खान्देशी अहिराणी इतिवृत्त मुस्लीम साहित्य संमेलन

हुशारी त्येन्ही मुशाफिरी राज्यस्तरीय मुस्लीम साहित्य संमेलन भरायनं

अहिरानी मायना खराखाति जागलकरी भावड्यासहोन, मायबहिनीसहोन, विचारवंत, लेखक, विद्याव्याचस्पती, कथाकार, तमासा आन किर्तन करीसनी जनजागृती करन्हारा भावी भक्तसहोन, भारुड आनी बाकिन्या लोकपरंपरासनं आवधूरलगून जतन करन्हारा मन्हा जीवलग दोस्तारेसहोन,मा. बापूसाहेब हटकर, मा.सुभाष अहिरेसायेब, मा.रमेशदादासो, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, मा. रमेशदादा सूर्यवंशी, मा. पापालाल पवार, मा. भामरे बापूसायेब, मा.नानाभाऊ माळी, मा. प्रवीन माळी, आन त्यासनामायेक अहिरानी मायसाठे येळपरसंगे गाठपदरना पैसाआडका खर्चीसनी दूर दूर लगून भरायेल साहित्यसंमेलनेसम्हा सहभाग ल्हीसनी खान्देशी माटीना चांगला गुनगानना वानोया गायेगाव वाटन्हारा आम्हना लाडका दत्तात्रय कल्यानकर आबा सारखा कवी, गझलकार भाऊ बहिनीसहोन तुम्हले सर्वासले हावू शिवाजीआप्पा नमन करस, आरस्तोल करस, आप्पासाहेब विश्राम बिरारी, अजय बिरारी यासना मायेक जीवतोडीसनी अहिरानीमायनी सेवा करन्हारा सेवेकरीसले दंडवत घालंस आनी सर्वासथीन हाई सोशियल मिडियावर अहिरानीना नाच-गाना आन बाकीनं साहित्य लगेलग न्यारा न्यारा चॕनेलेसवर टाकीसनी अहिरानी मायना प्रचार आन प्रसार आख्खा जगदुनियाम्हा सवरनावर (सतत) करन्हारा संगनकक्षेत्रना वज्जी भारी जानकार नैतरना पोर्हे पोर्हीसले गायक, गायिका संगीतकारेसले आशिर्वाद. (खरं ते मी त्येसना पायच पडाले जोयजेत!)
कालदिन आठे नागपूरले पह्यलं

राज्यस्तरीय मुस्लीम साहित्य संमेलन भरायनं. धुयाना दत्तात्रय कल्यानकरदादाले मी सबूद देयेल परमाने महाराष्ट्र एस्प्रेसवरी परोनदिनच आठे मन्ही समदासथीन धाकली आंडेर नलिनी गुंडले यासनाकडे ई लागेल व्हतू. जठे र्हावा-खावानी (पेवानी नै बरका कारन मी पेस नै) आशी नेम्मन सोय लागंस तठेच मी जास. ते म्हनतंसना हुशारी त्येन्ही मीशाफिरी रिझर्वेशन नै भेटनं म्हनीसनी जनरल बोगीम्हा पाय ठेवालेबी आवढीशी जागा नसताना कसाकसा बागे बागे मव्हरे मव्हरे सरकत सुरकत थेट खिडकीना जोगे जाई भिडनू मोबाईल चार्ज कराना निमितखाल हाई जर सांगाले गवू ते, ती एक नईन नारीच गोट हुई जाई. पन माले हावू आसा आनभव हज्जारदा येयेल शेतंस हाई गोट सोया आना खरी शे. मात्र ईमानवरी आसा आनभव आजलगून नै वना बरका! पुढे भविष्यम्हा तो ई तधय ई. तधलगून कोन कथा र्हाई कोन जाने! च्याईसगावथीन निंघनू तसा
भावाड्यासहोन तुमीन काहीबी म्हना पन आपली खान्देशनी माटीना एक आलगच मासला म्हना सदगून म्हना तो माले भू दिनम्हा दखायना. हावू दत्तात्रयआबा ल्ह्या त्या डॉ. सदाशिव सूर्यवंशी, अजयदादा बिरारी ल्ह्या, ह्या आसा एखल्ला कधीच कोठे जातंस नैत. त्येसना संगेमंगे अहिरानीमायना जागलकरी, सेवेकरी नवोदित लेखक कवी आसा भाऊबहिनीसलेबी ल्ही फिरतंस त्या, बैझू हाई त्येसले कसंकाय जमंस हावू एक नैन सोधना विषय शे! दत्तात्रयआबानी सुरतथीन गनेश पाटील काई आकोलाथीन एक नैतरानी कवयित्री आन आसा गनज झनेसले निरपे धाडात पन तठे मी दत्तूआबा आन ती आकोलानी पोर आवढा तीनच झने व्हतूत.
आसो. मी विदार्भाम्हान साठ पैसठ वरीसलगून र्हायेल व्हतू म्हनीसन मन्हा दोस्तारे काही माजी विद्यार्थी-विद्यार्थीनीसले फोन लायात, पन तठे कोन्हीच नै वनं. त्येले कारन मी आन हाऊ सोशियल मिडियाच शे हाई नंतर मन्हा ध्यानम्हा येवाले एक सेकंदबी नै लागना. कारन मी त्येन्हा भू वापर करंस हाई तुम्हले बठ्ठासले ते ठावूकच शे! त्या दोस्तारे म्हनेत का, *सर आता वेळेवर आमचं येणं काही शक्य होणार नाही!* त्येसले हाई पक्क म्हाईत व्हतं का मी बठ्ठानबठ्ठा समाचार आडियो-व्हिडियो सैईत त्येसले धाडसू, म्हनून त्या निश्चिंत व्हतात. आहो त्या ते त्या पन मन्हा जातभाईबी ऊगावनात नैत तठे! कारन हाईच का, आप्पा बठ्ठनबठ्ठ संमेलननं ईतिवृत्त धाडथीनच धाडथीन आन ता आपूनले घरबसल्या दखा आयकाले भेटी, जसं आते तुम्हले भेटी र्हायनं बिलकुल तसं!
चला आते कार्यकरमकडे वयूत आपीन.


प्रा. जावेद पाशा हाई व्यक्तिमत्त्व विदर्भाम्हान भू नवाजेल शे, त्येसना वीसेक पुस्तकेबी प्रकाशित व्हयेल शेतंस. मुस्लीम मराठी साहित्य संमेलनेसनं त्या आयोजन-नियोजन, प्रस्तावना-भाशन, सुत्रसंचालन-कवीसंमेलन ह्या बठ्या भूमिका एखला चारपाच तास आन ते बी एकखट्टे न थांबता न थकता घाम पुशीपुसीसन थेटलगून नॉनस्टॉप करु सकतंस, आगदी आपला डॉ, सदाशिव सुर्यवंशीच समजी ल्याना घडीकभर. ते यान्हा मी आनुभय यान्हापह्यलेनज ल्हेयेल आसल्यामुये हावू भावड्या मिनीटभरबी कटाया ईवू देव्हाव नै यान्ही माले खात्री व्हती. दत्तूआबा हामेशानामायेक मन्हा पल्यलेच तठे हाजर दखायना. वारे शेर! याले म्हनतस खरा साहित्यसेवक.
ह्या जव्हढाबी विद्रोही साहित्य संमेलने, कवीसंमेलने र्हातसना याम्हा बोलन्हारा वक्तासफाईन ते कवी, शायर आन गझलकार निस्ता बेंबीना देठेसफाईन आल्लाया मारी मारीच काबरं बोलतंस व्हतीन यान्हा सोधतपास लावा तधय हावू ऊलगडा कालदिन माले नेम्मन व्हयना. ती म्हन शे ना, जेन्ह बयस त्येलेच कयस! मुस्लीम हावूबी ते एक मानूसच शे ना! आहो धरमनी गोट जराखी बाजूले ठेवा. त्यासनी लोकसंख्या जितलीबी हुई तितलासम्हाईन नौकरीले कितलाक लोके शेतंस? कास्तकार कितलाक शेतंस? डबल रोटी, पाव, टोस्ट ईकन्हारा कितलाक शेतंस? रद्दी ईकत ल्हेत घरेघर फिरन्हारा, व्यापार करन्हारा भंगार गोया करीसनी ईकन्हारा कितलाक शेतंस? कोंबड्या-बकर्यासनं मास ईकन्हारा खाटीक कितलाक शेतंस? यान्हा जर ईच्यार कया ते मन्हज काय पन कोन्हबी डोकं पार मॕट हुई जाई! आवढी व्हडातान आशिसनबी त्येसले आरक्षनना नावले सरकारनी काय देयेल शे? तीच गत तुम्हनी आम्हनी ओ.बी.सी. सनी व्हयेल शे! पन ह्या ओ.बी.सी. ना साधा आर्थबी ते आपुनले ठावूक शे का? त्यान्हा आर्थ ईतर मागास प्रवर्ग यान्हाच दुसरा महत्वाना आर्थ आसाबी निंघस का ह्या लोकेसलेबी आरक्षन जोयजेच जोयजे! शे का नै? ते भावड्यासहोन घरम्हा बसल्या बसल्या काय भेटाव शे? त्येन्हासाठे रस्तावर ऊतरनं पडी ते लाजसरम सोडीसनी न्याय मांघनाच पडी. मत स्वातंत्र्य, समता, बंधूता, सर्वधर्मसमभाव यान्हा समदा विचार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूराजे भोसले, (छत्रपती शाहूमहाराजासनी ते मुस्लीम होस्टेलबी सुरु कयथं ह्या अल्पसंख्यांकसना गरीब सारीब पोर्हेसकरता!)क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, शेन आन गाराना भरेल लुगडासमेत पोर्हीसले शिकाडाले जान्हारी क्रांती ज्योती सावित्रीमाय फुले यासनी जे सईन कयं ते ईसरीसनी कसं बरं चाली? भारतीय संविधानवर टीका करन्हारेसनी जीभ छाटानी येळ ई जायेल शे, आन आपले त्या रामनी प्रानप्रतिष्ठाम्हा काही ईतर खोटा नाटा कथापुरानेसन्या धार्मिक जांगडगुंताम्हा गुताडीसनी आफूनी गोई खावाडाई र्हायनी, याम्हातलं काय खरं आन काय खोटं शे हाई मी तुम्हले न्यारं सांगानी काहीच गरज नई. तुमीन सोता समजदार शेतंस.
आते जर जपा काढ्यात ते भलंतं माघाम्हा पडी. ते मंगन चला तयार र्हावा. सारासारविचार करीसन नेम्मन निर्नय ल्ह्या! कारन तुम्हले म्हाईतच शे!
हुश्यारी तेन्ही मुश्यफिरी

भावड्यासहोन मन्हते गयं डोकं फिरी. म्हनीसनी आते थांबस!

जय खान्देश! जय अहिरानी!!

तुम्हनाच

शिवाजीआप्पा साळुंके, ‘किरन’

(गाव- च्याईसगाव, जि. जयगाव खान्देश.)