खान्देशी भाऊस्वन इतलं करा खरेखर आहिराणी दिनदर्शिका लावूत घरेघर
खान्देशी भाऊस्वन इतलं करा खरेखर,
आहिराणी दिनदर्शिका लावूत घरेघर
खान्देश
खान्देशी भाऊस्वन इतलं करा खरेखर,
आहिराणी दिनदर्शिका लावूत घरेघर
खान्देशी मानुसना मनम्हा मायबोली आहिराणी बद्दल पिरेम व्हईन खरेखर तर आहिराणी दिनदर्शिका दिखीन घरेघर, आसं प्रतिपादन आहिराणी साहित्यिक, कलावंत अजय बिरारी यास्नी करं. रविवार ७ जानेवारीले जामनेरना १४ वा खान्देश साहित्य संमेलनम्हा तेस्ना हस्ते आहिराणी दिनदर्शिकाना प्रकाशन संपन्न झायं.
कार्यक्रमनी प्रस्तावना प्रा.बी.एन.चौधरी यास्नी करी. तेस्नी आहिराणी दिनदर्शिकानं स्वरुप, तेम्हातली खान्देशी सन उत्सवस्नी माहिती, आहिराणी वार, महिना, तिथीस्ना आगाजा करा. खान्देश विकास मंडळना अध्यक्ष विकास पाटील, संपादक बापूसाहेब हटकर, ए. जी. पाटील, प्रकाशक प्राचार्य प्रशांत पाटील कार्याध्यक्ष प्रा. एन. एम. भामरे, डॉ. एस. के. पाटीलयास्ना संकल्पनाप्रमाने या दिनदर्शिकानी निर्मिती व्हयेल शे. दिनदर्शिकानं हाई दुसरं वरीस शे. खान्देशम्हाज नही ते जठेजठे आहिराणी भाषीक, खान्देशी मानूस पहुचेलशे तठेतठे हाई दिनदर्शिका लोकप्रिय व्हयी ऱ्हायनी असं तेस्नी सांगं. १२ पानी दिनदर्शिका म्हंजे खान्देशी माहिती आनी आहिराणी बोलीना खजिनाच शे. हाऊ बहुमोल ऐवज दरेक खान्देशी घरम्हा दिखाले जोयजे अशी अपेक्षा तेस्नी व्यक्त करी. या प्रकाशन समारंभले साहित्यिक हभप. प्रा. रामकृष्ण पाटील, डॉ. स्वाती विसपुते, प्रा.बी.एन.चौधरी, संस्थाध्यक्ष डी. डी. पाटील, कवयित्री सीमा बागुल, राहूल निकम, रमेश बनकर, डॉ. संगीता गायकवाड, सौ. प्रतिभा चौधरी, गोविंद पाटील, प्रविण महाजन, गणेश पाटील उपस्थित व्हतात. जितू जाधव यास्नी सुत्रसंचलन करं तर विनोद गोरे यास्नी आभारप्रदर्शन करं.
कार्यक्रमले खान्देश आणि महाराष्ट्रम्हाईन साहित्यिक उपस्थित व्हतात.