीज गिरमी पावनाले दिनी.आनि घरवालाले दुधनी गिरमी.
जेवने सुरु व्हतात.
पावनाले ताक वाढेल नि घरवालाले दुध.
त्या बाईनी कवतिक मा पावनाले ईचारं,
“पावना कसं दुध से आमना गावनं?”
पावना हुशार व्हता.
त्याना ध्यानमा हाई गोट येयेल व्हती की या बाईनी नजेरचुकमा माले ताक वाढेल से नि नवराले दुध.
तसं पावना बोलना..
“देख बईन,खाये तो जाने नि पाव्हना ताक हाने”
ते आयकातच बाई वरमाईज गई हो.
माय वं..पावनाले ताक वाढाई गये?
तिनी चुक ध्यानमा उनी.
मार पस्तावा करे.
पावना समजदार व्हता.
दखं बैन ताक का व्हयेना,पन तु पिरीममा वाढं..माले पावनं ते,..ते ताक दुधथीन बी गोड व्हतं बहीन..तु नाराज व्हवु नको..माले तुना पावनच्यार पावना,,.
अशी आमनी खान्देश संस्कृती ले नमन से,,
बिन पैसाना आमना
आनंदी व्हता सौंसार
माणसेस्ना संगसोबतीले
देवबाना आम्हले आधार
घरे आम्हना धाबाना
छाया त्यास्नी थंडगार
फाटेल फुटेल गोधडीमा
मायनी माया भेटे उबदार
नही लाडु नही बर्फी
नही व्हतात पकवान च्यार
खुडा भाकरी कांदा कैरीमा
पोटभर भेटे पाव्हनच्यार
——©’MKभामरेबापु